सलमान खान_गंदी बात!

प्रति
सलमान भौ

सप्रेम नमस्कार

गेल्या कित्येक दिवसापासून न्यूज चॅनेलवर, वर्तमान पत्रात तुझ्या विषयी रकानेच्या रकाने आणि ख़ास एपिसोड पहायला मिळत आहेत. तुझ काम पण तितकच न्यूज वैल्यू असलेल.पण एक सांगु, ज्या वयात खेळण-बागडन अपेक्षित असत त्या वयात आम्ही तुझे ,मैंने प्यार किया,हम आपके है कोण?,हम साथ साथ है असे लव वाले सिनेमे पाहुन मोठे झालो. त्यामुळे तुझ्याबद्दल एक 'विशेष' आदर आहे. पण साला दारु पिवुन रस्त्याच्या कडेला (रस्त्यावर नाही!) झोपलेल्या लोकांना काय म्हणून चिरडला रे तु? गंदी बात. जखमी लोकांना दवाखान्यात न्यायच सोडून पळून आलास. गंदी बात. आपला गुन्हा ड्रायव्हरच्या माथी मारण्याचा अयशस्वि प्रयत्न केलास, गंदी बात.केलेल्या पापच् प्रायश्चित म्हणून बीइंग ह्यूमन नावाचा एनजीओ काढला.अच्छी बात. स्वतःची इमेज बिल्डिंग केलिस,पण हेतु काहीतरी वेगळा होता,गंदी बात.या देशात कितीतरी लोक निरपेक्षपने एनजीओ चालवतात, एखाद्या गुन्ह्यातुन वाचावे म्हणून तु स्वतःच्या एनजीओच भांडवल करतोस,गंदी बात.मेधाताई,आमटे कुटुंब,कोल्हे दांपत्य असेच एनजीओ चालवत आहेत,त्यांनी कुणाला चिरडले नाही, ना मस्तखोरपणे जंगली जनावराची हत्या केली. पण तु ते केलेस, गंदी बात. उच्चपातळी वर सेटिंग लागावी म्हणून अहमदाबादेत जावून प्रधानसेवकासोबत पतंग सुद्धा उडवली, गंदी बात.शिक्षा झाल्यानंतर जामिन मिळवण्यासाठी लाजिरवाना प्रयत्न केलास,गंदी बात.तुझ्याशी आर्थिक लागेबांधे असणारे बॉलीवुड वाले रंगकर्मी तोंडाची गटार करत काहीही बरळत सुटले, कुत्ता रस्ते पर सोयेगा तो कुत्तेकी मौत मरेगा बोलणारा कुत्ताचार्य अभिजीत अक्कल पाजळत बसला, तु साध स्पष्टीकरण दिल नाहीस, गंदी बात.तुझी शिक्षा स्थगित झाल्यावर पनवेलच्या फार्म हाऊस वर सेलेब्रेशन करुण इथल्या न्यायव्यवस्थेला वाकूल्या दाखवल्यास. गंदी बात.राज्यघटनेत न्यायासमोरची समानता विसरलास,गंदी बात.फुकाचे जीव घेतलेस,तु चिरडल्यानंतरही इथे रस्त्यावर झोपणारे लोक कमी झाले नाही, तु 13 वर्ष सार्वजनिक आयुष्य ताठ मानेने जगला, इथे तर आयुष्य जगाव की नाही हा प्रश्न.गंदी बात.आता तु सर्वोच्च न्यायालयात जाशील, वेळ आली तर राष्ट्रपतिकडे क्षमायाचना करशील, फावल्या वेळेत समाजसेवा करशील. यामुळे फुटपाथवरच्या लोकांना अच्छे दिन येणार का? नाहीच,गंदी बात.

तुला लवकरात लवकर शिक्षा व्हावी असे वाटनारा तुझा एक फॅन।
इंजी. सागर भालेराव

3 comments:

  1. @सागरजी ,
    अप्रतिम .
    असेच निर्भीडपणे लिहित रहा . आम्ही कायम यातुन उर्जा घेत आहोत .
    तुमच्या लेखनास खुप खुप शुभेच्छा .

    ReplyDelete
  2. sagar kharach apratim mandle ahes tu .tuzi hi post mhnje salman khan la milaleli jordar chaprak .sagar achhi baat

    ReplyDelete