अल्लामा डॉ. सर महंमद हे उर्दू आणि फारसी या भाषांमधील श्रेष्ठतम कवी. आपल्या देशात रवींद्रनाथ टागोर यांना जो मान दिला जातो तसाच मान इकबालांचा देखील आहे. भारतातील प्रत्येकालाच 'वंदे मातरम' आणि ;जन गण मन' हे राष्ट्र्गीत आणि राष्ट्रगान माहितीये, त्याचबरोबर 'सारे जहाँ से अच्छा' हे गीत देखील माहितीये. हे गीत लिहिलंय अल्लामा इकबालांनी.
ते केवळ कवी म्हणून नाही तर इस्लामिक विचारविश्वातील तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगणारे विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध आहेत. भारतातील सुफी चळवळीनंतर इस्लामच्या तत्वज्ञानात्मक चिंतनाची सुरुवात करणारा हा एकमेव गृहस्थ होता. त्यांनतर कुणी तसा माणूस जन्माला आला नाही हे भारतीय आणि आशिया खंडातील इस्लाम अभ्यासकांचं दुर्दैव. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी भारतासाठी- भारताच्या भविष्यासाठी व्यापक भूमिका घेतली, त्यावर कार्यवाही केली. गायत्री मंत्राचा उर्दू अनुवाद करून त्यास काव्यबद्ध करण्याचा मानही अल्लामा इकबाल यांच्याचकडे जातो. आपल्या एका कवितेत ते म्हणतात,

कुछ बात है के हस्ती मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन दौरे जहाँ हमारा!
पुढे हेच डॉ. इकबाल पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक झाले. मुस्लिम लीगचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले. भारतातील हिंदु-मुस्लिम वादाच्या बिकट प्रश्नांवर द्विराष्ट्रवादाचा तोडगा त्यांनी दिला. कालांतराने त्यांची हीच मागणी विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या भक्तांनी लावून धरली.
२१ एप्रिल १९३८ साली त्यांचा मृत्यू झाला, त्यांना स्वतंत्र पाकिस्तान पाहता आला नाही.पाकिस्तानची त्यांची जी काही कल्पना होती ती महंमद अली जिन्हा आणि इतर मंडळींनी साकारू दिली नाही. आयुष्याच्या शेवटी त्यांचे फाळणीबद्दलचे विचारही पुष्कळ व्यापक बने होते. त्यामुळे आजही आपल्या देशात कवी इकबालांना भारतीय परंपरेचे कवी म्हणूनच ओळखले जातात.त्यांच्याच एका गजल मधून त्यांच्या भावनाविश्वाचा अंदाज लावला जाऊ शकतो.
मस्जिद तो बना दी पलभर में
ईमा के हरारत वालोने,
मन अपना पुराना पापी है
बरसों से नमाजी बन न सका
अल्लामा इकबालांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस सदर नमन.

No comments:
Post a Comment