जम्मू-काश्मीर हा भारतातीलच एक भूभाग.एक राज्य. भारत देशात जी एकूण २९ राज्ये आहेत त्यापैकी कायम चर्चेत राहणार हे राज्य. यात वेगळं असं सांगण्यासारखं काय आहे,तर काहीच नाही! जम्मू-काश्मीर आपला आहे आणि आपलाच असेल,हीच भावना हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक 'देशभक्ताच्या' मनात कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल.
या भूभागाला लागून भारत देशाचा एक नैसर्गिक शत्रू आहे, तो म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानच्या कुरघोड्या, दहशतवादी कारवाया,यांत सामील होणारे भारतीय तरुण, धर्माच्या नावावर दंगली घडवणारे महाभाग या सगळ्यांमुळे इथले लोक कमालीचे वैतागलेत. कोणतीही नवी गोष्ट सुरुवातीला फॅसिनेटींग वाटते, नंतर मात्र तिचा तिटकारा आल्याशिवाय राहवत नाही, हा निसर्गनियम आहे. केवळ एक-दोन महिने नाही, तर गेली अनेक दशके हा भूभाग धुमसतो आहे. रोज काही ना काही येथे घडतं.चांगलं घडतं,तसंच वाईट देखील घडतं. चांगलं कमी आवाजात ऐकू येतं, तर वाईट मोठ्यामोठ्याने ओरडून सांगितलं जातं. त्याचा गाजावाजा अधिक असतो. दुरून डोंगर साजरं असतं. काश्मीरमधली निसर्गसौंदर्यता बघून हुमायून म्हटला होता , "गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त, हमी अस्तो, हमी अस्तो, हमी अस्तो" म्हणजेच, पृथ्वीवर जर कुठे स्वर्गाचं अतित्व आहे तर ते इथेच आहे,इथेच आहे,इथेच आहे!
पृथ्वीवरचा हा स्वर्ग बघण्याचा योग जेव्हा आला तेव्हा मात्र आपल्या मनांत असलेल्या स्वर्गाविषयीच्या कल्पना आणि इथलं वास्तव याचा कुठेही ताळमेळ आढळला नाही,यात हुमायूनचा काहीही एक दोष नाही हे अगादरच जाहीर व्हावे!
****
जम्मू विमानतळावर पोहोचलो तेव्हा तिथे धावपळ चालू होती. लाल दिव्याच्या गाड्या, पोलिसांची आणि मिलिटरीची वाहने अशी वर्दळ दिसत होती. नक्कीच कुणीतरी मंत्री-संत्री आलेले असतील असं लागलीच ओळखलं. त्या दिवसापासून जम्मू-काश्मीरच हिवाळी अधिवेशन सुरु झालं होत. इथे उन्हाळ्यात काश्मीरमध्ये तर हिवाळ्यात जम्मूत विधिमंडळाचे अधिवेशन भरते. आपल्याकडे महाराष्ट्रात जशा मुंबई-नागपूर अधिवेशनासाठी जशा सरकारी फाईल्स नाचवतात, अगदी तसाच प्रकार इथेही घडतो. या अधिवेशनाचा पहिलाच दिवस तुफानी ठरला. शेख मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्ष, भाजप सोबत युती करून येथे सत्तेत आहे. सीमाभागावर पाकिस्तानचे होत असलेले हल्ले,त्यात निष्क्रिय असलेलं सरकार, हल्ल्यात मारले जाणारे जवान आणि बुर्हाण वाणीची हत्या झाल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या काश्मिरी तरुण आणि त्यांच्यावर भारतीय सैनिकांनी केलेल्या पॅलेट गनचे हल्ले आदी मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर होते. पीडीपी हा पक्ष अगोदरपासून कट्टर असा पक्ष मानला जातो. मुस्लिमधार्जिना पक्ष म्हणून या पक्षाकडे आजवर बघितले गेले आहे. 'जम्मू काश्मीर मध्ये स्वतःचा कायदा' हे या पक्षाचे धोरण आहे.त्यामुळे भारत सरकार जे काही निर्णय घेईल त्याला हा पक्ष खुल्या दिलाने स्वीकारेल असे बहुदा होत नाही.
परंतु २०१४ च्या सार्वत्रिक निवडुणकांमध्ये कायम हिंदुत्ववावादाचा पुरस्कार करणाऱ्या भाजप सोबत मुस्लिम कट्टरतेचे समर्थन करणाऱ्या या पीडीपी पक्षाची युती झाली. उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता उधळून लावत भाजप आणि पीडीपीने इथली सत्ता काबीज केली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या कि, पाकिस्तान आणि भारत हा एकमेकांशिवाय राहू शकत नाही! भारत आणि पाकिस्तान कितीहि एकमेकांशी भांडले तरी त्यांच्यातला दुरावा जास्त काळ टिकत नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांची गोची झाली, प्रामुख्याने भाजप समर्थकांची.
यासंदर्भात जम्मूतील काही तरुणांशी संवाद साधला, तेव्हा त्यांच्या मनात असलेला राग उफाळून आलेला पाहायला मिळाला. जम्मू विमानतळावर टेक्निकल सुपरवायजर म्हणून काम करणारा राजन डोगरा हा तरुण सांगत होता कि, जम्मू आणि कश्मीर हे नाव ऐकायला फार छान वाटत. पण इथल्या रहिवाशांच काय दुखणं आहे हे कुणाला कळत नाही. राजकारणी लोक आपलं राजकारण करण्यात, सत्तेचे फायदे घेण्यात इतके मग्न आहेत कि राज्यातील शैक्षणिक -आर्थिक आणि सामाजिक बाजू किती तकलादू बनत चालल्या आहेत हे देखील त्यांना पहायला वेळ नाही. असाच वेळ दौडत राहिलो तर या राज्याचं काहीही खरं नाही असं उद्विग्नपणे तो सांगत होता.
त्याउलट आणखी एक प्रतिक्रिया ऐकायला मिळाली, भाजयुमो सोबत काम करणारा एक कॉलेजवयीन मुलगा भेटला. पंकज शर्मा असं त्याच नाव. तो सांगत होता कि, अटलबिहारी वाजपेयी यांच्या फॉर्म्युल्यानेच काश्मीरमध्ये शांतता आली होती.नरेंद्र मोदी यांनी देखील त्याच पद्धतीने आपली रणनीती ठेवावी असं त्याच मत होत.कारगिल युद्ध झाल्यानंतर देखील वाजपेयीनीं पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना आग्रा समिटला बोलावलं.स्वतः वाजपेयी देखील लाहोरला जाऊन आले.वाजपेयी सरकारच्या या संवादाच्या भूमिकेमुळे सिजफायर थांबले.पंकज त्याला माहिती असलेल्या तपशीलाबद्दल अगदी मुद्देसूद सगळं काही सांगत होता. मोदी सरकारकडून जनतेच्या खूप काही अपेक्षा आहेत असं तो सांगत होता. त्याला विचारलं, तुला एवढी सगळी माहिती कुठून मिळाली? 'संघ शाखेत आम्हाला काही पुस्तिका दिल्या आहेत, त्यात हे वाचल आहे', पंकजने चुटकीसरशी पण तितक्याच निरागसपणे उत्तर दिलं.
वाजपेयींप्रमाणे मोदी देखील लाहोरला जाऊन आले, अगदी या कानाची खबर त्या कानाला लागू न देता. मोदी सरकारच्या शपथविधीला नवाज शरीफ यांना देखील निमंत्रित केलं गेलं.असं असलं तरी, आजही सीमेवरचा गोळीबार थांबलेला नाही. गेल्या ७० वर्षांची भारत-पाकिस्तानची एकमेकांबद्दलची शत्रुत्वाची परंपरा आजही टिकून आहे. पाकिस्तानची सततची भारतीय सीमाभागात होणारी घुसखोरी, भारतीय जवानांच्या मृत शरीराची विटंबना , भारताचं सर्जिकल स्ट्राईक ही सगळी तीच परंपरा आहे जी कोणत्याही दोन शत्रूंमध्ये असते.
****
बुरहान वानीच्या हत्येनंतर संपूर्ण काश्मिरात आगडोंब उसळला आहे, अजूनही तो शमलेला नाही.सैन्याचा आणि काश्मिरी युवकांचा सामना हा अनेकदा येथे बघायला मिळतो. काश्मीरची जनता बुरहान वानीला आतंकवादी मानायला तयार नाही. त्यांच्यासाठी बुरहान हा 'शहीद' झालेला आहे. जम्मू विद्यापीठात तिथल्या तरुणाईचा कानोसा घेण्यासाठी गेलो तेव्हा तिथे विद्यार्थ्यांचे एक आंदोलन बघायला मिळाले. विचारणा केल्यावर कळले कि, काल विद्यापीठात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात इथले कुलगुरू असे म्हणाले कि, बुर्हाण वाणीला सैन्याने जिवंत पकडले असते तर इतर अनेक प्रश्न वाढण्याऐवजी सुटले असते. बुर्हाण वाणीची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात विद्यापीठात शिकत असलेल्या अनेक तरुणांना जखमी व्हावं लागलं, प्राण गमवावे लागले.
झालं! त्यांच्या या भूमिकेमुळे दुसऱ्याच दिवशी विद्यापीठ बंदची हाक देण्यात आली. साहजिकच बंडाची हाक देणारी विद्यार्थी संघटना होती, अभाविप! नेहमीप्रमाणे 'देश के इन गद्दारो को, लाठी मारो सालो को' या घोषणेने आंदोलनाला सुरुवात केली गेली. कुलगुरुंची संवादाची भूमिका या विद्यार्थ्यांना पटली नव्हती. अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी यांचं पाकिस्तानच्या बाबतीत असलेली संवादाची भूमिका कदाचित जम्मू विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांना माहित नसावी.
बुरहान वानी हा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता.हिजबुल मुजाहिदीनचा आजवर इतिहास पाहीला तर तो फुटीरतावादाचा राहिलेला आहे. परंतु बुरहान वानी जर काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पोलिसांसोबत लढत होता, तर त्याला विद्रोही म्हटलं पाहिजे असा काहीसा काश्मिरी नागरिकांचा सूर आहे. अनेक विदेशी वृत्तपत्रांनी त्याचा उल्लेख 'मिलिटन्ट' अर्थात विद्रोही असाच केलाय.सरकारी दमनाच्या विरोधात त्याने बंड केलं होत असं लोकांचं म्हणणं आहे. बुरहान वानीच्या बंदुकीने किती लोकांच्या नरडीचा घोट घेतलाय हे माहीत नाही, पण केवळ माध्यमे त्याला 'दहशतवादी' ठरवत असेल तर आपण देखील ते अंध म्हणून कसं स्वीकारायचं? ज्या काश्मिरी लोकांचा हा प्रश्न आहे त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही? काश्मीरच्या लोकांना भारतात राहण्याची इच्छा आहे कि नाही हे इथल्या नागरिकांना कुणी विचारणार आहे का? मोठ्या आवाजात पण अगतिकपणे यासिन मलाच हे प्रश्न विचारत होता. यासिन भट हा जम्मू विद्यापीठातलाच समाजशास्राचा विद्यार्थी.मूळचा हा काश्मीरचा. काश्मीरच्या बंदीपूर या दुर्गम भागात हा राहतो.इथे तो पदव्यूत्तर शिक्षण घेतोय. ज्या मित्रांसोबत मी विद्यापीठात आलो होतो, त्याचा हा मित्र असल्याकारणाने तो माझ्या प्रश्नांना मोकळया मनाने उत्तरे देत होता. मुस्लिम असणं हा काय गुन्हा असू शकतो का? विद्यापीठात राजरोस कुणीही दाढीवाला तरुण किंवा बुरखाधारी तरुणी दिसली तरी लोक संशयित नजरेनं बघतात. स्वतःच्या देशात आमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार असाल तर काय म्हणून इथले सार्वभौम नागरिक म्हणून आम्ही मिरवायचं? यासिनचे प्रश्न ऐकून मलाच भीती वाटत होती. त्याचे प्रश्न अगदीच खरेखुरे होते. बहुसंख्य लोकांच्या आनंदाला आपण असिमानंद मानत असतो, मग आपोआप अल्पसंख्यांक समुदाय परिघापासून दूर जातात आणि या दोघांमधली दरी वाढत जाते ,हा निसर्गनियम आहे.
सरकारला, मग ते समकालीन असू दे किंवा पूर्वीचे असू दे, त्यांना देखील हे पक्के ठाऊक आहे. कुणापासून ही गोष्ट लपलेली नाही.
सध्या तरी काश्मीर हा भारतात आहे तो केवळ सैन्याच्या धाकापोटी. भौगोलिक दृष्ट्या हा भूभाग अतिमहत्त्वाचा आहे एवढंच त्याचं काय ते कौतुक. बाकी इथले लोक मेले काय, किंवा जिवंत राहिले काय, कुणालाही त्याची परवा नाही. कधी कधी तिथल्या तरुणांची घुसमट बाहेर येते आणि हे तरुण पोलिसांवर दगडफेक करायला लागतात, जसे नक्षलवादी पोलिसांवर वार करतात अगदी तसेच. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश काश्मिरात जनमत घ्यायला तयार नसतो, लोक असंतुष्ट असतात, दगडफेक करतात, सरकारवर अविश्वास दाखवतात. नेमकी ही गोष्ट कुरापतखोर पाकिस्तान ओळखतो,आणि काश्मीर घाटीत आगडोंब कसा कायम राहील यासाठी प्रयत्न करतो.आपण मात्र धुमसत असतो, भांडत असतो, आपल्याच माणसाशी,आपल्याच भावंडांशी.
****
'एक साथ रंग मंडल' ही जम्मूमधली एक हौशी कलाकारांची टीम आहे. समाजात घडत असलेल्या विविध समकालीन विषयांवर नुक्कड नाटक सादर करून लोकांचे प्रबोधन करण्याचं काम ही संस्था करते. जम्मूमधल्या महत्वाच्या आणि संवेदनशील अशा रघुनाथ बाजार मध्ये 'एक साथ रंग मंडल'चे कलाकार नुक्कड सादर करताना भेटले. डोगरी आणि हिंदी अशा संमिश्र भाषेत हे नाटक सादर केलं जात होत.नुक्कडचा विषय होता, काश्मीरमधल्या जळत्या शाळा.गेल्या काही महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यात अराजकता माजलेली आहे. आता इथल्या शाळांपर्यंत ही अराजकता आता पोहोचली आहे. अतिरेकी आता शाळा पेटवायला मागेपुढे बघत नाहीये. इथल्या फुटीरवाद्यांचं वैर सरकारशी आहे. परंतु त्यात भरडल्या जात आहेत त्या काश्मीर खोऱ्यातील शाळा.त्यांनी सादर केलेल्या नाटकात 'रफिया' नावाची एक मुलगी आहे.जी आपली शाळा जाळली गेल्यामुळे दुःखी आहे .रफिया आपल्या जवळच्या एका मैत्रिणीला,शबनमला हे सांगते कि काही असामाजिक तत्वांनी तिची शाळा बेचिराख करून टाकली आहे. हे सांगत असताना रफिया एक निश्चय जाहीर करते कि , आता आपल्या शिक्षकांना,वडीलधाऱ्यांना,इथल्या प्रत्येक माणसांना मी प्रश्न करणार आहे कि, आमच्या शाळा का जाळल्या जात आहेत? आम्ही शिकलो नाही,सुशिक्षित झालो नाही तर आम्ही विकसित कसे होणार? आमच्या देशाचा,आमच्या राज्याचा विकास आम्ही कसा करणार?
वादापेक्षा संवादाला अधिक महत्व दिल पाहिजे असा संदेश या नाटकातून दिला जात होता. इथे सगळ्यांना असं वाटत कि राज्यात शांतात असावी,आपली मुले शिकावीत, त्यांनी प्रगती करावी.
या संपूर्ण प्रवासात दोन चेहरे मात्र कायम लक्षात राहतील असे आहेत. चिराग सूरी आणि मेघा शर्मा.चिराग हा पुण्याहून इंजिनिअरिंगच शिक्षण घेतलेला एक तरुण आहे. इथल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात तो ज्युनिअर इंजिनिअर म्हणून गेल्याच वर्षी रुजू झालाय.त्याला इथे काम करतानाचे अनुभव विचारले तर सांगतो कि, कामच करायला भेटत नाही तर अनुभव कुठून येणार? इथले सरकारी कामे,एकदम 'सरकारी' पद्धतीने होतात असे तो सांगतो. दररोज कामाला गेलंच पाहिजे असं काही नाही.कोण आलं,कोण गेलं याचा एकमेकांना थांगपत्ता नसतो. कुठे काही दंगली घडल्या कि दंगलीची सबब सांगून महिना महिनाभर कार्यालये बंद असतात. कार्यालये बंद असली तरी पगार मात्र चालू असतो. सुरुवातीला काही काम नाही म्हणून ठीक वाटलं,परंतु आता मात्र इथे मन रमत नाही. आपण उगाचच आपल्या देशाला फसवतो आहोत असं वाटत. काम करायची जिद्द असली तरी काम करायला,आपलं कौशल्य दाखवायला इथे संधी नाही. हे सगळं सांगताना खरं तर तो इथल्या व्यवस्थेचा भाग असूनही त्याच व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करत होता. एकट्या चिरागच्या बोलण्याने काही होणार नाही हे देखील खरं. त्याला साथ देणारे लोक भेटले तर उत्तम नाही तर जैसे थे! परिस्थिती कायम राहणार हे काही वेगळे सांगायला नको.
मेघा शर्मा,वय वर्षे २६. देहरादूनला हिने तीच शिक्षण पूर्ण केलं.वडील आर्मीत असल्यामुळे भारतभर तीच फिरणं झालं. वडील निवृत्त झाल्यावर पुन्हा आपल्या गावी जम्मूला तीच कुटुंब स्थायिक झालं आहे. एका सहकारी बँकेत कामाला असलेल्या मेघाला जेव्हा विचारलं कि, नोकरीच्या संधी नसलेल्या राज्यात राहण्यापेक्षा जिथे संधी आहेत त्या राज्यात जायला आवडेल का? तेव्हा मेघा सांगते कि, काही झालं तरी मी जम्मू सोडणार नाही. हे राज्य घडवण्याची जबाबदारी आता माझ्यासारख्या युवकांची आहे.आम्ही युवकांची जर राज्याबाहेर जाऊन स्थायिक होण्याचा विचार केला तर कस होईल? आम्ही आता आमची जबाबदारी लोकहली पाहिजे. राजकारणी जे काही करायचं ते करतील,पण आता युवा वर्गाने इथली व्यवस्थेला आपलं मानून त्यात आपला सहभाग नोंदवला पाहिजे. मेघा कमालीची सकारात्मक आहे. येणार काळ उज्ज्वल असेल असा तिचा आशावाद आहे. चिराग आणि मेघा सारखे तरुण ज्यापद्धतीने विचार करत आहेत त्या पद्धतीने प्रत्येक भारतीयाने विचार केला तर जम्मू-काश्मीरसारखा आपल्या देशाचा कुठलाही भाग असंतुष्ट राहणार नाही. नकारात्मक चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक भूमिकेवर खंबीरपणे उभं राहील पाहिजे असा आशावाद हे तरुण देशाला देत आहेत. त्यांचा आशावाद पूर्णत्वास जावो. पृथ्वीवरील या स्वर्गाचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित होवो.
****
(लेखकाने नोव्हेंबर २०१७ मधे आपल्या जम्मू-काश्मीर अभ्यासदौऱ्यात टिपलेल्या निरीक्षणांवर हा लेख लिहिला आहे)
या भूभागाला लागून भारत देशाचा एक नैसर्गिक शत्रू आहे, तो म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानच्या कुरघोड्या, दहशतवादी कारवाया,यांत सामील होणारे भारतीय तरुण, धर्माच्या नावावर दंगली घडवणारे महाभाग या सगळ्यांमुळे इथले लोक कमालीचे वैतागलेत. कोणतीही नवी गोष्ट सुरुवातीला फॅसिनेटींग वाटते, नंतर मात्र तिचा तिटकारा आल्याशिवाय राहवत नाही, हा निसर्गनियम आहे. केवळ एक-दोन महिने नाही, तर गेली अनेक दशके हा भूभाग धुमसतो आहे. रोज काही ना काही येथे घडतं.चांगलं घडतं,तसंच वाईट देखील घडतं. चांगलं कमी आवाजात ऐकू येतं, तर वाईट मोठ्यामोठ्याने ओरडून सांगितलं जातं. त्याचा गाजावाजा अधिक असतो. दुरून डोंगर साजरं असतं. काश्मीरमधली निसर्गसौंदर्यता बघून हुमायून म्हटला होता , "गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त, हमी अस्तो, हमी अस्तो, हमी अस्तो" म्हणजेच, पृथ्वीवर जर कुठे स्वर्गाचं अतित्व आहे तर ते इथेच आहे,इथेच आहे,इथेच आहे!
जम्मू काश्मीरची ही मनमोहक सुंदरता बघूनच हुमायूनने या प्रदेशाला स्वरंगाची उपमा दिली होती.
****
जम्मू विमानतळावर पोहोचलो तेव्हा तिथे धावपळ चालू होती. लाल दिव्याच्या गाड्या, पोलिसांची आणि मिलिटरीची वाहने अशी वर्दळ दिसत होती. नक्कीच कुणीतरी मंत्री-संत्री आलेले असतील असं लागलीच ओळखलं. त्या दिवसापासून जम्मू-काश्मीरच हिवाळी अधिवेशन सुरु झालं होत. इथे उन्हाळ्यात काश्मीरमध्ये तर हिवाळ्यात जम्मूत विधिमंडळाचे अधिवेशन भरते. आपल्याकडे महाराष्ट्रात जशा मुंबई-नागपूर अधिवेशनासाठी जशा सरकारी फाईल्स नाचवतात, अगदी तसाच प्रकार इथेही घडतो. या अधिवेशनाचा पहिलाच दिवस तुफानी ठरला. शेख मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्ष, भाजप सोबत युती करून येथे सत्तेत आहे. सीमाभागावर पाकिस्तानचे होत असलेले हल्ले,त्यात निष्क्रिय असलेलं सरकार, हल्ल्यात मारले जाणारे जवान आणि बुर्हाण वाणीची हत्या झाल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या काश्मिरी तरुण आणि त्यांच्यावर भारतीय सैनिकांनी केलेल्या पॅलेट गनचे हल्ले आदी मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर होते. पीडीपी हा पक्ष अगोदरपासून कट्टर असा पक्ष मानला जातो. मुस्लिमधार्जिना पक्ष म्हणून या पक्षाकडे आजवर बघितले गेले आहे. 'जम्मू काश्मीर मध्ये स्वतःचा कायदा' हे या पक्षाचे धोरण आहे.त्यामुळे भारत सरकार जे काही निर्णय घेईल त्याला हा पक्ष खुल्या दिलाने स्वीकारेल असे बहुदा होत नाही.
परंतु २०१४ च्या सार्वत्रिक निवडुणकांमध्ये कायम हिंदुत्ववावादाचा पुरस्कार करणाऱ्या भाजप सोबत मुस्लिम कट्टरतेचे समर्थन करणाऱ्या या पीडीपी पक्षाची युती झाली. उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता उधळून लावत भाजप आणि पीडीपीने इथली सत्ता काबीज केली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या कि, पाकिस्तान आणि भारत हा एकमेकांशिवाय राहू शकत नाही! भारत आणि पाकिस्तान कितीहि एकमेकांशी भांडले तरी त्यांच्यातला दुरावा जास्त काळ टिकत नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांची गोची झाली, प्रामुख्याने भाजप समर्थकांची.
यासंदर्भात जम्मूतील काही तरुणांशी संवाद साधला, तेव्हा त्यांच्या मनात असलेला राग उफाळून आलेला पाहायला मिळाला. जम्मू विमानतळावर टेक्निकल सुपरवायजर म्हणून काम करणारा राजन डोगरा हा तरुण सांगत होता कि, जम्मू आणि कश्मीर हे नाव ऐकायला फार छान वाटत. पण इथल्या रहिवाशांच काय दुखणं आहे हे कुणाला कळत नाही. राजकारणी लोक आपलं राजकारण करण्यात, सत्तेचे फायदे घेण्यात इतके मग्न आहेत कि राज्यातील शैक्षणिक -आर्थिक आणि सामाजिक बाजू किती तकलादू बनत चालल्या आहेत हे देखील त्यांना पहायला वेळ नाही. असाच वेळ दौडत राहिलो तर या राज्याचं काहीही खरं नाही असं उद्विग्नपणे तो सांगत होता.
त्याउलट आणखी एक प्रतिक्रिया ऐकायला मिळाली, भाजयुमो सोबत काम करणारा एक कॉलेजवयीन मुलगा भेटला. पंकज शर्मा असं त्याच नाव. तो सांगत होता कि, अटलबिहारी वाजपेयी यांच्या फॉर्म्युल्यानेच काश्मीरमध्ये शांतता आली होती.नरेंद्र मोदी यांनी देखील त्याच पद्धतीने आपली रणनीती ठेवावी असं त्याच मत होत.कारगिल युद्ध झाल्यानंतर देखील वाजपेयीनीं पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना आग्रा समिटला बोलावलं.स्वतः वाजपेयी देखील लाहोरला जाऊन आले.वाजपेयी सरकारच्या या संवादाच्या भूमिकेमुळे सिजफायर थांबले.पंकज त्याला माहिती असलेल्या तपशीलाबद्दल अगदी मुद्देसूद सगळं काही सांगत होता. मोदी सरकारकडून जनतेच्या खूप काही अपेक्षा आहेत असं तो सांगत होता. त्याला विचारलं, तुला एवढी सगळी माहिती कुठून मिळाली? 'संघ शाखेत आम्हाला काही पुस्तिका दिल्या आहेत, त्यात हे वाचल आहे', पंकजने चुटकीसरशी पण तितक्याच निरागसपणे उत्तर दिलं.
वाजपेयींप्रमाणे मोदी देखील लाहोरला जाऊन आले, अगदी या कानाची खबर त्या कानाला लागू न देता. मोदी सरकारच्या शपथविधीला नवाज शरीफ यांना देखील निमंत्रित केलं गेलं.असं असलं तरी, आजही सीमेवरचा गोळीबार थांबलेला नाही. गेल्या ७० वर्षांची भारत-पाकिस्तानची एकमेकांबद्दलची शत्रुत्वाची परंपरा आजही टिकून आहे. पाकिस्तानची सततची भारतीय सीमाभागात होणारी घुसखोरी, भारतीय जवानांच्या मृत शरीराची विटंबना , भारताचं सर्जिकल स्ट्राईक ही सगळी तीच परंपरा आहे जी कोणत्याही दोन शत्रूंमध्ये असते.
****
बुरहान वानीच्या हत्येनंतर संपूर्ण काश्मिरात आगडोंब उसळला आहे, अजूनही तो शमलेला नाही.सैन्याचा आणि काश्मिरी युवकांचा सामना हा अनेकदा येथे बघायला मिळतो. काश्मीरची जनता बुरहान वानीला आतंकवादी मानायला तयार नाही. त्यांच्यासाठी बुरहान हा 'शहीद' झालेला आहे. जम्मू विद्यापीठात तिथल्या तरुणाईचा कानोसा घेण्यासाठी गेलो तेव्हा तिथे विद्यार्थ्यांचे एक आंदोलन बघायला मिळाले. विचारणा केल्यावर कळले कि, काल विद्यापीठात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात इथले कुलगुरू असे म्हणाले कि, बुर्हाण वाणीला सैन्याने जिवंत पकडले असते तर इतर अनेक प्रश्न वाढण्याऐवजी सुटले असते. बुर्हाण वाणीची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात विद्यापीठात शिकत असलेल्या अनेक तरुणांना जखमी व्हावं लागलं, प्राण गमवावे लागले.
झालं! त्यांच्या या भूमिकेमुळे दुसऱ्याच दिवशी विद्यापीठ बंदची हाक देण्यात आली. साहजिकच बंडाची हाक देणारी विद्यार्थी संघटना होती, अभाविप! नेहमीप्रमाणे 'देश के इन गद्दारो को, लाठी मारो सालो को' या घोषणेने आंदोलनाला सुरुवात केली गेली. कुलगुरुंची संवादाची भूमिका या विद्यार्थ्यांना पटली नव्हती. अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी यांचं पाकिस्तानच्या बाबतीत असलेली संवादाची भूमिका कदाचित जम्मू विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांना माहित नसावी.
जम्मू विद्यापीठात कुलगुरूंविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी
बुरहान वानी हा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता.हिजबुल मुजाहिदीनचा आजवर इतिहास पाहीला तर तो फुटीरतावादाचा राहिलेला आहे. परंतु बुरहान वानी जर काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पोलिसांसोबत लढत होता, तर त्याला विद्रोही म्हटलं पाहिजे असा काहीसा काश्मिरी नागरिकांचा सूर आहे. अनेक विदेशी वृत्तपत्रांनी त्याचा उल्लेख 'मिलिटन्ट' अर्थात विद्रोही असाच केलाय.सरकारी दमनाच्या विरोधात त्याने बंड केलं होत असं लोकांचं म्हणणं आहे. बुरहान वानीच्या बंदुकीने किती लोकांच्या नरडीचा घोट घेतलाय हे माहीत नाही, पण केवळ माध्यमे त्याला 'दहशतवादी' ठरवत असेल तर आपण देखील ते अंध म्हणून कसं स्वीकारायचं? ज्या काश्मिरी लोकांचा हा प्रश्न आहे त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही? काश्मीरच्या लोकांना भारतात राहण्याची इच्छा आहे कि नाही हे इथल्या नागरिकांना कुणी विचारणार आहे का? मोठ्या आवाजात पण अगतिकपणे यासिन मलाच हे प्रश्न विचारत होता. यासिन भट हा जम्मू विद्यापीठातलाच समाजशास्राचा विद्यार्थी.मूळचा हा काश्मीरचा. काश्मीरच्या बंदीपूर या दुर्गम भागात हा राहतो.इथे तो पदव्यूत्तर शिक्षण घेतोय. ज्या मित्रांसोबत मी विद्यापीठात आलो होतो, त्याचा हा मित्र असल्याकारणाने तो माझ्या प्रश्नांना मोकळया मनाने उत्तरे देत होता. मुस्लिम असणं हा काय गुन्हा असू शकतो का? विद्यापीठात राजरोस कुणीही दाढीवाला तरुण किंवा बुरखाधारी तरुणी दिसली तरी लोक संशयित नजरेनं बघतात. स्वतःच्या देशात आमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार असाल तर काय म्हणून इथले सार्वभौम नागरिक म्हणून आम्ही मिरवायचं? यासिनचे प्रश्न ऐकून मलाच भीती वाटत होती. त्याचे प्रश्न अगदीच खरेखुरे होते. बहुसंख्य लोकांच्या आनंदाला आपण असिमानंद मानत असतो, मग आपोआप अल्पसंख्यांक समुदाय परिघापासून दूर जातात आणि या दोघांमधली दरी वाढत जाते ,हा निसर्गनियम आहे.
सरकारला, मग ते समकालीन असू दे किंवा पूर्वीचे असू दे, त्यांना देखील हे पक्के ठाऊक आहे. कुणापासून ही गोष्ट लपलेली नाही.
सध्या तरी काश्मीर हा भारतात आहे तो केवळ सैन्याच्या धाकापोटी. भौगोलिक दृष्ट्या हा भूभाग अतिमहत्त्वाचा आहे एवढंच त्याचं काय ते कौतुक. बाकी इथले लोक मेले काय, किंवा जिवंत राहिले काय, कुणालाही त्याची परवा नाही. कधी कधी तिथल्या तरुणांची घुसमट बाहेर येते आणि हे तरुण पोलिसांवर दगडफेक करायला लागतात, जसे नक्षलवादी पोलिसांवर वार करतात अगदी तसेच. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश काश्मिरात जनमत घ्यायला तयार नसतो, लोक असंतुष्ट असतात, दगडफेक करतात, सरकारवर अविश्वास दाखवतात. नेमकी ही गोष्ट कुरापतखोर पाकिस्तान ओळखतो,आणि काश्मीर घाटीत आगडोंब कसा कायम राहील यासाठी प्रयत्न करतो.आपण मात्र धुमसत असतो, भांडत असतो, आपल्याच माणसाशी,आपल्याच भावंडांशी.
****
'एक साथ रंग मंडल' ही जम्मूमधली एक हौशी कलाकारांची टीम आहे. समाजात घडत असलेल्या विविध समकालीन विषयांवर नुक्कड नाटक सादर करून लोकांचे प्रबोधन करण्याचं काम ही संस्था करते. जम्मूमधल्या महत्वाच्या आणि संवेदनशील अशा रघुनाथ बाजार मध्ये 'एक साथ रंग मंडल'चे कलाकार नुक्कड सादर करताना भेटले. डोगरी आणि हिंदी अशा संमिश्र भाषेत हे नाटक सादर केलं जात होत.नुक्कडचा विषय होता, काश्मीरमधल्या जळत्या शाळा.गेल्या काही महिन्यांपासून काश्मीर खोऱ्यात अराजकता माजलेली आहे. आता इथल्या शाळांपर्यंत ही अराजकता आता पोहोचली आहे. अतिरेकी आता शाळा पेटवायला मागेपुढे बघत नाहीये. इथल्या फुटीरवाद्यांचं वैर सरकारशी आहे. परंतु त्यात भरडल्या जात आहेत त्या काश्मीर खोऱ्यातील शाळा.त्यांनी सादर केलेल्या नाटकात 'रफिया' नावाची एक मुलगी आहे.जी आपली शाळा जाळली गेल्यामुळे दुःखी आहे .रफिया आपल्या जवळच्या एका मैत्रिणीला,शबनमला हे सांगते कि काही असामाजिक तत्वांनी तिची शाळा बेचिराख करून टाकली आहे. हे सांगत असताना रफिया एक निश्चय जाहीर करते कि , आता आपल्या शिक्षकांना,वडीलधाऱ्यांना,इथल्या प्रत्येक माणसांना मी प्रश्न करणार आहे कि, आमच्या शाळा का जाळल्या जात आहेत? आम्ही शिकलो नाही,सुशिक्षित झालो नाही तर आम्ही विकसित कसे होणार? आमच्या देशाचा,आमच्या राज्याचा विकास आम्ही कसा करणार?
वादापेक्षा संवादाला अधिक महत्व दिल पाहिजे असा संदेश या नाटकातून दिला जात होता. इथे सगळ्यांना असं वाटत कि राज्यात शांतात असावी,आपली मुले शिकावीत, त्यांनी प्रगती करावी.
'एक साथ रंग मंडल' कलासमूह आपले पथनाट्य सादर करताना
*****या संपूर्ण प्रवासात दोन चेहरे मात्र कायम लक्षात राहतील असे आहेत. चिराग सूरी आणि मेघा शर्मा.चिराग हा पुण्याहून इंजिनिअरिंगच शिक्षण घेतलेला एक तरुण आहे. इथल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात तो ज्युनिअर इंजिनिअर म्हणून गेल्याच वर्षी रुजू झालाय.त्याला इथे काम करतानाचे अनुभव विचारले तर सांगतो कि, कामच करायला भेटत नाही तर अनुभव कुठून येणार? इथले सरकारी कामे,एकदम 'सरकारी' पद्धतीने होतात असे तो सांगतो. दररोज कामाला गेलंच पाहिजे असं काही नाही.कोण आलं,कोण गेलं याचा एकमेकांना थांगपत्ता नसतो. कुठे काही दंगली घडल्या कि दंगलीची सबब सांगून महिना महिनाभर कार्यालये बंद असतात. कार्यालये बंद असली तरी पगार मात्र चालू असतो. सुरुवातीला काही काम नाही म्हणून ठीक वाटलं,परंतु आता मात्र इथे मन रमत नाही. आपण उगाचच आपल्या देशाला फसवतो आहोत असं वाटत. काम करायची जिद्द असली तरी काम करायला,आपलं कौशल्य दाखवायला इथे संधी नाही. हे सगळं सांगताना खरं तर तो इथल्या व्यवस्थेचा भाग असूनही त्याच व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करत होता. एकट्या चिरागच्या बोलण्याने काही होणार नाही हे देखील खरं. त्याला साथ देणारे लोक भेटले तर उत्तम नाही तर जैसे थे! परिस्थिती कायम राहणार हे काही वेगळे सांगायला नको.