आजच युवक सामाजिक संरचना बदलू पाहतोय?
मुंबईतील सेंट झेविअर्स आणि टाटा सोशल सायन्स त्याचबरोबर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या नामांकित शिक्षणसंस्थांवर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक लक्ष ठेऊन असल्याच वाचलं.डोक्यात विचारांचा घोळ सुरु झाला.शिक्षण संस्थामध्ये माओवादी अन नक्षलवादी घडवत असल्याचा संशय एटिएस पथकाला आहे.सुशिक्षित आणि आधुनिक माओवादी निर्माण करण्याचा कारखाना सुरु झाल्याची ही नांदी असावी कदाचित.
सर्वहारा समाजाची अस्वस्थता आजपर्यंत जगातील सर्व समाजवादी विचारवंतांनी मांडली.ओरीस्टोटल ,लेनिन,बेलाझ बेला अशा तत्वचिंतकांनी याच जाणिवेतून जनसंवादाचे सिद्धांत (communication theory ) मांडले.वर्गात शिकत असलेले सिद्धांत प्रत्यक्षपणे व्यवहारात वापरल्यास प्रश्नांचा निपटाराही लवकर होईल असा विचार आजची तरुणाई करते आहे.आणि नेमके हेच विद्यार्थी हेरून त्यांना माओवादी बनविण्याचा प्रयत्न काही संघटना करत असल्याचा संशय एटिएसला आहे.तरुणांच्या डोक्याशी आणि मनाशी खेळण्याचा हा एक डाव आहे.खर तर आपला तरुण सध्या महागाई,भ्रष्ट्राचार,राजकीय अनास्था याविषयी कमालीचा जागरूक आणि सतर्क झाला आहे.त्याची ही उर्जा उत्सर्जित व्हायला कुठे वाव नाही,नेमक्या ह्याच संधीचा फायदा घेऊन सशस्र क्रांतीच्या बळावर परिवर्तन आणू इच्छिणाऱ्या शक्ती माओवादी आणि नक्षलवादी घडवत आहेत.जागतिकीकरणामध्ये देशातील एक अख्ख्याच्या अख्खा समाजघटक डावलला गेला.त्यांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण करण्याची तजवीज मायबाप सरकार करू शकलं नाही.आणि त्याबद्दल साधी आस्था देखील दाखवण्याचं कष्ट इथल्या राज्यव्यवस्थेने आजवर घेतलं नव्हत.सिंगूर,नर्मदा,लव्हासा अशा आंदोलनातून स्वतःच अस्तित्व हा समाज टिकवु पाहतो आहे.त्या समुदायाच माणूसपण जितक मओवाद्यांना समजलं तितक आपण समजू शकलो नाही अथवा त्यात अपयशी ठरलो हे निदान आपण स्विकारायला हवं. पोटाला अन्न आणि हाताला काम देण्याची तजवीज इथल्या राज्यव्यवस्थेकडून होत नाही म्हणून ही तरुणाई अशा चळवळीकडे आकर्षित झालेली दिसते आहे.महात्मा गांधी,पंडित नेहरू,डॉ.आंबेडकर यांच्यापेक्षा मग त्यांना लेनिन,माओ,ह्युगो चेविझ जवळचे वाटतात.लोकशाही स्वीकारलेल्या राज्यघटनेला मग तिलांजली दिली जाते आणि क्रांतीच्या नावाखाली रक्ताचा अभिषेक दिला जातो.
भारतीय लोकशाहीला अपेक्षित नितीमुल्ये कुठेतरी समाजापर्यंत पोहोचत नाहीत अस वाटत.क्रांतीच हत्यार शांततेच्या तत्त्वातून आणि बुद्ध-महावीरांच्या करुणेतूनही सापडतं हे तरुणाई विसरते.लोकशाही व्यवस्थेत एक व्यक्ती एक मत जरूर आहे,पण प्रत्येक मताला एकसारखी "पत" देणारी व्यवस्था नाही.ही व्यवस्था आपण दुसरीकडे शोधतो आहोत.एकसंघ,अखंड भारतवर्षाच स्वप्न बघणाऱ्या तरुणाईपुढे जर योग्य आदर्श ठेवण्यास अन आदर्श लोकशाही व्यवस्था ठेवण्यास जर आपण यशस्वी झालोत तर पुढच्या पिढ्यांनाही हे दिशादर्शक ठरणार आहे.
इंजि.सागर भालेराव.

No comments:
Post a Comment