दोन नोबेल दोन देश ....!!
जागतिक मानवी हक्कदिनी नोबेल पारितोषिकाच वितरण केल गेल. उत्सवमूर्ती होते भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफजाई.भारत आणि पाकिस्तानच्या शान्तिदुतांना नोबेल पुरस्कार मिळण हा निव्वळ योगायोग आहे असे मला तरी वाटत नाही.एकीकडे पाकिस्तानात त्याच्या स्वतंत्र निर्मितीपासून कट्टरता पाळत आला आहे तर आपला भारत देश आता कट्टरतेकडे आगेकूच करत आहे.अशा संक्रमणाच्या काळात हे शांतीचे नोबेल मिळणे यामागे काहीतरी हेतू निवड समितीचा असू शकतो.भविष्यात या दोन देशांनी आपल्या आपल्या देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असताना शेजारधर्म म्हणून शांतिवार्ता चालवावी अशी अपेक्षा यामागे असू शकते.सार्क परिषदेत भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान पारंपारिक वैऱ्यासारखे वागले.पाकिस्तान दर वेळी सीमेवर कुरापती करत असतो,अतिरेक्यांना सीमेवरून आत सोडलं जात.मच्छिमारांना बेकायदा डांबून ठेवलं जात.पण आता मात्र शांतिवार्ता केवळ दिखावा होऊन बसला आहे.भारतात तर अंतर्गत वाद इतके वाढत आहेत कि विचारता सोय नाही.स्वराजबाई गीतेला राष्ट्रग्रंथ काय म्हणते,कुणी एक भाजप खासदार नथुराम गोडसेला देशभक्त काय म्हणतो,कोणी एक साध्वी रामजादे व्हयाच कि हरामजादे व्हायचं असा सरळ लोकांना प्रश्न विचारते. अशा प्रकारची विषाची रोपटे लावण्याची सुरुवात आता भारतात झाली आहे.गांधीजींना नोबेल पुरस्कार समितीने म्हणे दोन वेळा डावललं. हरकत नाही,पण एका गांधीवाद्याला तुम्ही पुरस्कार दिला त्यातच सगळ आल.त्यांना वेगळा पुरस्कार देण्याची गरजही नाही. बुद्ध,गुरुनानक,गांधी यांची प्रेरणा घेऊन सत्यार्थी आज "बचपन बचाव" चळवळ चालवत आहेत. त्यांच्या कामाची दखल भारतीयांना घ्यायला वेळ मिळाला नाही पण जागतिक पातळीवर मात्र त्याची दाखल घेतली गेली.कोणत्याच प्रार्थनास्थळात इथल्या लहान मुलांच्या भुकेचा,शिक्षणाचा आणि हक्काचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती नाही,असा प्रश्न उपस्थित करून सत्यार्थी यांनी इथल्या सामाजिक व्यवस्थेवर कोरडे ओढले आहेत.मलाला आणि सत्यार्थी यांनी जेव्हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा उपस्थित जन्सामुदायातील एक महिला रडताना दिसली,एका हाताने मोबाईल कॅमेरामध्ये शुटींग आणि एका हाताने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसताना पाहून मलाही भारावून आल.त्यांच्या कार्याला जगाने आज मान्यता दिली.किती तरी वेळ टाळ्यांचा कडकडात त्या सभागृहात गुंजत राहिला. हे दोन नोबेल म्हणजे क्षितीजावरले दोन ध्रुव आहेत.एक ध्रुव मुलींच्या शिक्षणासाठी लढते आहे तर दुसरे लहानग्यांच्या हक्कासाठी.ह्या दोघांची लढाई आता लोकलढा व्हावा.महिला,बालक,श्रमिक,कष्टकरी यांचे प्रश्न जगाचे प्रश्न व्हावेत. भारतात स्रीशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी काम केल म्हणून आज भारतातील महिला सक्षम आहे.पाकिस्तानला मलाला हि सावित्रीची लेक जरा उशिरा मिळाली.उशिरा का होईना तिथे महिला शिक्षणाची चळवळ उभी राहिली आहे हे उल्लेखनीय.आणि भारतात अजून दलित,आदिवासींना माणूस म्हणून जगण्याची अजून मुभा मिळाली नाही.तिथे लहान मुलांचे प्रश्न तर कोसो दूर आहे.अशा फाटाफुटीच्या काळात सत्यार्थी यांच्या कार्याचा गौरव व्हायलाच हवा.
या दोन्ही नोबेल लोकांना शुभेच्छा......तुमच्या कार्याची प्रेरणा आम्हालाही मिळो.दिगांतरात मानवी हक्काचा आवाज घुमत राहावो. जिंदाबाद.!!!

फारच समर्पक शब्दात अशी माहिती सागर तुम्ही लिहिली आहे . देश अंतर्गत असणारे राजकारण , धर्मकारण यावर उत्तमरित्या भाष्य करणारा हा ब्लोग आहे.
ReplyDelete