दोन बाजी...




केशवसुत जेव्हा दोन 'बाजी' म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि बाजीराव पेशवे यांची तुलना करतात तेव्हा कदचित इथल्या परंपरावादी  सदाशेवपेठी रसिकजणांना ते 'असहिष्णू' वाटू शकते. केशवसुत हयात असते तर कदाचित त्यांना पाकिस्तानी एजंट म्हणून गौरविले असते. कदाचित त्यांच्यावर शाईफेकीचा सामुहिक कार्यक्रम आयोजित  केला गेला असता. त्यांच्या पुस्तकांच्या चौकाचौकात होळ्या केल्या गेल्या असत्या. आताचे एकूणच वातावरणाचा अंदाज घेतला तर वाटत, बर झाल हा कवी संजय भन्साळीचा समकालीन नाही राहिला. १८९५ साली केशवसुतांनी लिहिलेली हि कविता वाचा.

दोन बाजी



त्या शूरानें भगवा झेंडा हिदुस्थानीं नाचविला,
निजराष्ट्राचें वैभव नेलें एकसारखें बढतीला;
जिकडे तिकडे समशेरीची कीर्ति आपुल्या गाजविली,
खुप शर्तीनें कदर आपली गनीमांस त्या लावियली,
आणि तुवां रे ? – त्वां नीचानें पाठ आपुली दावुनियां
रणांतुनी पौबारा केला, शेपूट भ्याडा वळवुनियां !            १

गुणी जनांची पारख करुनी त्या धीरानें गौरविले,
उत्साहाच्या वातें अपुल्या तेज तयांचे चेतविलें;
प्रतीपदीपज्योति पोषिली सुजनस्नेहा वाढवुनी,
गनीममशकें कितीक गेलीं तिच्यामधें खाक् होवोनी !
आणिक तूं रे ? – नाचलासि तूं नग्रच संगें अधमांचे,
धूळ खात गेलास-लाविले सर्वत्र दिवे शेणाचे !               २

भटांस जे रणधुरंधुर तयां पाचरुनि त्या सिंहानें
माराया कीं मरावया अरिवरि नेले आवेशानें;
‘हरहर!’ शब्दा परिसुनि वळली कितिकांची घाबरगुंडी
‘अला मराठा !’ म्हणत दडाल्या सैरावैरा किति लंडी !
तूंहि भटांला पाचरियलें; काय त्यांसवें पण केलें ?-
यथेच्छ लाडू मात्र झोडिले – नांव हायरे बुडवीलें !           ३

घोड्यावरीच हुरडा चोळित शत्रुशासना धांवोनी
तो गेला.- तूं बिछान्यावरी राहिलास रे लोळोनी !
वीर भले खंबीर आणखी मुत्सद्दी ते सदबुद्धी
त्यांच्या साह्यें निजसत्तेची त्यानें केली रे वृद्धि.
पण तूं रे ?- तूं नगरभवान्या नाच्येपो-ये घेवोनी
दौलतजादा केला – धिग् धिग भटवंशी रे जन्मोनी !        ४

या भटवंशी महाप्रतापी ख्यात जाहले असूनियां
तुळशीमध्ये भांग निघाली अभद्र ऐशी कोठुनियां !
निजनामाचा ‘गाजी’ ऐसा अर्थ उरवुनी तो गेला,
तर हळहळली आर्यमाउली ऐकुनि त्याच्या निधनाला !
मरणा आर्धिच मरुन आणुनि काळोखी निजराष्ट्राला,
तूं गेलासी करुन ‘पाजी’ अहह ! पितामह नामाला !         ५


मुंबई, १६ फेब्रुवारी १८९५
करमणूक, २३ फेब्रुवारी १८९५, पृ. १३२


विषाची जिथे लावली रोपटे...



आमच्या पिढीने १९७५ साली लागू झालेली आणीबाणी पाहिली नाही, त्याबाबतच्या अतिशय रंजक अशा गोष्टी मात्र ऐकल्या. सध्या अशाच प्रकारची परंतु अघोषित आणीबाणी देशात लागू झाल्याच बोललं जातंय. आपण काय कराव,काय करू नये. काय खाव, काय खाऊ नये.काय नेसाव आणि काय नेसू नये. हे सगळे आपल्या व्यतिरिक्त दुसरे कोणी ठरवत असेल तर आजची तरुणाई हे कदापीही मान्य करू शकत नाही. आजची तरुण पिढी ज्या वातावरणात, ज्या अवकाशात वाढली, वावरली त्याचा संपूर्ण परिणाम हा त्यांच्या विचारसरणीवर आपल्याला पाहायला मिळेल. समकालीन राज्यव्यवस्थेचा बरावाईट  परिणाम हा तिथल्या जनसमुदायावर होत असतो. चांगल्या गोष्टींचे स्वागत आणि वाईट गोष्टींचा तिटकारा असणे हे सृजनशील समाजाचे उदाहरण असते. गेल्या काही महिन्यांपासून मात्र देशाच्या एकूणच सामजिक वातावरणात ज्या ज्या हालचाली, ज्या ज्या अघटीत घटना घडत आहेत ते पहिले कि वर म्हटल्याप्रमाणे अघोषित आणीबाणी  काय आहे याची कल्पना येईल. घरवापसी, लव जिहाद, गोमांस बंदी, मुस्लिमांना गरबा बंदी, गुलामअली खान यांच्या संगीत कार्यक्रमाला विरोध,पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद कसुरी यांच्या पुस्तकावर  आधारित परिसंवादाला विरोध, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन निरर्थक टीका  इत्यादी इत्यादी. या सगळ्या गोष्टींमागे राष्ट्रभक्ती,देशप्रेम,वैगेरे वैगेरे काही नाही.आहे तो केवळ धर्मांध दृष्टीकोण. केवळ गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरी मधे अखलाक मोहोम्मद नावाच्या व्यक्तीच्या घरात घुसून हिंदुत्ववादी संघटन त्याचा जीव घेते, त्याचे कुटुंब गोमांस खात असल्याची घोषणा गावातल्या मंदिरावरच्या भोंग्याने होते आणि सहिष्णू हिंदू धर्माचे आपण कट्टर समर्थक याबद्दल एक ब्र देखील काढत नाही, याचा अर्थ तरी काय? अखलाक हा ज्या अल्पसंख्यांक समुदायाचा होता, त्या समुदायाने या घटनेचा निषेध जरूर केला परंतु तो देखील आपल्या आपल्या शक्तीनुसार. सदर प्रकरणात बहुसंख्य हिंदू लोक शांत राहिले,असे जेव्हा घडले तेव्हा हि गोष्ट मात्र अधोरेखित होते  कि मूक समर्थन करून आपणही घडल्या प्रकरणाला अनुमोदन दिले. त्यामुळे दादरी हत्याकांड सरकारमान्य हत्याकांड म्हणून मानले गेले.जगभरात दुसऱ्या कोणाच्या काठीने तिसऱ्या कोणाचा, आपल्याला तापदायक असलेला  साप जर मरत असेल तर असे मूक समर्थन देण्याची जुनी परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे. कोणतीही गोष्ट भीतीदायक वातावरणात निर्माणही होऊ शकत नाही आणि वाढूही शकत नाही. त्यासाठी संवादाचे, न्यायाचे आणि समाजवादाचे वातावरण असणे गरजेचे असते हे आता सगळ्याच विकसित देशांनी मान्य केलय, आपण मात्र अजूनही विकसनशील अवस्थेमध्ये अडकलेलो असल्यामुळे कदाचित हा वैश्विक विचार आपल्याला पटत नसावा. अन्यायाला परिणामकारक आवर  घालील असे जालीम उपाय इतरत्र कोठे आहेत काय? असा प्रश्न विचारल्यास नाही असेच उत्तर येईल.न्याय हा नेहमीच कायद्याच्या अनुषंगाने होत असतो,आणि कायदा मात्र सत्तेत असलेले लोक आपल्या आपल्या फायद्यासाठी करत असतात हे मात्र विसरून चालणार नाही. त्यामुळे अखलाकला न्याय मिळेल किंवा नाही याबाबत गंभीर आणि प्रचंड अशा शंका आहेत. कायद्याच्या अनुषंगाने 'धीमे धीमे' असे हक्क पाश्चिमात्य देशाने जितक्या परिश्रमपूर्वक मिळवले त्याच पद्धतीने भारतीयांनी देखील समताधिष्ठित समाजरचनेची शाश्वती देणारे संविधान कठोर संघर्षाने मिळवले. संविधानाने बहाल केलेले स्वतंत्र, बंधुता,समता आणि न्याय हे हक्क कितीतरी किमती आहेत, हि मुल्ये याअगोदर इथल्या परंपरेत नव्हती त्यामुळेच संविधानाच्या प्रास्ताविकात ते जाणीवपूर्वक करावे लागले. हे राष्ट्र आत यापुढे उपरोक्त मुल्यांवर आधारित असणार आहे याची हमी संविधानाच्या प्रास्तविकात दिली गेली.असे असले तरीही ,कोणी मान्य करो अगर ना करो, मात्र त्यासाठी पैशाची आणि रक्ताची गंगा सतत  वाहवत ठेवावी लागते, जी सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जरूर असते परंतु त्यांच्या रक्तामासांची असते हे मात्र नक्की. याच न्यायहक्कासाठी, परिवर्तनवादी विचारासाठी, आपल्या देशात डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा.डॉ. कलबुर्गी यांना आपले रक्त द्यावे लागले. त्यांचे मारेकरी भेटतील आणि त्यांना शिक्षा होईल याची साधी  अपेक्षा देखील समकालीन सरकारकडून केली जाऊ शकत नाही अशी भयावह परिस्थिती आज देशात आहे. पुरेपूर व परिपूर्ण असा न्याय जगात कुठेही नाही. परंतु प्रत्येकाने सातत्याने त्यासाठी जीवजप घालणे हे व्यक्तीस्वातंत्र्य व न्यायाच्या दृष्टीने महत्वाचे असते. ज्यांना आपल्या संविधानिक अधिकारांची आणि कर्तव्याची जाण आहे असे लोक हा जीवजप करतात,झालेल्या प्रकारानंतर देशभरातील साहित्यिकांनी, कलाकारांनी सरकारने दिलेले मानाचे पुरस्कार परत करून लोकशाहीचा आवाज आणि नीतिमूल्यांचा जागर कायम ठेवला हे त्याचेच द्योतक आहे.

  केवळ भारतीय जनता पार्टी आणि देशाचे 'विकास पुरुष' ,पर्यायाने हिंदुत्ववादी घटकाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यामुळे हे सगळे प्रकरण सुरु झाल्याचे समजण्याचे कारण नाही.काँग्रेस सत्तेत असतानाही असे प्रकार घडत होते, दलित -आदिवासी-मुस्लिम समुदायाला तेव्हाही दिलासादायक वातावरण नव्हतेच.हिरव्या गवतातील हिरवा साप अशी काहीशी तुलना कॉंग्रेसच्या बाबतीत होऊ शकते. प्रा.डी.एन. झा यांनी  प्राचीन भारतातील लोकसमुहांच्या खाण्याच्या सवयीबद्दल एक संशोधनपूर्ण पुस्तक लिहिले होते ,या  संशोधन पुस्तकावर काँग्रेस सरकारनेच बंदी आणली होती. तेव्हा आता कितीही गोमांस हत्या प्रकारावरून पुरोगामित्वाचे सोंग कॉंग्रेस घेत असली तरी त्यामागे काँग्रेसचा हेतू सामाजिक नसून राजकीय आहे हे समजण्यासारखे आहे. फ़सिस्ट शक्तींना पूरक असे वातावरण निर्माण करण्यात काँग्रेसचा सक्रिय सहभाग असल्यामुळेच अशा परिणामांना आपण सध्या सामोरे जात आहोत. सत्तेचा उन्माद आला कि पुढचे मागचे काहीही दिसत नसते.अप्पलपोटे  सरकार  मग वाटेल ते उन्मत काम करते. ज्या शोषित, पिडीत समाजाची बाजू घेण्याची जबाबदारी राजसत्तेची असते तेच सरकार जर असे वागत असले तर न्याय मागायचं कुणाकडे? कि उपरेपणाचे जड ओझे घेवून आयुष्य घालवायचे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हा पिडीत समाज गेली ६० वर्षे शोधतो आहे. त्या समुदायाला देशाच्या एकूणच  विकासप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कुठले प्रयत्न झालेत, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला  देशाच्या कुठल्या राज्यव्यवस्थेने आणि पर्यायाने न्यायालयाने  न्याय दिला, कुठली राजसत्ता त्यांच्या संरक्षणार्थ धावून गेली हे एकदा  इथे सत्तेत असलेल्या, आणि याअगोदर  सत्तेत राहिलेल्या पक्षाने जगजाहीर सांगावे. कुणाकडूनही समाधानकारक उत्तर मिळणार नाही आणि तशी अपेक्षाही नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची  गळचेपी होत असताना, संविधानिक मुल्यांवर कोणा घटनाबाह्य शक्तींकडून निर्बंध येत असताना इथला सजग समाज कसा काय शांत बसू शकतो? क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच. ही प्रतिक्रिया कधी साहित्यिकांचा एल्गार बनून येते, तर कधी संविधानिक मार्गाने  न्यायालयाचे दरवाजे ठोठावताना दिसते. गोधरा हत्याकांडाला प्रतिक्रिया म्हणून गुजरात दंगल झाली, बाबरी मशिदीच्या पतनाला प्रतिक्रिया म्हणून मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. क्रिया प्रतिक्रियांच्या या लढाईत बऱ्याच पिढ्या भरडल्या गेल्या आणि भरडल्या जात आहेत. जागतिकीकरणाची भाषा बोलणारा आजचा तरुण धर्म विसरून माणुसकीची भाषा बोलू पाहतो परंतु इथली व्यवस्था त्याला विसरू देत नाही. तरुणाईच्या बलाचा वापर राष्ट्रनिर्मितीसाठी न करता धर्माच्या गलिच्छ राजकारणासाठी केला जात आहे हे सनातन संस्थेच्या कार्यप्रणालीवरून सिध्द व्हावे. "हाथ नही मारने, मरवाने के लिये , हाथ हे नवनिर्माण के लिये" असा आदर्श घालून देणारे स्व. बाबा आमटे याच देशात होऊन गेले यावर कदाचित पुढच्या पिढीला विश्वासही बसणार नाही अशी अराजक  परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे.
विषाची रोपटे लावली तर विषारीच फळे येणार, त्याला अमृताची फळे येण्याची अपेक्षाहि बाळगू नये.ज्या देशात महात्मा गांधींची हत्या होते आणि हत्या झाल्यावर त्यांच्या हत्येकरांचे  उदात्तीकरण करण्यात येते.शहीद दाभोळकर,पानसरे,कलबुर्गी हत्येस पात्र होते असे जाहीरपणे बोलले जाते त्या देशाची वाटचाल इसीसच्या मार्गाने चालू आहे. संदर्भ वेगळे असले तरी येणाऱ्या काळात आपण धर्मांधतेच्या गर्तेत पुरते अडकले जाऊ आणि भारताची ओळख दुसरा अफगाणिस्तान अशीच असेल. वेळीच सावरलो तर उत्तमच. नाही तर पुढची  कितीतरी वर्ष या देशात फुले -शाहू-आंबेडकर  जन्माला येण्याची वाट पहावी लागेल आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. पुन्हा नव्याने सुरुवात करण्यापेक्षा समतेचा हा रथ पुढे नेण्यासाठी तरुणांनाच पुढाकार घ्यावा  लागणार आहे. 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है?' या चित्रपटातून तत्कालीन सामाजिक बदलांवर विचार करणारा 'अल्बर्ट पिंटो'  अभिनेते नसरुद्दिन शाह यांनी न्यायिक भावनेने साकारला. आजपर्यंत शाह हि भूमिका जगत आलेले आहेत. परंतु आज नसरुद्दिन शाह यांनादेखील त्यांच्या मुस्लिम असण्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागत आहे. हि नक्कीच निंदनीय घटना आहे. जग बदलतंय आपणही बदलल पाहिजे. काळाबरोबर राहिलो नाही तर डायनासोर सारखे लुप्त होऊन जाऊ.डायनासोर परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्यास अक्षम ठरले, कितीही केले तरी ते प्राणीच.आपण मात्र पृथ्वीतालावरील सर्वात हुशार मनुष्यप्राणी आहोत. आपापसात भांडून नष्ट झालो तर आपल्यासारखे करंटे आपणच.

इंजी. सागर भालेराव        
9595842238

दुष्काळ दिवाळी

या वर्षी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी ठरवल की यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत साजरी करावी.त्यादृष्टीने मग नियोजन सुरु झाले.यंदा पाऊस नाही म्हणुन नापिकी,आणि त्यामुळे बळीराजाचि दयनीय अवस्था.पण ज्याच्या राबन्यावर जनता जगते, जग जगते त्याच्या संकटसमयी जर आपण त्यांच्यासोबत उभे नसु तर आपल्यासारखे करंटे आपणच.
मग दुष्कलग्रस्त जिल्ह्यात छात्रभारतीचे पुणे,नगर,मुंबई, बार्शी, नाशिक टिमचे कार्यकर्ते पोहोचले.सुरुवात झाली उस्मानाबाद जिल्ह्यापासून. दुष्काळ जाहिर करायला मायबाप सरकारला एक महीना उशीर झाला,त्यामुळे पाणी आणि धान्य टंचाई सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात पाहायला मिळते. अगोदर 4 नोव्हेंबरला परांडा तालुक्याच्या गावी गेलो.तालुक्यांच् गाव असल तरी परिस्थिति फार काही चांगली नाही. परांडा हां तिथल्या किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहेच पण यंदा तिथल्या दुष्कालामुळे प्रसिद्धित आहे. 3 रूपये प्रति हंडा दराने येथे पाणी विकले जाते. खाजगी बोर,सायपन असलेले सुखवस्तु शेतकरी हा धंदा करतात.विकतचे पाणी घ्यायला गावकर्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पाणी देखील पिवळे धमक!

त्याच संध्याकाळी परांडा शहरापासून 15 किमी असलेल्या ढगपींपरी गावाला भेट दिली.इथे तर दुष्काळ ढग होऊन कोसळलाय.400-500 लोकवस्तीच हे गाव. गावात प्राथमिक शाळा आहे, खेड़े या पारंपरिक कल्पनेत असलेल्या प्रतिमेशी अगदी तंतोतंत् जुळणारे हे गाव. गावात भायाण दुष्काळ। तिथे कार्यकर्त्यांनी शेतकार्यांशी संवाद साधला. एक पथनाट्य सादर केले. चिमुरड्या मुलांसाठी आनलेला खाऊ देण्यात आला. त्यानंतर त्या गावात एका शेतकऱ्याने 20 ऑक्टोबर 2015 ला आत्महत्या केलि होती त्या घरी पोहोचलो.महादेव कोथमिरे हे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव. घरात अठराविश्वे दारिद्र्य.इंदिरा आवास योजने अन्तर्गत बांधलेले हे झोपड़ीवजा घर. महादेव कोथमिरे यांना केवळ अर्धा एकर जमीन,म्हणजे हे अत्यल्प भूधारक! गेल्या तीन वर्षापासून शेतीतून काहीही उत्पन्न नव्हते.कर्जबाजारी होऊन शेवटी शेजारच्या गावात सालगड़ी म्हणुन काम घेतले.वयाच्या 15 वर्षीच् लग्न होऊन गेलेली मुलगी, दूसरी हाताने अपंग असलेली नववीला जाणारी मुलगी. चौथी इयत्तेत शिकनारा मुलगा आणि पत्नी, असा हा प्रपंच। कुटुंबाची होणारी परवड पाहून ज्या शेतात सालाने काम करत होता,तेथेच चिंचाच्या झाडाला फास घेवून महादेव कोथमिरेने गळफास घेतला.बळीचा आणखी एक वंशज इथे संपला.दुसऱ्या दिवशी तहसीलदार साहेबांना पीड़ित कुटुंबासोबत भेटलो. तहसीलदार साहेब कसल्या त्या मिटिंगमधे व्यस्त होते, 15 दिवसांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी असे सर्वाधिकार तहसीलदरांना असतानाही केवळ शासकीय दिरंगाइ, मुख्यमंत्र्यांकडे फाइल पाठवली आहे असे सांगून तहसीदार यांच्याकडून वेळ मरण्यात आली.
यावरून सरकार दुष्कालग्रस्त लोकांबाबत कीती उदासीन आहे हे पाहायला मिळाले.
दुसऱ्या दिवशी 5 नोव्हेंबरला वांगी बुद्रुक या गावी गेलो.तिथे देखील सारखीच परिस्थिति थोड्याबहुत फरकाने. इथे देखील शेतकरी, शाळेत जाणारे मुले यांच्याशी संवाद साधला. या गावात देखील एका शेतकरी महिलेने स्वतःला जाळून घेतले.इतकी भयानक परिस्थिति असताना सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष अतीव निंदनीय असे आहे.
पुढे नलदुर्ग, लातूर असा दौरा केला. स्वाति पीटले या ज्या मुलीने बस पाससाठी पैसे नाही म्हणुन आत्महत्या केली, तिच्या घरी देखील भेट दिली. गावातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींशी संवाद साधला.आपल्याआपल्या परीने धीर देण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती भयानक आहे,एकीकडे दिवाळीचे आकाश कंदील पेटत असताना इकडे दुष्कालामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे पेटत आहेत याचीही दखल घेतली जावी.
जायाकवाडीला पाणी देणार नाही पण आमचे एक्वा प्लांट देखील बंद करणार नाही अशी दुटप्पी
भूमिका घेणाऱ्या नगर जिल्ह्यातील साखरसम्राट पुढऱ्यांना ढगपींपरी आणि वांगी बुद्रुक गावात नेवुन सोडले पाहिजे. विरोधी पक्षातील लोक देखील या प्रश्नाबाबत अतिशय उदासीन आहेत.
शेतकरी राजा मात्र हवालदिल आहे, परिस्थिति बदलली पाहिजे नाही तर अराजकता आल्याशिवाय राहणार नाही।

शांती कि कोई एहमियत?






माननीय कैलाश सत्यार्थी.
शांती नोबेल पुरस्कार विजेता,
भारत.

शत शत प्रणाम!

बहुत  दिनो बाद आज आपकी याद आयी है | मौका भी तो वैसा है | गये कुछ दिनो से भारतवर्ष में जो कुछ हो रहा है उस बीच आप कही भी नजर नही आये,सोचा चलो आपको तो याद आती नही तो  क्यू ना हम हि आपसे बात कर ले| बहुत दिनो बाद अपने देश को आपके रूप पे नोबेल अवार्ड मिला,और वो भी 'शांती' नोबेल अवार्ड| पुरे दुनिया को शांतीके मार्ग से कैसे जिता जा सकता है ये आपने दिखा दिया| जब पुरा देश गोमांस के बनावट काली करतुद से दुनिया में बदनाम हो रहा है, तब आप कही दिखाई नही दे रहे| अखलाक अहमद को पिटपिट के मारा दीया गया ,इसके बाद अपने  देश के जागृत साहीत्यकारोने उन्हे नवाजे गये पुरस्कारोको वापस करते हुए देश कि अखंडता के खिलाफ काम करने वाली फासिस्त शक्ती को जोरदार तमाचा दिया | इस बीच भी आप कही नही दिखे|  कल फरीदाबाद में एक दलित परिवार के घर को जला दिया गया, इस बीच में दो मासूम बच्चो कि मौत हो गयी, आप तो बच्चो के लिये काम करते हो, इस बीच भी आप कही नही दिखे| शायद, दलित बच्चे आपके सो कोल्ड 'बचपन बचाव आंदोलन' का हिस्सा नही है, इसीलिये उनका बचपन जातीवाद के आंग में जलता रहा, तब भी आप कही नही दिखे| अगर आप भूल गये हो तो याद दिलाता हुं, आपके साथ पाकिस्तान कि मलाला युसुफजाई को भी शांती का नोबेल अवार्ड मिला, जो देश अपने स्थापना से कभी भी एकदिल से रेह नही पाये, उन दो देशो को साथसाथ नोबेल पुरस्कार मिलना आश्चर्य  कि बात थी| तब शायद लगा कि अब दोनो देशो के बीच शांतता प्रक्रिया अब आग बढेगी| पर जब गुलाम अली खान साहब के संगीत समारोह को शिवसेना नामक कोई उग्रवादी संघटन विरोध कर रहा था, तब भी आप कही नही दिखे| डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी जैसे प्रोग्रेसिव विचारधारा के लोगो कि दिनदहाडे बंदूक कि गोलीसे हत्या हो रही थी, लोग सडको पे उतरकर विरोध कर रहे थे, तब भी आप कही दिखाई नही दिये|

 गये साल मुंबई में हुई  इंडियन सायन्स कॉंग्रेस में पत्रकार परिषद में मैने आपको सवाल किया था, कि क्या अब पाकिस्तान और भारत को नोबेल मिलने के बाद दोनो देशो में शांतिवार्ता होगी? तब आपने बडे चालाखी से जवाब दिया था कि, में मलाला को अपनी बेटी मानता हुं| कोई पिता और कोई बेटी सीमापर  बैठकर अगर शांतिवार्ता होती तो सब सवाल खतम हो जाते| चलो दो देशो के बीच में अमन कि बात चलाना ये मुश्किल बात हो सकती है,पर अपने देश का क्या? नोबेल पुरस्कार लेने के बाद दिये हुए भाषण में आपने  वेदो में लिखी हुई कुछ पंक्तीया सुनाई,और अपना देश कितना सहिष्णू है इसका दाखिला दिया| अपना देश गांधी और बुद्ध कि भूमी है ऐसा भी  आपने कहा, पर जब खुले आम मानवता कि हत्या हो रही है, गांधीजी के खुनी को देशभक्त कहा जा रहा है, तब आप कहा हो? आपको हालही में 'जागतिक मानवियता पुरस्कार' से  हार्वर्ड विश्वविद्यालय ने सम्मानित किया,सून कर बडा हर्ष हुवा| लेकिन जब आपको मानवियता पुरस्कार मिल रहा था तब अपने देश के अल्पसंख्यांक मुस्लिम और दलित लोग हिंदुत्ववादी संघटन के अमानवीय कृत्योसे लड रहे थे| शायद इससे आप गुमराह होगे, आपने ये बात नजरंदाज कि ऐसा हम नही कहेंगे|

ये सब बताने का कष्ट कर रहा हुं क्योकी अपने देश में शांतता का नोबेल पुरस्कार प्राप्त आदमी है ये लोग भूल गये है , और शायद लोगो के साथ आप भी ये महत्वपूर्ण बात भूल गये हो | यही बात आपको याद दिलानी थी,बाकी कुछ नही| देखिये, वक्त मिल जाये तो अपने देश में हो रहे अमानवी कृत्यो के बारे में भी बात करे| नही तो आनेवाले वक़्त मै 'शांती' कि कोई एहमियत नही रहेगी|

शांती- अमन का चहिता और भारत देश का एक नागरिक
सागर 

पद्मश्री आर.के. लक्ष्मण



चित्रकला हा सगळ्या बाल गोपाळांचा आवडीचा विषय असतो.लहानपणी "छंद" म्हणून जरी हा विषय हाताळत असले तरी फारच कमी लोक व्यवसाय म्हणून या कलेकडे बघत असतात.आणि त्यातल्या त्यात फार कमीच लोक त्यात प्रसिद्धीस पावतात.चित्रकलेतला अर्कचित्र,व्यंगचित्र हा तर सगळ्यांच्याच आवडीचा,निवडीचा आणि आकर्षणाचा विषय.पण केवळ काळ्या रेषेतून पांढऱ्या कागदावर रेघोट्या ओढण्याईतक हे सोप काम नाही.भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि राजकारणाने बरबटलेल्या देशात व्यंग शोधायला पुरेपूर वाव आहे. शोधाल तिथे विषय आणि बघाल तिथे आशय असा हा देश कलाकार मन असलेल्या व्यक्तींना नक्कीच भावला आहे.आपल्या व्यंगचित्रात तोचतोचपणा येऊ नये यासाठी फार कमी लोक मेहेनत घेत असतात ,आणि अशा काही मोजक्या चित्रकारांमध्ये शिरोमणी कोणी असतील तर ते आहेत आर.के.लक्ष्मण. 
     रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मस।  ।    


मधुन न  पूर्ण नाव.जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदी पर्यंत पंतप्रधानांची राजकीय कारकीर्द बघितलेला हा प्रगल्भ माणूस.राजकीय चित्रकार म्हणून ते संपूर्ण भारतवर्षाला माहित आहेत.भारतामध्ये तरी दीर्घकाळ व्यंगचित्रकार काढणारे एकमेव कलाकार म्हणून त्यांची ओळख नाकारता येणार नाही.लोकशाहीवादी भारतात खर तर  व्यंगचित्रकाराला येथील सगळेच पुढारी विषय देत आले आहेत.परंतु हे विषय कळणे,त्यावर समूळ  विश्लेषण व्हाव, वाचकांना चुटकीसरशी आकलन होईल अस व्यंगचित्र काढण हे महाकठीण काम पार पाडण्यात आर.के.लक्ष्मण यांचा नेहमीच हातखंडा होता.विषयाची वस्तुनिष्ठता तपासून त्यावर यथायोग्य भाष्य करणे हे येरागबाळ्याचे काम नक्कीच नाही.त्यामुळे तर देशात आणीबाणी लागू असतानाही तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी लक्ष्मण यांना राजकीय व्यंगचित्रे काढण्याची अनुमती दिली, आणि अशी व्यंगचित्रे लोकशाहीला अधिकच परिपक्व करतील असा शेराही दिला.केवळ या प्रसंगावरून लक्ष्मण यांची प्रगल्भता लक्षात यावी.जे.जे.आर्ट्स स्कूल म्हणजे कलाविषयक आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठ.या कॉलेज मध्ये प्रवेश मिळावा आणि आपले चित्रकार होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी लक्ष्मण  यांनी देखील अर्ज केला होता आणि सोबत नियमाप्रमाणे आपल्या अर्कचित्रांचे  काही नमुने कॉलेजकडे पाठविले होते.काही दिवसांनी कॉलेजकडून उत्तर आले कि,तुमची चित्रकला हि परिपूर्ण नाही आणि तुम्ही आमच्या शिक्षणसंस्थेत कलेचे शिक्षण घेण्यास अपात्र आहात. उपरोक्त सबबीवर जे. जे. स्कूल ऑफ आर्टने लक्ष्मण यांना प्रवेश देण्यास नकार दिला होता.देशातील नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला नाही म्हणून लक्ष्मण निराश झाले नाही.उलट आणखी उत्साहाने आपली "पात्रता" दाखवून देण्यासाठी आपली कलासेवा सुरु ठेवली.पुढे कालांतराने "टाइम्स" मध्ये कार्यरत झाल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळाली .योगायोगाने टाइम्सचे कार्यालय आणि जे.जे. ची इमारत शेजारी शेजारी होती. राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांना एव्हाना प्रसिद्धी मिळाली होती; त्याच बळावर आणि कौतुकामुळे ज्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सने लक्ष्मण यांना प्रवेश नाकारला त्यांनीच लक्ष्मण  यांना स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बोलावले.अशा हरहुन्नरी कलाकाराला चार भिंतीत घडविण्यापेक्षा चार लोकांमध्ये घडविण्याचा नियतीचा विचार असावा. अशी फार कमी कर्तुत्ववान माणसे  असतात त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मण.
      "यु सेड इट" या नावाने टाइम्स मध्ये येणारे व्यंगचित्राचे सदर लक्ष्मण यांच्या विशेष शैलीमुळे अतिशय लोकप्रिय ठरले.विविध भाषा,प्रांत,चालीरीती,वेशभूषा असलेल्या आपल्या देशात प्रत्येक राजकीय निर्णयाचा,घडामोडीचा बाधक हा इथला 'सामान्य' नागरिक असतो.या सगळ्या विविध गोष्टी दाखविण्यापेक्षा संपूर्ण देशाची ओळख असणार एकच पात्र असावं अशी भन्नाट कल्पना लक्ष्मण यांच्या सुपीक डोक्यात आली.आणि यातून साकारला गेला तो डोक्याला टक्कल असलेला,मिशा असलेला,उभ्या आडव्या चौकटीचा कोट घातलेला आणि धोतर नेसलेला,खांद्यावर काठी आणि काठीला अडकवलेल गाठोड घेऊन निघालेला "कॉमन मैन. अल्पावधीतच हा कॉमन मैन देशातील प्रत्येक जनसामान्याचा  प्रतिनिधी बनला.हा सामान्य माणूस कधी अर्कचित्रातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावायचा तर कधी पुराची पाहणी करायला निघालेल्या मंत्र्याच्या हैलिकाप्टर पाहणी करायला जायचा.कधी सीमेवर युद्ध बघायला जायचा तर कधी राजनेत्याच्या प्रचारसभेत अगदी स्टेजवर जाऊन बसायचा.काहीही न बोलता प्रतिक्रिया देणारा हा कॉमन म्यान मग अल्पावधीत मूकनायक बनला.त्याची निर्मिती करणारे लक्ष्मण मग भारतीय राजकारणातल डोळस व्यंग शोधून त्यावर भाष्य करू लागले.
       सुप्रसिद्ध लेखक पद्मश्री आर.के. नारायण हे लक्ष्मण यांचे ज्येष्ठ बंधू.त्यांनी साकारलेल्या मालगुडी डेज या कथासंग्रहात असलेल्या काल्पनिक 'मालगुडी' या गावाला जिवंतपणा देणारी व्यंगचित्रे लक्ष्मण यांनी काढली.८० च्या दशकात दूरदर्शनवर झळकणारी मालगुडी डेज हि मालिका अजूनही रसिक प्रेक्षकांच्या मनावर गरुड गाजवत आहेत.असे कलाकार पुन्हा होणे नाही.कलेच्या क्षेत्रात आपल जीवन समर्पित करून त्या कलेच व्रत हाती घेणारे लक्ष्मण हे अनन्य साधारण असे व्यक्तिमत्व होते.९३ वर्षे वय असूनही कालाशक्ती जागरूक असलेले लक्ष्मण बुद्धीने तल्लख होते.आपले शरीर थकले असले तरी मेंदू थकलेला नाही असे ते नेहमी म्हणायचे.त्यांच्याच तोडीचे चित्रकार  एम.एफ. हुसैन यांना आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेल्या  हल्ल्यामुळे जेव्हा देश सोडून जावा लागला तेव्हा हा  कलाकार देखील अस्वस्थ झालेला या देशाने पाहिलेला होता.अलीकडेच 'चार्ली हेब्डो' वर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला गेला.कलाकाराला जात धर्म आणि पंथ नसतो.नवरचनावादाचा पुरस्कार करणारे कलाकार विवेकवादी असतात.हाच विवेक लक्ष्मण यांनी आयुष्यभर जपला.लक्ष्मण हे आपल समृध्द जीवन जगले.किती तरी सरकारे लक्ष्मण यांच्या साक्षीने घडली आणि बिघडली.अशा अनेक सूक्ष्म घडामोडींचे साक्षीदार असलेले लक्ष्मण आपल्यात आज नसले तरी त्यांच्या हाताने रेखाटलेल्या रेघोट्या आपल्या भावी पिढीवर संस्कार करणाऱ्या आहेत.लक्ष्मण आपल्यातून गेले असले तरी  त्यांचा  कॉमन म्यान अजूनही आपल्या आसपास आहे.इथल्या प्रत्येक घडामोडीवर तो लक्ष ठेवून आहे.जिथे आपण चुकणार आहोत तिथे तो त्याच्या हातातील काठी आपल्या माथी मारणार आहे.या कॉमनमॅनचा वचक जो पर्यंत या व्यवस्थेवर आहे तोवर 'सामान्य' माणूस निश्चिंत आहे.

राजकारण नव्हे माजकारण. सहाजिक!

 


              प्रचलित परंपरेतील  धर्म सोडण, प्रांत सोडण अगदी सोप असत पण संस्कृती सोडण हे मात्र अतिअवघड. अशक्यातील अशक्य गोष्ट म्हणजे संस्कृतीला तिलांजली देण. हीच संस्कृती कधी समृध्द अडगळ बनते तर कधी बाजारबसवी झालेली गोलपिठाच्या वस्तीत पाहायला मिळते, कधी लाहोरच्या मुशायरामध्ये तत्वज्ञान सांगताना आढळते तर कधी सिंध प्रांतातील लारकानामध्ये उर्दू गझल ऐकताना सापडते. सहाजिकच.संस्कृती ही अशी हजारो वारसांच्या आणि वर्षांच्या नेणीवेतून आलेली उत्पत्ती असते, ती एका रात्रीतून टाकून देता येत नाही. जाणीव थंडावल्या असल्या तरी ज्यांच्या नेणीवा शाबूत आहेत अशा लोकांना शिवसेना नामक  माजकारणी पक्षाने गुलाम अली साहेबांच्या गझल कार्यक्रमाला केलेल्या विरोधाचे आणि तो कार्यक्रम रद्द झाल्याचे ऐकल्यावर नक्कीच असहाय्य वाटले असणार.सहाजिकच. जेव्हा जीवनावश्यक गोष्टी मिळाल्यावर मानवी जीवन स्थिरस्थावर झाले तेव्हा उद्योगी मेंदूला कला आणि सर्जनशीलता सुचली. त्यातून मग संगीत,नाट्य आदी सर्जनशील कलाकृतींची निर्मिती झाली. हे सगळ घडायला लाखो वर्षे लागली, आणि मानवी बुद्धीची वैचारिक जडणघडण त्यायोगे होत गेली. ही झाली सृजनशीलता ज्यातून सुजाण नागरिक घडेल आणि समाजकारणात आपला सहभाग देईल असे अपेक्षित होते.सहाजिकच.

परंतु हाच मानव अतिहुशार झाल्यावर धर्म नामक अफूच्या गोळीचा मुरीद बनला, वेदांआधी माणूस होता हे तो  विसरलो आणि हळूहळू धर्म-जात-पंथ याच्या आक्राळविक्राळ  भिंती उभ्या राहिल्या.माणूस मग धर्माच्या नावावर विखुरला गेला आणि कधी इस्लामिक राष्ट्र तर कधी हिंदुराष्ट्राची सनातनी मागणी करू लागला ते सुद्धा सहाजिकच. त्यांच्या रडारवर मग कधी आतिफ असलम, कधी आबेदा परवीन तर कधी गुलाम अली साहेब राहिले. राजकीय संघर्षाच्या वांग्यावरच तेल मग सांस्कृतिक संघर्षावर येऊ लागल. नकळत आपण इतके कट्टर बनलो की अनेक विषयांची सरमिसळ करत नवा सांस्कृतिक दहशवाद निर्माण करण्यात यशस्वी ठरलो. गाणे गाणारी मंडळी चालतील पण विचार  गाणारे लोक नको म्हणून इथल्या विद्रोही कवींना आणि लेखकांना जीवे मारण्याचे फतवे काढले गेले. या प्रत्येक गोष्टीमागे राजकारण आणि त्यायोगे आलेलं हिंसावादी प्रदर्शन होत हे विसरता येणार नाही, सहाजिकच.

हे कट्टरतावादी लोक जेव्हा  गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरीच्या मंदिरावरून अखलाकला मारण्याची आरोळी देत होते तेव्हा गप्प होते, घरात शिरून त्याच्या कुटुंबाला मारहाण केली जात होती आणि एक जीव घेतला जात होता  तेव्हा देखील हे चूप होते. त्यांनी ना निदर्शने केली ना संताप व्यक्त केला. सहाजिकच.जेथे माणुसकी गायली जात नाही तेथे कलाकार काय गातील? गुलाम अली साहेब जेव्हा गाण गात असतात तेव्हा ते कुठल्या धर्माचे, देशाचे नसतात त्यांच्या गाण्यातून मिळणारा स्वर्गानंद देखील कुठल्या पंथाचा नसतो, बुरसटलेले लोक त्याला आपल्या अविचारी डोक्याने भगवा किंवा हिरवा रंग देत असतात . कारण रंग देखील तुमच्या आमच्या नेणीवेतून आलेला असतो, तेव्हा त्याच भावनिक भांडवल करण हे त्या माजकारणी लोकांना सहजशक्य असत, कारण आम्ही प्रचंड  भावनिक आणि धर्माभिमानी असतो.सहाजिकच. सुरक्षेत्र नामक एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये ज्युरी म्हणून पाकिस्तानी गायक आहेत म्हणून खाज ठाकरे नामक अशाच एका माजकारणी माणसाने या कार्यक्रमाला विरोध केला होता आणि त्यावेळी एक कलाकार म्हणून खाज ठाकरेला उत्तर स्वतः आशा भोसले यांनी दिले होते. तेव्हा असे थिल्लर आंदोलन करून प्रसिद्धीच्या झोकात राहण्याही खानदानी परंपरा शिवसेना जपते आहे.बाकी काही नाही. पाकिस्तानी क्रिकेटर आणि अंडरवर्ड डॉन दाउद याचे व्याही जावेद मियादाद याला मातोश्रीवर बोलावून त्याचा पाहुणचार करणाऱ्या हिंदूहृद्यसम्राट बाळ ठाकरे यांच्या आत्म्याला गुलाम अली साहेबांची बातमी ऐकून प्रचंड वेदना झाल्या असणार.सहाजिकच(प्रचंड प्रश्नचिन्ह).

आदेश बांदेकर नामक भावोजी याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले, हे साहेब देखील एक स्वयंघोषित कलाकार आहेत जे पैठणी साड्या उभ्या महाराष्ट्रातील महिला वर्गाला देत फिरतात. त्यांच्या एकाही कार्यक्रमात अजूनपर्यंत मुस्लिम महिला आपण पहिली नसेल, एवढेच कशाला सिद्धार्थनगर, कांबळेवस्ती किंवा राजवाड्यातील एकही महिला अजून या मंचावर ह्या महाशयांनी आणलेली नाही. ते कलाकार जरी असले तरी त्यांच्या पक्षाची हुजरेगिरी आणि जोहारकी करणारे हे उत्तम कलाकार आहेत. कलाकार या साधनेच्या कुठेही आसपास न फिरणारे हे व्यक्तिमत्व लवकरच आमदारकीसाठी पात्र ठरतील अशी चिन्हे आहेत. सहाजिकच. पण त्याने गुलाम अली साहेबांच्या कलाकारीवर फरक पडत नसतो, भारतीय जाणकार रसिक त्यांना या अगोदरही ऐकत होते आणि यापुढेही ऐकत राहणार.सहाजिकच. बाकी वाघाची डरकाळी आता गाईच्या हंबरण्यात रुपांतरीत झाली आहे याकडे लक्ष असावे.आपले लक्ष असेलच.सहाजिकच.

ऑक्सफर्ड विद्यापीठात खा. शशी थरूर यांनी ब्रिटीशांची घेतलेली विकेट.

                

ब्रिटीशांनो  २०० वर्षाच्या लुटीची परतफेड कशी करणार ?




ऑक्सफर्ड विद्यापीठात खा. शशी थरूर यांनी ब्रिटीशांची घेतलेली विकेट.      



अध्यक्ष मोहोद्या, आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार.

मी इथे,प्रतिष्ठित अशा संस्थेमध्ये केवळ आठ मिनिट वेळ घेवून तुमच्या समोर उभा आहे.तुम्हाला अगोदरच खात्री देतो कि मी माझे भाषण मी लांबवणार नाही. 
मी इथे या चर्चासत्रात एका महत्वाच्या मुद्द्यावर  आपले लक्ष केंद्रित करू  इच्छितो, आतापर्यंत या चर्चासत्रात ज्या काही लोकांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत, अगदी त्याला विरोधी अशी माझी  भूमिका मी इथे मांडणार आहे. सर रिचर्ड ओट्वे अस सुचवतात कि,वसाहतींच्या आर्थिक सुधारणांसाठी ज्या काही क्लुप्त्या साम्राज्यशाहीकडून चालविल्या गेल्या त्या सगळ्या क्लुप्त्या ब्रिटीश वसाहतवादाच्या भंपक चुका होत्या.

अगदी त्याच धर्तीवर भारताच्या संदर्भात मी इथे काही उदाहरणे देवू इच्छितो. ब्रिटीश राज्यव्यवस्था सुरु होण्याच्या अगोदर   जागतिक उत्पन्नात भारताचा २३% हिस्सा होता, आणि ब्रिटीश भारत सोडून जाताना ही आकडेवारी केवळ ४% इतकी होती. का असे घडले असेल? साहजिक आहे, केवळ आपल्या फायद्यासाठी ब्रिटिशांनी भारताचा उपयोग केला हे मात्र कुणालाही समजण्यासारखे आहे.
ब्रिटीश साम्राज्याची जी काही भरभराट आहे ती केवळ २०० वर्षे भारताच्या चालवलेल्या लुटीमुळे आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि खरे पाहता, ब्रिटीश साम्राज्यात औद्योगीकरण वाढीस लागले त्यामागे कारण होते, भारताची औद्योगिक क्षेत्रातील वाताहत, जी ब्रिटिशांनी केली. 
उदाहरण घेवूया, भारताचा हातमाग व्यवसाय हा जगप्रसिध्द होता.जगभरात भारतीय बनावटीच्या हातमागाचा व्यवसाय पसरलेला होता.भारतात बनलेला, बारीक ताग्याची वीण असलेला आणि वजनाने हलका असलेला  मलमलचा  कपडा जगप्रसिध्द होता. असे बोलले जाते कि, जेव्हा ब्रिटीश भारतात आले तेव्हा त्यांनी हातमाग कारागिरांचे बोटे कापली,त्यांचे हातमागाचे साहित्य नष्ट केले, हातमागावर बनलेल्या कापडावर अधिक कर लावला. त्यानंतर भारतातून कच्चा माल इंग्लंडला नेण्यास सुरुवात झाली आणि तिथे प्रक्रिया करून आणलेला माल संपूर्ण जगभरात  विकण्यास सुरुवात झाली.इंग्लंडच्या असुरी कपड्यांच्या मिलमध्ये भारतीयांचा कच्चा माल प्रक्रियेसाठी जात होता हे विसरता येणार नाही. याचा अर्थ असा झाली कि, भारतात कमवणारे हात वसाहती आल्यानंतर  भिक मागणारे हात झाले.हातमागाची निर्यात करणारा एक संपन्न देश अल्पावधीतच हातमागाची आयात  करणारा देश बनला. २७% जागतिक उत्पन्नात हिस्सा असलेल्या देशाचे हे प्रमाण त्यामुळे २ टक्क्यापेक्षाही कमी झाले. आणि याच दरम्यान, रोबेर्ट क्लाइव्ह यांच्या सारख्या वसाहतवादी लोकांनी 'दुषित नगर' ही संकल्पना जोरात राबवली, ज्यायोगे ब्रीटीशांकडून भारताची लूट चालणार होती.त्यामुळे ब्रिटिशांनी जसा 'लूट' ह्या शब्दाचा समावेश ऑक्सफोर्ड डिक्शनरित केला तसाच त्याचा उपयोग व्यवहारात देखील आणला.(लोकांचा हशा आणि प्रतिसाद)...आणि ब्रिटिशांना देखील असे पित्त उठले कि त्यांनी क्लाइव्ह यांना "क्लाइव्ह ऑफ इंडिया" अशी उपाधी दिली.यावेळी ब्रिटीश हे देखील विसरले कि आपण जे काही  केले आहे  त्याहून वेगळे क्लाइव्ह यांनी विशेष काही केलेलं नाही.(हशा)
१९ व्या शतकाच्या शेवटी शेवटी  भारत म्हणजे केवळ दुध देणारी गाय अशी परिस्थिती निर्माण झाली.भारत हा ब्रिटीश वस्तूंची सर्वात जास्त  खरेदी करणारा देश ठरला.ब्रिटीश  अधिकाऱ्यांचे पगार हे भारतातून मिळवलेल्या उत्पन्नावरून भागवले जात असत.आम्ही भारतीयांनी आमच्यावर झालेल्या प्रयोगाची  किंमत स्वतःच दिली आहे.

ब्रिटीश साम्राज्यावाद्यांनी अगदी गुलामांच्या व्यवसायातून सुद्धा आपली पोटे भरली. ब्रिटनमधला १/५ अभिजन वर्ग हा १९ व्या शतकात गुलामांच्या खरेदीसाठी पुढे होता. या दरम्यान थोडेथीडके नाही तर सुमारे, ३ दशलक्ष आफ्रिकन गुलाम निर्यात केले गेले अशी नोंद आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही कि, १८३३ साली गुलाम पद्धती बंद झाली खरी, परंतु त्या गुलामांना भरपाई देण्यात आलेल्या २० दशलक्ष पौंड रकमेचे काय झाले?इतकी मोठी रक्कम गुलामांच्या पुनर्वसनासाठी वापरनेणेअपेक्षित होते, परंतु ही रक्कम जे गुलाम खरेदी करण्यासाठी पुढे होते अशा अभिजन वर्गानेच लांबविली.

इथला वाय-फायचा पासवर्ड ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो, हा पासवर्ड इथले उदारमतवादी नेते श्री. ग्लाडस्टोन यांच्या नावे आहे.मला माफ करा,पण मला हे इथे नमूद करायचे आहे कि श्री. ग्लाडस्टोन यांचे कुटुंब सुद्धा गुलामांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या पैश्यातून संपन्न झालेले होते.

असो, आता पुन्हा भारतीय संदर्भ लक्षात घेवूया, ब्रिटीश साम्राज्यशाही असताना १५-२९ दशलक्ष भारतीय उपासमारीमुळे मेल्याची  नोंद आहे. याबाबत असे उदाहरनण आहे कि, दुसरे महायुध्द सुरु असताना बंगाल प्रांतामध्ये दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळात ४ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला.याला कारण म्हणजे, विस्टन चर्चिल यांचे दुष्काळग्रस्त लोकांपेक्षा सरकारी कामावर, सूक्ष्म नियंत्रणावर जास्त भर होता. एवढेच नाही तर भारतीय दुष्काळग्रस्त लोकांपेक्षा आपल्या युरोपीय नागरिकांना अन्न मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.चर्चिल म्हणाले होते कि, "आमच्यासाठी अशक्त बंगाली भारतीयांपेक्षा, सशक्त ग्रीक नागरिक महत्वाचे आहेत''.खुद्द चर्चिल ह्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. जेव्हा त्यांना त्यांच्या या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा मात्र त्यांनी दर्पोक्ती अशी केली कि, जर भुकमारीने लोक मरत असतील तर मग उपोषण करणारे गांधीजी अजून कसे जिवंत राहिले?.
भारतात आपली जुलूमशाही प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिशांनी ज्या काही कल्पना योजल्या त्यामुळे ब्रिटीश वसाहतीस फायदा झाला असा जर कुणाचा समज असेल तर मला क्षमा  करा,कारण १९४३ साली चर्चिल यांनी जी भूमिका घेतली त्यातून हे प्रतीत होते कि त्यांची त्यावेळीची भूमिका ही केवळ मिथक ठरली.त्याचबरोबर असेही मानले जात एकी ब्रिटीश वसाहतीच्या काळात हिंसा,वर्णभेद यांचे स्तोम माजले.ब्रिटीश साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळणार नाही असे म्हटले जायचे,हे एका अर्थाने खरे सुद्धा आहे कारण, काळोखात ब्रिटीश साम्राज्य ठीकपणे चालू शकेल अशी ईश्वराला सुद्धा खात्री नाही. (हशा)

पहिले महायुध्द उदाहरणादाखल घेतले कि समजते, श्री. लि यांनी सुचवले कि, ब्रिटीश साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हा निर्धारित मोजपट्टीत मोजता येण्याजोगा नाही.ठीक आहे, मला पहिले महायुध्द आपल्यासाठी निर्धारित करायचे आहे. पुन्हा मला माफ करा, तुम्ही सगळे आपल्या आपल्या देशाच्या परीक्षेपात बोललात,मला मात्र माझ्या भारताच्या परीक्षेपातच बोलावे लागेल.ब्रिटीश साम्राज्यातील केवळ १/६ सैनिक पहिल्या महायुद्धात लढले, तसेच ५४,००० भारतीयांना आपल्या प्राणांना मुकावे लागले, ६५,००० जबर जखमी झाले तर ४००० बेपत्ता झाले किंवा तुरुंगात गेले. भारतीय करदाते पहिल्या महायुद्धाच्या वेळी १०० दशलक्ष पौंड एवढी किंमत देत होते. ७० दशलक्ष रुपयांचा दारुगोळा, ६००,००० बंदुका आणि मशीन गन्स, ४२ दश लक्ष कपडेजोड भारतातून पहिल्या महायुद्धासाठी गेले. १.३ दशलक्ष भारतीयांचा या महायुद्धात प्रत्यक्ष सहभाग होता.हा स्मरणसोहळा करण्याचे कारण हेच कि माझ्या अगोदर बोलून गेलेल्या वक्त्यांनी याबद्दल भाष्य केले. एवढेच नाही तर १७३,००० पशुसंपत्ती देखील भारताबाहेर नेण्यात आली.याचा परिणाम म्हणून भारताला त्यावेळी आर्थिक विवंचनेतून, भूकमारीतून, गरिबीतून जावे लागले.या सगळ्यांची भरपाई होते ८ अरब पौंड. तुम्ही हे गणित तपासू शकता,सगळे पुरावे आतासुद्धा उपलब्ध आहेत.  दुसरे महायुध्द तर याहून भयानक होते, २.५ दशलक्ष भारतीय या युद्धात सामील होते.मला तीच तीच गोष्ट परत परत सांगायची नाहीये, परंतु या युद्धानंतर ब्रिटन  ३ अरब पौंड रकमेचा देणे लागत होता, पैकी १.२५ अरब पौंड एवढी रक्कम भारताला देणे लागत असतानाही ती कधीही दिली गेली नाही. 
मगाशी इथे कुणीतरी स्कॉटलंडचा उल्लेख केला. सत्य असे आहे कि,वसाहतवाद हा अगोदरच ब्रिटन आणि स्कॉटलंड यांच्या संकल्पनेतुन  आलेला होता. स्कॉटिश लोकांनी १७०७ च्या अगोदर आपल्या देशाबाहेर वसाहती निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ते भारतातही आले होते तेथे मात्र त्यांना असंगत रोजगार दिसला. मला क्षमा  करा, माझ्यानंतर श्री. म्यकेझिअस (स्कॉटलंड)  हे बोलणार आहेत! स्कॉटिश लोकांनी आपल्या वसाहती निर्माण  करताना वेगवेगळ्या पैलूंनी विनाकारण  विचार केला.सैनिक,नाविक,उद्योग,दलालि , रोजगार यांच्याकडे महत्वाने लक्ष दिले गेले.याचा परिणाम म्हणून स्कॉटलंड गरिबीच्या गर्तेत अडकला. आता भारत त्यांच्या गावीही नाही, स्कॉटलंड आणि भारत यांच्यातील वसाहतवादी धोरण संपुष्टात आले याचे आश्चर्यही आम्हाला वाटत नाही.आपण आणखी एक युक्तिवाद ऐकलात तो म्हणजे रेल्वे सुविधाबद्दल.छान, पण मी इथे सांगू इच्छितो आणि जे कि माझे सहकारी जमाइका हाय कमिशनर यांनी देखील स्पष्ट केले की,रेल्वे आणि रोड हे ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी बनवले,नागरिकांच्या नाही. आणि मला याबद्दल आणखी एक सांगावेसे वाटते कि, जगभरात अनेक देशांनी रोड आणि रेल्वे बनवले जेथे वसाहतवाद अस्तित्वात देखील नव्हता. रोड आणि रेल्वे हे मुख्यत्वे दळणवळणासाठी बांधले गेले.कच्चा माल प्रक्रियेसाठी ब्रिटनला पाठविण्यासाठी हा सगळा खटाटोप होता. जमाइका आणि भारत या वसाहती देशांच्या गरजा या प्रासंगिक स्वरूपाच्या होत्या.त्यांना मोठ्या  प्रमाणात वस्तूंची आयात-निर्यात करण्यासाठी अशा वाहतुकीच्या साधनांची गरजच नव्हती.
खरे तर, ब्रिटीश लोकांचाच आग्रह असल्यामुळे रेल्वे बनवल्या गेल्या.त्यामुळे ब्रिटिशांना महसूल गोळा करण्यासाठी नवीन योजना मिळणार होती.मुख्य म्हणजे कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात रेल्वे बांधणीचा खर्च हा  भारतात होणार्या खर्चापेक्षा दुप्पट होता. कारण, या देशांमध्ये तेवढी आर्थिक समृद्धी नव्हती.आपला आर्थिक फायदा,तंत्रज्ञावरील नियंत्रण,साधनसंपत्तीचा पुरवठा या सगळ्या गोष्टी लक्षात घेवूनच ब्रिटिशांनी सुधारणा केल्या आहेत.याचाच परिणाम म्हणून भारतात रेल्वे धावू लागली.
आपण इथे ब्रिटिशांनी वसाहती देशांना केलेल्या मदतीबद्दलाही ऐकले,मला वाटते सर रिचर्ड ओट्वे यांनी हे म्हणणे मांडले. असो,पण मला हे लक्षात आणून द्यायचे  आहे कि, सकल राष्ट्रीय  उत्पन्नाच्या केवळ ०.४% खर्च हा ब्रिटिशांनी भारताच्या  विकासासाठी खर्च केला.खरी गोष्ट अशी कि या पेक्षा जास्त सबसिडी तर भारतात त्यावेळी खतांवर होती, रिचर्ड यांच्या वरील उदाहरणाला हे रूपक अगदी लागू पडते.( हशा)
काही वक्त्यांनी असेही म्हटले आहे कि जातीय हिंसा, रक्तपात, शोषण, लुट ही मुघल साम्राज्याच्या अगदी शेवटच्या काळातही होतीच.हो, होतीच त्याबद्दल वाद नाही.त्यामुळे सध्या भारताची जी स्थिती आहे त्याला पूर्णपणे  ब्रिटीश जबाबदार आहेत असे आम्ही मानत नाही,पण काही वक्ते मात्र ब्रिटीश राज्यात ब्रिटिशांनी केलेल्या  सुधारणांचा उल्लेख अगदी अभिमानाने करत आहेत. जसे सद्यपरिस्थितीला आम्ही पूर्णपणे ब्रिटिशांना  ग्राह्य धरत नाही, तसेच तत्कालीन सुधारणांचा  बडेजाव आता करण्यात काहीही हाशील नाही. सोमालीयातल्या उपासमारीलाआपण  कारणीभूत नाही,पण त्यांना आपण संसाधन पुरवले याचा अर्थ आपण फार मोठे काम केले आहे असा होत नाही. तसेच काही सुधारणा केल्या असल्या तरी ज्या चुका आपण केल्या आहेत त्यांना कधीच नजरअंदाज करता येणार नाही.
आफ्रिकन आदिवासी लोकांसोबत ब्रिटिशांनी जो अमानवी व्यवहार केला तो देखील लक्षात घेतला पाहिजे.वसाहती धोरणामुळे त्यांच्या मानसिक स्थितीत बदल झाला, त्यांच्या परंपरागत चालीरीतीमध्ये बदल झाला. आफ्रिकन आदिवासी लोकांच्या संपत्तीच्या हक्कांची, समाजव्यवस्थेची  घडी विस्कळीत करण्यास जर कोणी जबाबदार असेल तर ते फक्त ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण. वंशवाद,वर्णवाद,सांस्कृतिक अशा विविध  प्रश्नांना आजही हे आफ्रिकन लोक सामोरे जात आहेत.याबाबत विचार होणे मला गरजेचे वाटते.
काहीजण वसाहती देशांना नुकसान भरपाई देण्याच्या विरोधात असतीलही,पण लक्षात घ्या कि, जर्मनीने केवळ इस्राइल नव्हे तर पोलंडलाही नुकसान  भरपाई दिली आहे.इथे भरपूर तरुण तरुणी आहेत, तुम्हालाही एका जगप्रसिध्द चित्राची आठवण करून द्यावीशी वाटते.या जगप्रसिध्द चित्रात १९७० साली जर्मनीचे चान्सलर असलेले विली ब्रान्द्त हे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पोलंड मध्ये मारल्या गेलेल्या ज्यू लोकांच्या 'वॉरसॉ' या  स्मृतीस्थळावर जाऊन आपले गुडघे टेकतात आणि आपली चूक मान्य करतात. अशीच चूक इतरांनीही कबुल करावी. दुसरे आणखी एक उदाहरण आहे, इटलीने लिबियाला नुकसान भरपाई दिली आहे,जपानने कोरियाला दिली आहे आणि एवढेच नाही तर, ब्रिटनने देखील न्यूझीलंडला नुकसान भरपाई दिली आहे.त्यामुळे  नुकसान भरपाई कोणा एका देशाने कोणा दुसऱ्या देशाला दिली आहे असे नवीन नाही.
ब्रिटीश वसाहती देशात लोकशाही होती असा देखील इथे मगाशी उल्लेख झाला.पण मला मोठ्या आदराने हे सांगावेसे वाटते कि, गेल्या २०० वर्षांच्या ब्रिटीश साम्राज्यात भारतीयांनी केवळ गुलामी,छळ आणि यातना भोगल्या.तुमची लोकशाही केवळ तुमच्यासाठी होती, आमच्यासाठी नाही. आम्हाला आमची लोकशाही तुमच्याकडून हिसकावून घ्यावी लागली. आणि मोठ्या नाखुशीने ब्रिटिशांनी ही लोकशाही १५० वर्षाच्या शोषनानंतर सीमित स्वरुपात भारतीयांना दिली.
गोष्ट अगदी साधी आणि समजण्यासारखी आहे.नुकसान भरपाई ही कुणा देशाच्या विकासासाठी महत्वाची ठरू शकत नाही.तुम्ही केलेय चुकांचे  ते एक परिमाण आहे.मी हे देखील मान्य करतो कि नुकसान भरपाईचा हिशोब करणे सद्यस्थितीला शक्य नाही. परंतु वसाहतवादी धोरणाचे जेवढे लोक बळी ठरले त्यांची काळजी घेण्याची नितीमत्ता आपल्या जागी ठेवली पाहिजे.एखादा चोर तुमच्या घरात शिरतो आणि चोरीसाठी संपूर्ण घर शोधताना  त्याला जर ठेच लागली, तर  नुकसान दोघांचेही झाले  असे आपण कधीही म्हणत नाही. त्यामुळे भारतात वसाहतवादी धोरण स्वीकारताना ब्रिटिशांनी सुधारणावादी धोरणही राबविले हे विधान मान्य करण्यासारखे नक्कीच नाही.
खरे तर , आम्हाला ब्रिटिशांनी नुकसान भरपाई द्यावी  अशी कुठलीही मागणी आम्ही करत नाही. किती भरपाई  द्यावी, किती भरपाई  बाकी आहे, किंवा भरपाई कुणाला द्यावी  हे सांगण्यासाठी ही चर्चा निश्चितच नाही. परंतु चर्चेचा विषय  'ब्रिटीश साम्राज्याने त्यांच्या पूर्वीच्या वसाहती देशांना नुकसान भरपाई द्यावी ' हा असल्यामुळे हे सगळे मुद्दे ओघाने आले.
 माझ्या आकलनानुसार इथे मी माझे मुद्दे मांडले आहेत, जर काही चुकीचे संदर्भ वा उदाहरणे दिली असतील तर मनापासून क्षमस्व.२०० वर्षाच्या शोषणाची किंमत म्हणून पुढची २०० वर्षे काही नाही तरी वर्षाला १ पौंड एवढी रक्कम तरी भारताला  द्यायला हवी  असे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे.

धन्यवाद!

स्वैरानुवाद: प्रा. सागर भालेराव 

पुरोगामी चळवळीला ब्राम्हणत्व सोडावेच लागेल!

पुण्यात कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार समितीचा पानसरे यांच्या नावाचा  पहिला पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांना डॉ. रावसाहेब  कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात रावसाहेब कसबे यांनी केलेल्या भाषणावर महाराष्ट्रात भरपूर चर्चा सुरु आहे. आपल्या परखड मांडणीसाठी कसबे प्रसिध्द आहेत. कालसुसंगत मांडणी हे त्यांच्या अभ्यासाचे वैशिष्ट्य आहे,म्हणून तर त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिरफाड करणारे "झोत" हे पुस्तक आल्यानंतर संघाला त्याची दखल घेणे भाग पडले. दलित चळवळीने आजवर अकारण ब्राम्हणद्वेष केला म्हणून पुरोगामी चळवळीची अधोगती झाली असे मत त्यांनी मांडले.ब्राम्हणद्वेष करताना पुरोगामी चळवळीनेही ब्राम्हणत्व घेतले असे कसबे म्हणतात. रावसाहेब कसबेंच्या म्हणण्याचा अन्वयार्थ लक्षात घेतला आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवली तर त्यांना काय म्हणायचे आहे हे लक्षात येईल. ब्राम्हणत्वाविरोधातला भारतीय समाजातील संघर्ष हा काही कालपर्वाचा नाही.बुद्ध धम्म, लोकायत चळवळ, सत्यशोधक समाज अशी मोठी संघर्षयात्री परंपरा या लढयाला आहे. आधुनिक भारतात याबद्दल सर्वात प्रकर्षाने जर कोणी काम केले असेल तर ते महात्मा जोतीबा फुले यांनी केले आहे. या सगळ्याचा सर्वार्थाने विचार करावयाचा झाला तर महात्मा फुलेंची  विचारसरणी अगोदर  समजून घ्यावी लागेल,कारण याच विचारसरणीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपला लढा उभा करतात आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुध्ह बंड पुकारतात.  १९ व्या शतकाच्या सुरुवातीला प्रबोधनाचा विचार समाजातील सर्व क्षेत्रात मुळ धरू पाहत होता. धर्मसंस्थेचे सर्व क्षेत्रांवर नियंत्रण असल्यामुळे धर्मसुधारणेच्या क्षेत्रात मोठी धामधूम चालली होती. विवेकवाद, तर्कनिष्ठपणा आणि सद्सद्विवेकबुद्धीवर आधारित आधुनिक युगाला साजेशी अशी धर्मचिकित्सा करण्याचा प्रयत्न तत्कालीन सर्वच समाजसुधारकांनी केला. पैकी काही बोलके सुधारक होते आणि काही कर्ते सुधारक होते. धर्माच्या चौकटीत राहून धर्मसुधारणा करणारे बोलके सुधारक आणि धर्माच्या भिंती गदागदा हलवून ती खीळखिळी करण्याचा चंग बांधलेले कर्ते सुधारक, पैकी  महात्मा फुलेंचे विचार आणि बोलके सुधारक असलेल्यांचे विचार कधीही एक झाले नाही, आणि त्यामागे सामाजिक परिस्थितीही तितक्याच जबाबदार होत्या. सनातनी व्यवस्थेच्या विरुध्द दंड थोपटणे आणि त्यांना आव्हान देण्याचे बळ ब्राम्हण सुधाराकांपाशी नव्हते, ते विद्रोह ज्यांचा स्थायी भाव आहे त्या महात्मा फुलेंच्यापाशी  बघायला मिळते. महात्मा फुले देखील त्यांच्या संपूर्ण संघर्षात ब्राम्हण आणि ब्राम्हणत्व यात फरक करतात. आपल्या एका लेखात ते म्हणतात, "ऐदी ब्राम्हणाला जेवायला घातले असता जेवढे पाप लागेल, त्यापेक्षा शेकडोपट पुण्य कष्टकरी मजुराला जेवू घातले तर मिळते".कर्मावर विश्वास असणारे महात्मा फुले  येथे "ऐदी"हा शब्द वापरतात, सरसकट सर्व ब्राम्हण मंडळींना ते आरोपिच्या पिंजऱ्यात उभे करत नाहीत. (सीताराम रायकर- आम्ही पाहिलेली फुले,१९८१).

 पुरोहीतशाही, धर्मसंस्था, शोषणव्यवस्था या सगळ्यांमधून अस्पृश्य आणि शुद्रातिशुद्रांचे कसे शोषण केले जाते हे वेळोवेळी महात्मा फुले यांनी आपल्या भाषणातून, लेखातून सांगितले आहे. जातीच्या व्यवस्थात्मक चिकित्सेला विकसित करून तिला पुढच्या टप्प्यावर नेवून ठेवण्याचा प्रयत्न पुढे प्रत्येक समाजसुधारकाने केलेला आढळतो.त्यामुळे  जातीसंघार्षाला एक दिशा  मिळत गेली आणि विद्रोहाला सामाजिक आणि सिद्धान्तिक पाया मिळत गेला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सत्यशोधक समाजाच्या आणि दलितांच्या समग्र चळवळीला जोतिबांच्या जातीखंडणाचा विचार सातत्याने मार्गदर्शन करणारा ठरला आहे. जातिव्यवस्थेचा कोणताही संघर्ष हा ब्राम्हणी धर्माच्या चिकित्सेशिवाय होऊ शकत नव्हता, किंबहुना ब्राम्हणी धर्माच्या चिकित्सेतून जाती व्यवस्थेविरुध्द बंड करण्याची सुरुवात होती. आपल्या पहिल्या कृतीपासून ते अगदी शेवटपर्यंत  संत बसवेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार स्वामी हे ब्राम्हणी धर्माची चिकित्सा करताना दिसतात.आजपर्यंत वेदप्रामाण्य हे ब्राम्हणी धर्माचे मध्यवर्ती सूत्र राहिलेले आहे. वेद हे देवलीखीत असल्याने त्याला बदलता येणार नाही अशा ब्राम्हणांच्या भूमिकेमुळे त्याची चिकित्सा कित्येक शतके झाली नव्हती, ती परंपरा मोडीत काढत स्री-पुरुष विषमता, स्री दास्य, अस्पृश्यता यांना कारणीभूत असलेले वेद नाकारण्याचे धाडस आपल्या समाजसुधारकांनी केलेले आढळते. महात्मा फुल्यांनी चालू केलेली  ही सत्यशोधक चळवळ पुढे अब्राम्हनी परंपरेचे तात्त्विक अधिष्ठान प्रकट करत होती. पितृसत्ताक समाजव्यवस्था, स्री दास्य, वेद्विरोध, जाती निर्मुलन या तत्वांच्या आधारे संस्कृती मीमांसा करून महात्मा फुल्यांनी ब्राम्हणी धर्म आणि संस्कृतीला नकार दिला आणि भारतातील जाती-संघर्षाच्या परंपरेत लोक संस्कृतीच्या सहाय्याने धर्मतत्वांची मांडणी केली.(उमेश बागडे-महाराष्ट्रातील प्रबोधन आणि वर्गजातीप्रभूत्व,२००६). 

ब्राम्हणी धर्माच्या प्रभावाखाली आपले जीवन जगणाऱ्या, गुलामी भोगणाऱ्या शुद्रातीशुद्रांना प्रबोधन करून त्यांना जातीव्यवस्थेच्या विरोधात संघटीत करण्यासाठी संस्थात्मक पाया असावा यासाठी महात्मा  फुल्यांनी १८७३ साली  सत्यशोधक समाजाची स्थापन केली.ब्राम्हणत्वाविरोधात असलेली ही चळवळ सर्व समुद्यासाठी खुली होती. त्यात जसा महार,मांग, ज्यू, मुसलमान, मराठा,माळी यांना प्रवेश होता तसाच ब्राम्हनांनाही यात प्रवेश होता. ( सीताराम रायकर, आम्ही पाहिलेली फुले, १९९८१) यावरून महात्मा फुल्यांच्या संदर्भाने ब्राम्हणांना शिव्या देणाऱ्यांनी बोध घेतला तर त्यांच्या हिताचेच आहे. महात्मा फुल्यांच्या समकालीन असलेल्या अनेक समाजसुधारकांनीही आपल्या आपल्या पद्धतीने काम सुरु केले होते. ब्राम्हण सुधारकांच्या दुटप्पी आणि चौकटीत राहून सुधारणा करण्याच्या वृत्तीवर महात्मा   फुले कडाडून टीका करतात, असे असले तरी त्यांचे समकालीन समाजसुधारकांशी  जिव्हाळ्याचे संबंध पाहायला मिळतात.त्यांच्या करणी आणि कथनी मधला फरक जाहीरपणे महात्मा फुले बोलून दाखवतात .परंतु, असे असले तरी वेळ पडेल तेव्हा या सुधारकांच्या बाजूनेही उभे राहतात. म्हणूनच तर वेद्व्यवस्था मानणारे आणि वेदाचे कट्टर समर्थक असलेले परंतु ब्राम्हणी पौराहित्य आणि कर्मकांडाला विरोध करणारे  स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यात मिरवणूक निघते आणि जेव्हा सनातनी लोक त्याला विरोध करतात तेव्हा वैचारिक मतभेद असूनही महात्मा फुले या मिरवणुकीत लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या सोबत सामील  होतात.(पंढरीनाथ पाटील-महात्मा जोतीराव फुले, २००५). 

आपल्या सत्यशोधक समाजाद्वारे सत्य शुद्रातीशुद्रांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि माणसाला माणूस म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांच्या पश्चात सत्यशोधक चळवळीचे ब्राम्हणेत्तर चळवळीत झालेले रुपांतर घातक ठरले. वैश्विक भाषा करण्याच्या काळात ब्राम्हण विरुध्द ब्राम्हणेत्तर असा वाद पुढे निर्माण झाला, आणि त्यापुढे जातीद्वेषाचे राजकारण सुरु झाले. समाजातील ब्राम्हणांच्या सर्वंकष वर्चस्वाला विरोध करून बहुजन समाजाची उन्नती आणि प्रगती करणे या उद्देशाने महाराष्ट्रात सुरु झालेली चळवळ नंतर देशी आणि विदेशी मुद्ययांवर संघर्ष करायला  लागली. २० व्या शतकातील ब्राम्हणेत्तर चळवळीच्या ज्या पुढाऱ्यांनी महात्मा फुल्यांचे अनुकरण केले त्या फुल्यांच्या विचारसरणीत वर्गीय किंवा वर्णीय अभिनिवेश अभिप्रेत नव्हता. पुढे महर्षी शिंदे यांनी मात्र महात्मा फुल्यांचे विचार आत्मसात करून " डिप्रेस्ड क्लास मिशन" मार्फत अस्पृश्यांना मोफत शिक्षण पुरविले.हे करताना त्यांनी कुठल्याही जातीचा अभिनिवेश दिसू दिला नाही, आपणही अगदी करंटेपणा महर्षी  शिंदे  यांचे कार्य अनुल्लेखाने टाळले. फुले-शाहू- आंबेडकर यांच्या परंपरेत असलेले महर्षी  शिंदे  यांना आपण नाकारले हे ब्राम्हणेत्तर चळवळीचे अपयश मानावे लागेल.जातिव्यवस्थेच्या संघर्षातील पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्पृश्यांच्या न्यायहक्कासाठी असलेला लढा. महात्मा फुल्यांचा आदर्श घेवून आणि त्यांना गुरु मानून बाबासाहेबांनी आपला लढा उभा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि,भारताच्या सर्वांगीण प्रगती मार्गातील मोठा अडसर, तसेच मनुष्यबळाचा पूर्णतः उपयुक्ततेवरील मर्यादा म्हणून जातीव्यवस्था वर्षानुवर्षे उभी आहे. अस्पृश्यतेचे निराकरण करण्यासाठी जातीसंस्थेचे उच्चाटन आणि त्यासाठी जातीसंस्थेला आधारभूत ठरलेल्या धार्मिक सांस्कृतिक मूल्यांचे व परंपराचे विच्छेदन करणे गरजेचे आहे. धार्मिक मुल्ये ब्राम्हणी संस्कृतीतून आली असल्याकारणाने थेट त्या व्यवस्थेला हादरा देण्याचा यशस्वी प्रयत्न बाबासाहेबांनी केला. चवदार तळ्याच्या सत्याग्रह प्रसंगी आपल्या ब्राम्हण सहकाऱ्यांना सोबत घेऊ नये, ही ब्राम्हण मंडळी सत्याग्रहात सहभागी  असल्यास आम्ही आपल्या सत्याग्रहाला पाठींबा देणार नाही आणि सहभागी होणार  नाही अशी मागणी जेधे -जवळकर या ब्राम्हणेतर मंडळींनी केली. त्यांच्या या मागणीला धुडकावून लावत, बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिले कि माझा विरोध हा ब्राम्हण जातीला नसून ब्राम्हण प्रवृत्तीला आहे. या प्रसंगावरून बाबासाहेबांचा उदार दुष्टीकोन लक्षात यावा. (भा.ल. भोळे- बाबासाहेबांचा वैचारिक वारसा,१९९८). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवी हक्कासाठी असलेला लढा, मनुष्याला मनुष्य म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा महात्मा जोतीराव फुले यांच्या मार्गावरील प्रवास त्यांच्या पश्चात जातीचा अभिनिवेश करणारा ठरला. ब्राम्हण्यवादाला विरोध करता करता चळवळीच्या नेत्यांनी सरसकट सर्व ब्राम्हणांना धरून धोपटायला सुरुवात केली. ज्यांनी जातीअंताच्या लढाईसाठी लढणे अभेप्रीत होते तेच पुन्हा जातीच्या आधारे आपली आपली दुकाने चालवू लागली.यामागे राजकीय सुप्त इच्छा देखील होत्या हे विसरता कामा नये. परंतु असे होत असताना, आपल्या महापुरुषांचा पराभव आपणच करत आहोत याची थोडीसुद्धा कल्पना आपल्याला न यावी याचे दुखः आहे. दलितांच्या हक्कासाठी निडर अशी दलित प्यान्थर १९७२ साली जन्माला आली. ३३ कोटी देवांवर थुंकून ज्यांची कार्यक्रमाला सुरुवात व्हायची अशा दलित प्यान्थरला सुद्धा जातीअंताच्या संघर्षात यश आले नाही, या मागे एकमेव कारण होते ते म्हणजे सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा आभाव. म्हणून, पदमश्री नामदेव ढसाळ हे  कवी अनंत फंदी व्याख्यानमालेत बोलताना,आम्ही  विनाकारण हिंदु संस्कृतीला  शिव्या दिल्या, ही आमची सर्वात मोठी चूक होती आणि ती पुढच्या  पिढीकडून घडू नये असे जाहीरपणे काबुल करतात. विद्वेषाच राजकारण मग ते पुरोगाम्यांच असो वा प्रतीगाम्यांचे, ते वाईटच!

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेवून संभाजी ब्रिगेड, बामसेफ सारख्या संघटना जातीद्वेष आणि वंशद्वेष पसरवत आहेत, हे मात्र स्वतः त्या महापुरुषांनाही मान्य झाले नसते. आरएसएस सारख्या हिंदू मुलतत्ववादी विचारधारा असलेल्या संघटनांचे जेवढे विखारी आणि वंशवादावर आधारित साहित्य आज बाजारात उपलब्ध नसेल तेवढे बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडची वंशवादावर आधारित साहित्य सध्या उपलब्ध आहे. संविधानाची कवचकुंडले देवून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना या देशाचे सार्वभौम नागरिक म्हणून अधिकार दिले, किमान संविधानाच्या मुल्यांचा स्वीकार जरी केला असता तरी स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या या संघटनांना आपल्या कार्यात यश आले असते.कारण, संविधान म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून बाबासाहेब आंबेडकरांची विचारप्रणाली आहे.वैश्विक खेड्याची संकल्पना सगळीकडे मान्यता पावत असताना आपण पुन्हा टोळी संस्कृतीकडे जातो आहोत असे साधारण चित्र सध्या आपल्या आजूबाजूला आहे. भगविकरणाचे सार्वत्रीकरण होताना आणि आपला देश मुलतत्ववादी मानसिकतेतून जात असताना इथल्या पुरोगामी चळवळीने तरी किमान नेटका लढा दिला पाहिजे. आंबेडकरी चळवळीत देखील ब्राम्हणत्व असणारे लोक आहेत,पैकी सामाजिक चळवळीला दिशा देणारे आणि ब्राम्हणत्व नसलेले मोजके लोक अजूनही आपल्या आपल्या मार्गाने सामाजिक चळवळीला दिशा देण्याचे काम करत आहेत. पैकी एक असलेले रावसाहेब कसबे हे असाच दूरगामी  विचार सांगणारे विचारवंत आहेत. त्यांच्या भाषणातून येणाऱ्या काळाची      चाहूल दिसते आहे. ती वेळीच ओळखली पाहिजे.त्यांनी  म्हटल्याप्रमाणे ब्राम्हणांनी ब्राम्हणत्व सोडले आणि दलितांनी ते घेतले असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. ब्राम्हणत्व हे वर्चस्ववाद सांगते, आणि जिथे जिथे वर्चस्ववाद आहे तिथे तिथे संघर्ष आहे हा आजवरचा इतिहास आहे.संघर्ष टाळायचा असेल तर त्यासाठी ब्राम्हणत्व जसे ब्राम्हणांनी सोडणे गरजेचे आहे तसेच ते पुरोगामी चळवळीने सोडणेही तेवढेच निकडीचे आहे. नाही तर येणारा काळ संघर्षाने भरलेला असेल.


इंजी. सागर भालेराव 
९५९५८४२२३८

संवेदना बधिर होत चाललेल्या वर्तमानाची कहाणी-नागरिक

माझा जन्म झाला तो मुळात कोकणातल्या एक छोट्या गावात. नोकरी निमित्ताने आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मुंबई गाठली. मुंबई जशी सगळ्यांना सामावून घेते, तशीच या मुंबापुरीने मला सामावून घेण्यातही कुठलीही अस्पृश्यता पाळली नाही. सुरुवातील पत्रकार म्हणूनच मी आपल्या करियरला सुरुवात केली. पत्रकारितेत आल्यावर वरवर दिसणाऱ्या गोष्टी या किती खोलवर असतात हे समजायला लागलं. १९९३ साली जाहलेली दंगल स्वतः अनुभवली, स्वतःच्या डोळ्यादेखत माणस मरताना आणि मारताना पाहिली. जोगेश्वरीची राधाबाई चाळ  धगधगत्या आगीत माणस कवेत घेताना पाहिली. घाटकोपरची रमाबाई आंबेडकर कॉलनी देखील अशीच आक्रोश करत धगधगताना पाहिली. गिरणी कामगारांचे मोठेमोठे मोर्चे आंदोलन पाहिली आणि त्यांना दडपू बघणाऱ्या मोठ्यामोठ्या शक्ती देखील बघितल्या. ह्या शक्ती कधी निव्वळ  राजकीय होत्या, तर कधी भांडवदारी व्यवस्था आपल्या वळचणीला बांधून ठेवलेले  समाजकारणी यात होत्या. दंगल रेग्युलेट करणारी माणस पहिल्यांदाच पाहत होतो. खर तर दंगल पेटवायची कधी आणि शांत कधी करायची, किती दिवस धगधगती ठेवायची  याच मेक्यानिजम असत हे पहिल्यांदा कळाल. दंगलीच शास्रशुद्ध काम राजकारणी माणसे कशी करतात याच भयाण वास्तव देखील जाणवलं. सामाजिक रंग बेरंग करण्यासाठी राजकारणी माणसे कोणत्या थराला पोहचू शकतात आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी सामान्य नागरिकांचे किती शोषण करू शकतात हे प्रत्यक्ष पाहत होतो, अनुभवत होतो. अनुभवातून, आकलनातून आणि जाणिवांच्या प्रवासातून मग एक कलाकृती डोक्यात घरघर करत होती, आणि ही कलाकृती २००३  साली पहिल्यांदा  अक्षर दिवाळी अंकात छापून आली, तिचे नाव म्हणजे माझी पाहिली वाहिली कादंबरी "नागरिक"!
मी काही कादंबरीकार नाही किंवा बडा लेखक वैगेरे नाही. अनुभवातून जे जे काही आल ते उतरविण्याचा प्रयत्न मी या कादंबरीत केला आहे. एका मराठवाड्यातील  दलित कुटुंबातून आलेला शाम जगदाळे हा तत्वनिष्ठ पत्रकार आपली तत्वे जपत,सामाजिक भावना जागृत ठेवत मुंबईत पत्रकारिता करत असतो. पत्रकारिता करत असताना त्याला राजकारणी, माध्यमे, भांडवलदार हे सगळे आपल्या फायद्यासाठी सामान्य नागरिकाचा कसा बळी घेतात हे जाणवते. शाम जगदाळेला बऱ्याच वेळा आमिषेही  दाखवली जातात, परंतु तत्वाशी तडजोड न करणारा शाम या आमिषाला बळी पडत नाही आणि प्रसंगी नोकरीवर लाथही मारतो. समाजात बदल घडवू पाहणारी आंदोलने बघतो आणि ही आंदोलने मोडीत काढणारी व्यवस्थाही बघतो, बुवाबाजी-नरबळी प्रकारही बघतो आणि त्यांना शरण जाणारे धर्मांधही बघतो. जातीपातीच्या आधारावर राजकारण करणारी बडी मंडळी, आणि त्यांचे लागेबांधे असणारे व्यावसायिक यांच्यात शाम वावरतो. समाजातला हा संघर्ष पाहुन शाम हतबल होत नाही तर नव्या उमेदीने स्वतःचे दैनिक चालू करतो आणि आपला लढा चालूच ठेवतो. असे या कादंबरीचे एकूण कथानक आहे.२००३ साली अक्षर दिवाळी अंकात याबद्दल छापून आल्यानंतर मला पहिल्यांदा माझा मित्र कवी आणि अभिनेता सौमित्र याचा फोन आला.  तो कुठे तरी नाशिकच्या आसपास आपल्या चित्रपटाच शुटींग करण्यात व्यस्त होता.त्याने सुचवले कि ही कादंबरी प्रकाशित कर. इतर मित्रांचाही आग्रह वाढल्यावर २००६ साली डिम्पल पब्लिकेशनने ही कादंबरी प्रकाशित केली. एव्हाना या कादंबरीची भरपूर चर्चा व्हायला लागली.कादंबरी प्रकाशित व्हायच्या अगोदरच सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या. मुळात ही  कादंबरीच मला नवी असल्याने, सिनेमाबद्दल कुठला विचारही नव्हता. चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकारांनी, निर्मात्यांनी संपर्क केला. परंतु, मी काही तयार नव्हतो. त्याच दरम्यान अमेरिकेत असलेल्या जयप्रद देसाई या तरुण दिग्दर्शकाला "नागरिक" ही कादंबरी वाचण्यात आली. २००८ मध्ये त्याने कादंबरी वाचल्यावाचल्या लागलीच मला ई-मेल पाठवला     आणि या कादंबरीवर आधारित सिनेमा काढण्याचा विचार असल्याचे सांगितले. जयप्रद देसाई आणि माझी याअगोदर काही ओळख नव्हती, त्याने अगोदर शोर्ट फिल्म केलेल्या होत्या एवढाच काय तो त्याचा अनुभव होता. नागरिक ही कादंबरी सामाजिक-राजकीय आशयावर असल्यामुळे जयप्रद सारखा नवखा दिग्दर्शक हे उत्तमरीत्या करेल कि नाही अशी धाकधूक होती. जयप्रद देसाईने सांगितले कि तुम्ही जर सिनेमा करण्यास उत्सुक असाल तर मी अमेरिका सोडतो. माझ्या कादंबरीवर सिनेमा काढण्यासाठी एक मुलगा अमेरिका सोडून भारतात येण्याचा विचार करतो आहे याचे मलाही नवल वाटले. ही सगळी प्रक्रिया चालू असतानाच २००९ साली निर्माते सचिन चव्हाण यांनी मला या कादंबरीवर आधारित असलेल्या सिनेमासाठी साईन केलं, आणि सरतेशेवटी "नागरिक" बनवण्यासाठी जयप्रद भारतात आला. २००९ ते २०१४ आम्ही चित्रपटाच्या पटकथेवर आणि संवादावर काम केले. चित्रपटाचे सगळे संवाद मी स्वतः लिहिलेले आहेत. यात लिहिलेले संवाद हे काही हवेतून आलेले नाहीत, आपण रोज बोलतो असे संवाद आहे.सहज आहेत म्हणून ते तीव्र आहेत.त्यामुळेच या चित्रपटाच्या संवादाला उत्कृष्ट संवादाचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळू शकला.लेखक समाजाभिमुक जर असला तर त्याच प्रतिबिंब हे त्याच्या लिखाणात पडत असत.माझही असच झाल, सामाजिक जाणीव घेवून घडलो असल्याकारणाने समाजाच नितळ प्रतिबिंब दाखविण्यास मी यशस्वी ठरलो. संवेदना बधिर होत चाललेल्या वर्तमानाची ही कहाणी आहे तसाच हा  सिनेमा भविष्यावरही भाष्य करतो. काळ आपल्या हातातून निसटतो आहे. जाताना आपल्या हाती अनुभव मात्र देवून जातो. देशातल्या प्रत्येक नागरिकाला इथल्या घटनेने काही अधिकार आणि कर्तव्ये दिलेली आहेत. आपले अधिकार आपण उपभोगत असताना आपल्याकडून अपेक्षित असलेली कर्तव्ये पार पडली जातात कि नाही याची दखल आपण घेतली पाहिजे. घटनेने दिलेले अधिकार आणि हक्क ज्या प्रकारे एका सामान्य नागरिकाला असतात तशीच ती एका पत्रकारालाही असतात. लोकशाहीचा चौथा खांब अशी बिरुदावली मिरवीत असलेला पत्रकार हा देखील एक नागरिकच आहे हे विसरता कामा नये. परंतु सध्याच्या काळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, पत्रकार आता लोकशाहीचा चौथा काय, कुठलाही खांब राहिलेला नाही. सामान्य नागरिकांच्या सगळ्या अपेक्षा माध्यमांनी धुळीस मिळविल्या आहेत. असे असले तरीही मूल्याधिष्ठित समाजरचनेची स्वप्ने बघणारी आणि तत्वनिष्ठ असलेली शाम जगदाळे सारखी पत्रकार मंडळी आपल्या समाजात आजही आहेत हे नाकारूनही चालणार नाही. आजपर्यंतचा सामान्य नागरिकांचा समज होता कि वृत्तपत्रांचे संपादक हे गुणवत्तेवर निवडले जातात, परंतु वास्तव असे आहे कि सद्यकाळात संपादक हे गुणवत्तेवर निवडले न जाता, राजकारण्यांच्या शिफारशीने भरली जातात. जरुरीपुरती निर्भीडता आजच्या सर्वच आघाडीच्या वृत्तपत्रांच्या संपादकानामध्ये पाहायला मिळते, असे माझे परखड मत आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने कादंबरीचीही भरपूर चर्चा झाली. काही लोक या चित्रपटाची तुलना "सिंहासन" या चित्रपटाशीही करतात.पण हे समजून घ्यायला हवे कि या दोन संपूर्ण वेगवेगळ्या कलाकृती आहेत आणि वेगवेगळ्या संदर्भासहित आहेत. सिंहासनमध्ये निळु फुले यांनी साकारलेला पत्रकार हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी नाही, त्यात सत्ता ही केंद्रस्थानी दाखवलेली आहे. परंतु, नागरिक या चित्रपटात संपूर्ण कथानक हे पत्रकार असलेल्या शाम जगदाळे भोवती फिरते. त्यामुळे या चित्रपटाची तुलना इतर चित्रपटांशी केल्यास ती 'नागरिक" वर अन्याय ठरेल.
सध्याची माध्यमांची स्थिती पाहता सामान्य नागरिकांनी मोठ्या हितसंबंध जपणाऱ्या माध्यमांना नाकारून छोट्या छोट्या वृत्तपत्रांना बळ द्यायला हवे. आताच्या काळात नवनिर्मितीसाठी ही छोटीछोटी माध्यमे उपयोगी पडतील. गांधी-फुले-आगरकर-आंबेडकर यांनी चालविलेली पत्रकारिता आताच्या काळात होत नाही, एक सामाजिक विचार घेवून त्यांनी आपले वृत्तपत्रे चालवली. त्यांचा वाचकवर्ग  सुद्धा सीमित होता, परंतु त्यांच्या विचाराने एक जनांदोलन उभे केले. साधा मिठाचा सत्याग्रहाचे उदाहरण घ्या, साधे मीठ उचलून महात्मा गांधीजींनी देशभरात स्वातंत्राचे आंदोलन पेटविले. अगदी साध्या साध्या लढ्यातून नवचैतन्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या महापुरुषांनी केलेला आहे. सध्याच्या चालवली मात्र पेड कार्यकर्त्यांवर चालतात. पैसे देवून सभेला लोक बोलवावी लागतात. यावरून नेत्यांची लायकी लक्षात यावी. शिवाजी महाराजांच्या पदरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात मावळे नव्हते, मोजक्याच पण जिगरबाज मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली.हे उदाहरण लक्षात घेतले कि समजते, आपल्या समाजालाही फार मोठ्या परिवर्तन आणणाऱ्या लोकांची गरज नाही. मोजकेच पण तत्वनिष्ठ माणसांच्या पुढाकाराने समाजात बदल होऊ शकतात. छोट्यांनी कायम छोट्यांची बाजू घ्यावी, शोशितांनी  कायम शोषितांची बाजू घ्यावी आणि कामगारांनी कायम कामगारांची बाजू घ्यावी कारण छोट्यांच्या मदतीला मोठे येणार नाहीत, शोषितांच्या मदतीला शोषक येणार नाहीत आणि कामगारांच्या मदतीला कुणीही भांडवलदार येणार नाही, तेव्हा आपल्या मर्यादा, आपली गरजा ओळखून पिडीतांनी संघटीत होणे गरजेचे आहे अस मला वाटत. सध्याची नवीन पिढी ही उत्साही आहे,नवनिर्मितीची आस धरणारी आहे परंतु त्यांच्या निर्मितीशक्तीला योग्य दिशेने नेले तरच आपल्या देशाचे भविष्य अबाधित राहणार आहे. सध्याच्या प्रस्थापित माध्यमांमध्ये भरपूर तरुण येऊ पाहत आहेत. एक व्यवसाय म्हणून माध्यमांकडे आता पाहू लागले आहेत.तरीही तरुण पत्रकारांचे व्यवहारज्ञान कमी दिसते. सामाजिक चळवळीचा गंध नसलेले, सामाजिक जाणीवा नसलेले पत्रकार  समाजमन ओळखू शकत नाहीत. समाजाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठ माध्यमे विसरत चालल्यामुळे समाजाचाही माध्यमावरील  विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. लोकांची सामुहिक निराशा होणारा हा काळ आहे. अशाही काळात, नवपत्रकारांनी थोड्या जरी सामाजिक जाणीवा जागृत ठेवल्या तर पुन्हा माध्यमांची विश्वासार्ह्यता परत  येऊ शकते.आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असली म्हणजे विचारांमध्ये मतभेद होत नाहीत. बातम्या करताना, १० पैकी १ बातमी पिडीताच्या बाजूने लिहिली तरी भरपूर  आहे.माध्यमांसाठी ही बातमी कॉलमभर असली तरी पिडीतासाठी ही बातमी आयुष्य ठरू शकते. येणाऱ्या पिढीकडून हीच अपेक्षा आहे. आहे त्या आव्हानाला तोंड दिले तरच आपल अस्तित्व टिकून राहणार आहे."नागरिक" मधेही परिस्थिती ही नायिका आहे असे मी मानतो, परिस्थितीनुसार घटना घडतात, पण त्या कशा घडवायच्या हे आपल्या हातात असते हे विसरता कामा नये. सध्या "क्रमशः - पुढे चालू" हे मी लिहिलेले दीर्घांक रंगभूमीवर आले आहे, श्री. संदीप रामचंद्र जंगम यांनी त्याची निर्मिती केली आहे. लेखकाच्या जीवनावर अधारिक हे नाटक आहे, त्याचे ५ प्रयोग झाले असून, सध्या या दिर्घांकावर फोकस आहे. जाणीवा जागृत राहिल्या म्हणजे नव्या कलाकृती घडतच असतात.