काल सकाळी सकाळी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यावर विद्येच माहेरघर(?) असलेल्या पुण्यात खुनी हल्ला झाल्याची ब्रेकिंग न्यूज पाहिली आणि आपण मध्ययुगीन भारतातच राहतो आहोत कि काय असा प्रश्न पडला.डॉ.दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती हे समीकरण फार वर्षापूर्वी आपल्या तथाकथित पुरोगामी (?) महाराष्ट्रात रूढ झालेलं होत.समाजवादी,विज्ञान निष्ठेची परंपरा आपल्या देशाला जरूर आहे.परंतु,मुलतत्ववाद्यांच्या डोक्याला लागलेली दैववादाची अन अंधश्रद्धेची कीड अजून गेलेली नाहीये,हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.दाभोळकर सरांचे २ व्याख्यान ऐकण्याचा अन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग मला लाभला.दाभोळकर सर तासनतास अंधश्रद्धा,कर्मकांड,भानामती,विज्ञानवाद या विषयावर बोलत राहायचे.प्रत्येकाला उत्तर देताना,शंकानिरसन करताना हा माणूस कधीही थकला नाही. गेल्या १८ वर्षापासून "जादू-टोणा विरोधी विधेयक" आपल्या कार्यसम्राट लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात मंजूर करावं यासाठी ते अविरत लढले.त्यांच्या या प्रस्तावित विधेयकामुळे ज्या कुणा समुदायाच अर्थकारण बिघडणार होत,त्यांनी याला प्रखर विरोध केला.हिंदू संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता उचललेल्या बांडगुळांनी नथूरामच्या रुपात शेवटी डाव साधलाच! दै.सनातन प्रभात मधून जहरी भाषेत दाभोळकर यांच्यावर टीका केलेली असायची.दाभोलकरांना देशाचा "ग्यालेलिओ " ठरवत,धर्माच्या आणि दैववादाच्या विरोधात गेलात तर गांधींसारखे हाल होतील असे देखील सुनावले.परंतु अशा धमक्यांना सरांनी कधी भिक घातली नाही .चर्वाकापासून तुकारामापर्यंत आणि महात्मा फुल्यांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समृध्द विचारांचा वारसा सरांनी आयुष्यभर जपला.
विचारांची लढाई हि विचारांनीच करायची असते हि अहिंसेची शिकवण "फ्यासिस्ट" शक्ती विसरलेल्या आहेत.एकटा दाभोळकर मारून काय मिळणार आहे तुम्हाला? दाभोळकर सरांचा देह माराल पण त्यांचे विचार,विवेकवाद कसा नष्ट कराल? स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सोडून समाजाचा डॉक्टर होण्याचा खडतर मार्ग या प्रबोधनकाराने स्वीकारला.पुरोगामी चळवळीत प्रत्येक आंदोलनात,मोर्चात हा माणूस शिलेदार राहिला.डॉ.आंबेडकरांनी तयार केलेल्या "हिंदू कोड बिलाची" अशीच परवड झाली.सनातन्यांच्या विखारी टीकेला त्यांना सुद्धा समोर जावं लागलं.हिंदू धर्मसंस्कृतीत हि अफरातफर करायचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. परंतु थोडीबहुत नैतिकता असलेल्या तेव्हाच्या जनसमुदायाने हत्येचा मार्ग निवडला नव्हता!!
किती काळ आपण आपल्या घाणेरड्या रूढी पाळणाऱ्या संस्कृतीचा अभिमान जपणार आहोत??संस्कृतीचा आभिमान जरूर हवा पण गर्व कशाला??ज्या संस्कुतीमध्ये नरबळी,यज्ञात पशुहत्या,देवदासींचे लैगिक शोषण होते,ती आपली संस्कृती म्हणून आपण गोडवे गायचे आहेत का??? समताधीष्टीत समाजरचनेचा पाया हा विज्ञानवादावर अवलंबून आहे हे न समजण्यासारखे मूर्ख आहोत का आपण?? फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे किती दाभोळकर मारले गेल्यावर ढिम्म प्रशासन जागे होणार आहे??
सनातन्यांनी हे जरूर लक्षात ठेवावे कि त्यांच्या विचारांची मशाल अजून धगधगते आहे.संस्कृतीरक्षणाचे गोडवे गाणाऱ्या आणि धर्मावर संकट येणार म्हणून गळे काढणाऱ्या गांडूच्या अवलादींनी हे नीट समजून घ्यावे.या प्रकारामुळे खंर तर महाराष्ट्र ५०/६० वर्ष मागे गेलाय.विचारांच्या लढाईमध्ये डॉ.दाभोळकर नामक शरीराचा बळी गेलाय.त्यांचे हे योगदान इतिहासात सुवर्णअक्षराने लिहिले जाणार आहे .एकीकडे धर्मवादी,कट्टरपंथी "नरेंद्रच" कौतुक आणि दुसरीकडे प्रबोधनकार "नरेन्द्रांची" हत्या,आपल्याला अराजकतेकडे घेऊन जाणार आहे.चार्वाक,एकलव्य,शम्भूक,गार्गी,फुले,शाहू आणि आंबेडकरांच्या पंक्तीत आज दाभोळकर सर विराजमान झालेले आहेत. त्यांच्या जाण्याने चळवळीचा शिलेदार हरपलेला जरूर आहे परंतु त्यांच्या विचारांची समृद्धी प्रत्येक पुरोगामी कार्यकर्त्याकडे आहे.निरीश्वरवादाच्या सिद्धांताचे समर्थन करणाऱ्या सरांच्या आत्म्यास शांती लाभो असे मी म्हणणार नाही.पंचतत्वात विलीन झाल्यावर निसर्गातील प्रत्येक अणु-रेणू स्वतःच वेगळ अस्तित्व सांगत असतो,सरांच देखील समाजातील स्थान अढळ असंच आहे.सरांच राहिलेलं अपूर काम आता आपण युवक पूर्ण करूयात.कारण आपल्या प्रत्येकात दाभोळकर आहे,जो धर्माविरोधात एल्गार पुकारणार आहे आणि बिनिवरति घाव घालणार आहे कारण "आम्ही सगळे दाभोळकर" आहोत!!!
इंजि.सागर भालेराव
9595842238
अप्रतिम लेख.....
ReplyDeleteलोकाना 'आरसा' दाखवलेला चालत नाही....
पुरोगामी महाराष्ट्राच्या तळपत्या सुर्याचा अस्त.......
Deleteधन्यवाद...
खरच महाराष्ट्र खूप मागे गेल्यासारखा वाटतो आहे.... परिस्थिती बदलणं फार महत्वाचं आहे.... आता दाभोळकर सरांचा वारसा पुढे चालू ठेवायची गरज आहे....
ReplyDeleteलेख खूप छान लिहिला आहे.
धनवंतांनी अति हो लुटले...
Deleteधर्मान्धानी अति हो छळले....
अंग झाडुनी निघ बाहेरी....
घे बिनिवारती घाव....
fhule-shahu-ambedkar yanchya purogami maharashtrat... samajsudharakavar asha prakarache halle hone hi maharashtrachya pratimela kalima fasnari lajjaspad ghatana aahe... ya jatiwadi pillavalyani laxat thevave ki ek dabholkaranchi hattya karun chalval thambnar nhi kinva sampanar nahi... purogami maharashtratil chalval hi krantikari rup ghenar aani tyanche vicharanche kranti honar.... ya hizzadya vadi pravruttila thos uttar dilya shivay rahanar nahi.... Dr.dabholkar siranchya krantikari vicharana krantikari jay bhim ....
ReplyDelete