जेत्यांचा इतिहास कायम धवल असतो तर पराजितांचं इतिहास हा काळोखाच्या गर्तेत लुप्त झालेला असतो, हा झाला निसर्गनियम आणि सहजवाद!
भारताच्या इतिहासात आणि धार्मिक राजकारणात महत्वाचं स्थान असलेला 'नायक' म्हणून अयोद्धेयचा राजा राम आपल्याला ठाऊक आहे. अयोध्येचा राजा, सीतेचा पती, त्याच मर्यादापुरुषोत्तम असणं,शबरीची बोर खाणं,अहिल्येचा उद्धार करणं आणि महत्वाचं म्हणजे रावणाशी युद्ध करून आपल्या पत्नीला,सीतेला त्याच्या तावडीतून सोडून आणणं हे सगळे कर्तब आपल्याला ठाऊक आहेत,परिचयाचे आहेत.या प्रसंगावर महाकाव्य लिहिलं गेलं,रामायण! आजही ते वाचलं जातं. आजही या महाकाव्याचा आपल्या जीवनावर नाही म्हटलं तरी परिणाम हा दिसतोच. रामाच्या नावाचा वापर करून देशात काय राजकारण चालू आहे हे काही वेगळं सांगायला नको.
ही झाली रामाची बाजू. पण पराजित रावणाची बाजू आपण कधी वाचलीय का? आर्याच्या आक्रमणानंतर इथले द्रविड/अनार्य/असुर देशोधडीला लागले. निसर्गवादाचा पुरस्कार करणारे असुर एकाएकी असभ्य ठरवले गेले.सिव्हिलाइज्ड (स्वतःला म्हणवून घेणाऱ्या)आर्यांनी सांस्कृतिक दहशतवाद माजवला (आज चालू असलेली सांस्कृतिक राष्ट्रवादाची चर्चा हा त्याचाच पुढील भाग).
जातिव्यवस्थेची नीचोत्तम प्रथा याच काळात सुरु झाली,यज्ञयाग,कर्मकांड,पशुबळी हे सगळं याच संस्कृतीचं आपत्य! वेदांच्या प्रचार-प्रसारासाठी वाट्टेल ते केलं गेलं.दिग्नाक-चार्वाक-बळी या परंपरेला संपवून टाकण्याचा प्रयत्न झाला.
याच दरम्यान असुरांची अनेक छोटी-मोठी साम्राज्यांनी दक्षिण भारतात आपली वेगळी ओळख निर्माण करत होती. देव लोकांशी त्यांचं कधीही जमलं नाही. जमण्याचा दुरान्वये संबंधसुद्धा नव्हता. कालांतराने देव लोक शिरजोर झाल्यावर कुबेराच्या सावत्र भावाने,रावणाने समस्त असुर समुदायाचं नेतृत्व करण्याचं ठरवलं आणि स्वतःच साम्राज्य उभं केलं. समस्त असुर समुदायाला विश्वास होता कि देव लोकांना नमविण्याची,झुकविण्याची पात्रता जर कुणाच्या अंगी आहे तर ती रावणाच्या अंगी आहे.त्यामुळेच भद्र सारखा साधारण युवक रावणाच्या दरबारी रुजू झाला (भद्र हा धोबी समुदायातील होता आणि त्याच्या 'त्या' कथित टिप्पणीने सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली अशी वदंता आहे). असुर या आनंद नीलकंठ लिखित पुस्तकात हाच भद्र रावणाच्या पराजयाची आणि रामाच्या कपटनीतीची कहाणी सांगतो. रावणाने उभं केलेलं साम्राज्य,त्याचा डौल,त्याचा मान-सन्मान,त्याची महत्वकांक्षा,त्याचा अहंकार हे सगळं त्यात मांडलं गेलंय. द्राविडी परंपरेत चालत आलेल्या मिथक कथांचा आणि मौखिक कथांचा त्याला आधार आहे.
रावण आणि मंदोदरीला झालेल्या नवजात मुलीला पाहून एका साधूने भविष्यवाणी केली कि या मुलीमुळे असुर कुळाचा नाश होईल. असुर कुळाच्या भल्यासाठी या मुलीला जीवे मारण्याची जबाबदारी रावणाच्या नकळत त्याच्या शुभचिंतकांनी भद्रवर सोपविली. या मुलीला जीवे मारणे भद्रला जमले नाही. चिखलाच्या दलदलीत या मुलीला भद्रने फेकलं.पुढे ही मुलगी देव राजा जनकाला मिळाली आणि पुढे काय घडलं याची नाट्यमय कथा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला गेला हे जेव्हा रावणाला समजत, येथून खऱ्या अर्थाने रावणाची गाथा सुरु होते. महाबळीचं साम्राज्य वामनाने छल-कपटाने काबीज केलं. त्या महाबळीकडे रावणाने आपलं शिक्षण घेतलं. आपली मुलगी देवलोकात सुरक्षित नाही असं रावणाला वाटू लागत. स्वयंवरासारखे अघोरी आणि महिलांच्या अधिकाराचे हनन करणारे प्रकार असुर समुदायात कधीही नव्हते.
पुढे आपल्या मुलीला,सीतेला परत मिळवण्याची रावणाची धडपड, रामाने युद्धकाळात वापरलेली अनीती, मंदोदरीसोबत वानरसेनेने केलेला बलात्कार,शंबुकाची रामाने केलेली हत्या आणि मुख्य म्हणजे सीतेसोबत केलेला दुष्ट व्यवहार आपल्याला वैदिकांच्या अघोरी कृत्यांशी ओळख करून देतो आणि त्यांचा सांस्कृतिक दहशतवाद किती वर्षांपासून सुरु आहे याची प्रचितीहि देतो.
आजवर रामाचं फार वाचलंत, आता रावणाचंही वाचा.
उत्तरेकडे घराघरात रामाची मंदिरं आहेत हे माहिती आहेच,पण दक्षिणेत रावणाला आजही पुजलं जातं याकडेही दुर्लक्ष करता कामा नये. दक्षिणेत ओणम साजरा करताना आजही महाबलीची आरती केली जाते हेही विसरता कामा नये. एवढंच काय, महाराष्ट्रात भाऊबीजेला भावाला ओवाळताना बहीण 'ईडा-पीडा जावो,बळीच राज्य येवो' असं म्हणते तेव्हा त्या मागे हा सगळा इतिहास असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.आपल्या देशात अनेक आदिवासी जमाती आजही महिषासुराची पूजा करतात हेही सत्य नाकारून चालणार नाही . याचाच परिपाक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'रिडल्स इन हिंदुजम'हे पुस्तक लिहिलं आणि रामराज्यावर खरडून टीका केली,ताशेरे ओढले. सत्य कितीही झाकून ठेवलं तरी ते कितीवेळ लपून राहणार?
'असुर' हा पुस्तक नक्की वाचा आणि सत्याच्या शोधयात्रेत सामील व्हा!
भारताच्या इतिहासात आणि धार्मिक राजकारणात महत्वाचं स्थान असलेला 'नायक' म्हणून अयोद्धेयचा राजा राम आपल्याला ठाऊक आहे. अयोध्येचा राजा, सीतेचा पती, त्याच मर्यादापुरुषोत्तम असणं,शबरीची बोर खाणं,अहिल्येचा उद्धार करणं आणि महत्वाचं म्हणजे रावणाशी युद्ध करून आपल्या पत्नीला,सीतेला त्याच्या तावडीतून सोडून आणणं हे सगळे कर्तब आपल्याला ठाऊक आहेत,परिचयाचे आहेत.या प्रसंगावर महाकाव्य लिहिलं गेलं,रामायण! आजही ते वाचलं जातं. आजही या महाकाव्याचा आपल्या जीवनावर नाही म्हटलं तरी परिणाम हा दिसतोच. रामाच्या नावाचा वापर करून देशात काय राजकारण चालू आहे हे काही वेगळं सांगायला नको.
ही झाली रामाची बाजू. पण पराजित रावणाची बाजू आपण कधी वाचलीय का? आर्याच्या आक्रमणानंतर इथले द्रविड/अनार्य/असुर देशोधडीला लागले. निसर्गवादाचा पुरस्कार करणारे असुर एकाएकी असभ्य ठरवले गेले.सिव्हिलाइज्ड (स्वतःला म्हणवून घेणाऱ्या)आर्यांनी सांस्कृतिक दहशतवाद माजवला (आज चालू असलेली सांस्कृतिक राष्ट्रवादाची चर्चा हा त्याचाच पुढील भाग).
जातिव्यवस्थेची नीचोत्तम प्रथा याच काळात सुरु झाली,यज्ञयाग,कर्मकांड,पशुबळी हे सगळं याच संस्कृतीचं आपत्य! वेदांच्या प्रचार-प्रसारासाठी वाट्टेल ते केलं गेलं.दिग्नाक-चार्वाक-बळी या परंपरेला संपवून टाकण्याचा प्रयत्न झाला.
याच दरम्यान असुरांची अनेक छोटी-मोठी साम्राज्यांनी दक्षिण भारतात आपली वेगळी ओळख निर्माण करत होती. देव लोकांशी त्यांचं कधीही जमलं नाही. जमण्याचा दुरान्वये संबंधसुद्धा नव्हता. कालांतराने देव लोक शिरजोर झाल्यावर कुबेराच्या सावत्र भावाने,रावणाने समस्त असुर समुदायाचं नेतृत्व करण्याचं ठरवलं आणि स्वतःच साम्राज्य उभं केलं. समस्त असुर समुदायाला विश्वास होता कि देव लोकांना नमविण्याची,झुकविण्याची पात्रता जर कुणाच्या अंगी आहे तर ती रावणाच्या अंगी आहे.त्यामुळेच भद्र सारखा साधारण युवक रावणाच्या दरबारी रुजू झाला (भद्र हा धोबी समुदायातील होता आणि त्याच्या 'त्या' कथित टिप्पणीने सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली अशी वदंता आहे). असुर या आनंद नीलकंठ लिखित पुस्तकात हाच भद्र रावणाच्या पराजयाची आणि रामाच्या कपटनीतीची कहाणी सांगतो. रावणाने उभं केलेलं साम्राज्य,त्याचा डौल,त्याचा मान-सन्मान,त्याची महत्वकांक्षा,त्याचा अहंकार हे सगळं त्यात मांडलं गेलंय. द्राविडी परंपरेत चालत आलेल्या मिथक कथांचा आणि मौखिक कथांचा त्याला आधार आहे.
प्रत्येक दसऱ्याला रावणाचं दहन केलं जात. या दहनाने रावण कुठे मरतो काय? तो आजही जिवंत आहे,आपल्या मनात,इतिहासाच्या पानापानात...