"डर्टी" पोलिस+अपमान+कॉलेजचे दिवस.
इंजीनिअरिंगचे दिवस आठवले कि अजूनही मन प्रसन्न होउन जात. रात्ररात्रभर केलेला टाईमपास असो,किंवा उगाच लेक्चरला दांडी मारून मित्रांच्या खोलीवर झाडलेल्या गप्पा असोत.अतिशय अविस्मरणीय आणि आयुष्यभराची शिदोरी देऊन गेलेला हा जिवंतपणीचा ४ वर्षांचा सुकाळ....!!
असाच काल विचार करत बसलो आणि एक किस्सा आठवून स्वतःच हसत बसलो.....
विद्या बालनचा बहुचर्चित "डर्टी पिक्चर" रिलीज झाला होता.संगमनेर शहरात त्या काळी (फार नाही २ वर्षापूर्वीच) २ सिनेमागृहे होती.एक राजस्थान थिएटर जे गावच्या भरवस्तीत लोकांना मनोरंजनासाठी उपलब्ध होत,तर दुसर यशोदीप थिएटर जे गावकुसाच्या बाहेर ६-७ किलोमीटरवर. सिनेमाच नावच इतक "डर्टी" असल्याकारणान हा सिनेमा आम्ही मित्रमंडळी न पाहिल्यावाचून राहणार तर नव्हतोच.रात्री ९ ते १२ चा शो पाहायचं ठरलं.जेवण करून आम्ही ,म्हणजे मी एकटा गावातला आणि बाकी सगळे ४-५ जण होस्टेलचे मित्रमंडळी सिनेमा पाहायला निघालो.यशोदीपला पोहोचलो तर शो हाउसफुल होता.काही झाल तरी आज सिनेमा पाहायचाच असा चंग बांधलेल्या आम्ही लोकांनी राजस्थानला जायचं ठरवलं.लिफ्ट मागत,ट्रक,रिक्षा भेटेल ते साधन घेऊन आम्ही गावात पोहोचलो.कसेबसे इथे तिकीट उपलब्ध होते ते घेतले.पान,गुठखा,तंबाखू यांनी रंगवलेल्या खुर्च्यांवर आम्ही रंगीले आसनस्थ झालो.तिथे पडद्यावर विद्या बालन हुलाला हुलाला करत असताना आम्ही मात्र ढेकणे चावत असल्यामुळे चलबिचल करत होतो.सिनेमा संपला.गर्दी ओसरल्यावर आम्ही निवांतपणे थिएटरच्या बाहेर पडलो.रात्रीच्या १२ वाजता डर्टी सिनेमा पाहून निघालेलो आम्ही सगळे बऱ्यापैकी मूडमध्ये होतो आणि टिंगलटवाळी करत निर्जन रस्त्यावरून बसस्थानकाच्या दिशेने चालत जात होतो.रस्त्यात एक दुग्धालय लागल.घट्ट आणि "गरमागरम मलई मार के" वाल दुध पिण्यासाठी मी कायम तेथे जायचो.सगळ्या कॉलेजवयीन मुलाचं हे आवडीच ठिकाण.तेथून जवळच काही अंतरावर माझी लायब्ररि होती. रात्री लायब्ररि मधून घरी जाताना मी कायम इथे दुध पिउन जायचो.म्हटलं ,इतका छान सिनेमा पाहून आलोय म्हटल्यावर होस्टेलच्या मित्रांना हे दुध पाजुयात...त्या वेळी संगमनेर शहराचं वतावरण काहीस गढूळ होत.जातीय तणावाचे प्रकार वरचेवर घडत होते.स्थानिक कॉलेजमध्ये झालेल्या आंतरजातीय प्रेमप्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रकार काही धर्मवेड्यांनी चालविला होता.अशा पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त चालू होती.नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरच हे दुग्धालय आम्हा मित्रांच्या गडबड गोंधळामुळे गजबजलेल वाटत होत.नेमकी अशाच वेळी पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी दुग्धलयासमोर येउन उभी राहिली.गाडीत बसलेल्या पोलिसकाकांनी आम्हाला हटकल आणि कुठे हिंडताय वैगेरे प्रश्न केले.आम्हा सगळ्यांच्या वतीने मी पुढारपण घेत सौम्य भाषेत उत्तरे दिली.आता पोलिसांनी मोर्चा दुग्धलायाच्या मालकाकडे वळविला.त्या दुकानमालकाच्या आई-बहिणीच्या उद्धाराने संभाषणाला सुरुवात केली.मला ते खटकल आणि मित्राच्या कानात कुजबुजलो कि काय वाय-झेड असतात हि पोलिसवाले...झालं! नेमकं कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकंच वेळ झाली. आणि गाडीत बसलेल्या हवालदाराने माझ वाक्य ऐकलं! त्याला माझ वाक्य पूर्णपणे ऐकू गेल नसणार पण माझ्या बोलण्याचा आशय मात्र त्याला नक्की समजला होता.स्वतःच्या गल्लीत कुत्रा पण वाघ असतो अस म्हणतात न,तेव्हा तो हवालदारसुद्धा आता माझा उद्धार करायला लागला.रात्रीचे फिरून दरोडे टाकायचा आणि दंगल घडवायचा विचार आहे कि काय ..अस काहीबाही पोलिसी खाक्यात बरळायला लागला. आता मात्र मनातून मला राहवत नव्हत,पण म्हटलं आता जर तोंड उघडल आणि काहीबाही बोललो तर मात्र माझी काही धडगत नाही.सगळे पोलिस मिळून माझा "मन्या सुर्वे'' करतील हे पक्क होत.लागलीच सगळे आम्ही तेथून सटकलो.आता माझ्या मित्रांना मात्र माझी टिंगल करायला कारण आणि निमित्त मिळालं होत.पुढारगप्पा मारणारा तू पोलिसी खाक्या भेटताच शेपूट घालून पळून आला असं ऐकवत गमतीचा केंद्रबिंदू आता माझ्याकडे सरकला होता.सरळसरळ माझ्या व्यक्तिमत्वावर पडलेली हि गदाच होती.माझा अहंकार नाही म्हटलं तरी दुखावला गेला होता. मित्रांना एकदाच वाटी लावलं.ते होस्टेलला आणि मी घरी निघून आलो.
झाल्या प्रकारामुळे रात्री उशिराने झोप लागली.काही तरी करून झाल्या अपमानाचा जाब विचारायचा असं वाटायला लागल.काल सिनेमा बघायला सोबत असलेल्या मित्रांना जेवायचं निमंत्रण देऊन घरी बोलावलं आणि त्यांना जेऊ न घालताच पोलिस स्टेशनला नेल.कधीकाळी काही निमित्ताने शहर पोलिस निरीक्षकांची ओळख झाली होती आणि ते माझ्या बऱ्यापैकी संपर्कातही होते.ओळखीचा फायदा करून घ्यायचं ठरवलं.पोलिस स्टेशन मध्ये शिरताच सरळ पोलिसनिरीक्षकांच्या दालनात शिरलो.काल रात्री झाला प्रकार कथन केला..दुग्धलायातून बाहेर पडताना पोलिसांच्या गाडीचा नंबर मी पहिला होता आणि मनातल्या मनात घोळवलाही होता.त्या गाडीत रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांवर मला "धमकावयाच्या" गुन्ह्याखाली तक्रार दाखल करायची आहे अस सांगितलं.माझ्या भावना ओळखून हा मुलगा वेगळंच भलत प्रकरण आपल्या अंगावर शेकवेल अशी भीती वाटल्याने त्यांनी "त्या" गाडीत गस्तीवर असलेल्या पोलिसांना पुढच्याच मिनिटाला पाचारण केलं.काल माझ्यावर डाफरणारे आज त्यांच्या बॉससमोर अदबीने वागत होते.निरीक्षकांनी शहानिशा केली.आणि "त्या" पोलिसांना माझ्या आणि माझ्या मित्रांसमोरच समज दिली.आता कुठे माझ्या मनाला शांतता मिळाली होती.मित्रमंडळींना घेऊन पोलिसस्टेशन बाहेर पडलो.काल माझ्यावर हसणारे मित्र आता माझी टिंगल करणार नव्हते या जाणीवेने मला भरून पावल्यासारख वाटत होत.घरी गेल्यावर मित्रांना जेऊ घातलं आणि परत पाठवलं.......डर्टी सिनेमा इतरांसाठी काल रात्रीच संपला होता,पण माझ्यासाठी तो दुसऱ्या दिवशी दुपारी संपला.........
# आणि परत कधीच रात्री सिनेमा पाहायचा प्लान केला नाही.

No comments:
Post a Comment