त्यांचा ओणम आणि आणि आपली भाऊबीज.....
आज ओणम असल्याकारणान एका मल्याळम मैत्रिणीच्या घरी भोजनाच आमंत्रण होत.ओणम हा सण का साजरा केला जातो आणि कसा साजरा केला जातो याची जराशिसुद्धा कल्पना नव्हती.मस्त पैकी केळीच्या पानावर जेवण वाढली गेली.सगळ काही साग्रसंगीत! केरळ मध्ये आल्याचा पुरेपूर आभास.घरातले सगळेच आपल्या पारंपारिक वेशात.मैत्रिणीची आई,आजी,वडील,इतर सर्व नातेवाईक त्यांच्या पारंपारिक पेहेरावात.पांढऱ्या रंगाच्या आणि सोनेरी किनार असलेल्या साड्या घरातल्या महिलांनी घातलेल्या होत्या.एकंदरीत पिव्वर मल्याळी वातावरण.सांबर भात,नारळाच्या खोबऱ्याची चटणी,खीर,वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि इतर बरंच काही.म्हटलं आता अधाशासारख ताटात लक्ष केंद्रित न करता इकडल्या तिकडल्या गप्पा कराव्यात.तेव्हा मैत्रिणीला या सणाचं महत्व विचारलं.तिने सांगितलेली माहिती माझ्या ठाई जुनी असली तरी नव्याने माहिती मिळत होती.
महाबली नावाचा एक राक्षस कुळातील राजा होता.सगळेच राक्षस वाईट नसतात,तसा हा पण राजा वाईट नव्हता .प्रजेवर आपल्या मुलांप्रमाणे हा प्रेम करायचा.प्रजा जे मागेल ते देण्यास हा महाबली राजा मागेपुढे पाहत नसायचा.दानशूर असलेल्या या राजाची सर्वदूर ख्याती होती.त्याच्या दानशूरपानाचे किस्से चारही मुलखात दंतकथांसारख्या सांगितल्या जायच्या.एकदा या राजाची ख्याती ऐकून भगवान विष्णूने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं.भगवंतांनी वामन अवतार घेतला आणि महाबली राजाच्या दरबारात आला.भगवंतांनी त्याला ३ पाऊल जमीन मला दान स्वरुपात दे अशी मागणी केली.राजाने ती मान्य केली.आणि काय गहजब,बटूक असलेला वामन महाकाय झाला.त्याने एका पाऊलात संपूर्ण पृथ्वी,दुसऱ्या पाऊलात आकाश पादाक्रांत केल.आत संपूर्ण विश्व वामनाने बळकावल त्यामुळे तिसर पाऊल कुठे ठेवाव असा वामनाला प्रश्न पडला.महाबलीने सांगितलं,मी माझ्या शब्दाला जागणारा आहे,तिसर पाऊल तू माझ्या डोक्यावर ठेव.झाल..वामनाने डाव साधला,महाबली राजाच्या डोक्यावर पाय ठेऊन त्याला वामनाने पाताळात धाडलं.जाताना शेवटची इच्छा मात्र त्याला विचारली,राजा म्हणाला,मी माझ्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करतो,माझ्या प्रजेला मला वर्षातून एकदा भेटता येईल अशी आज्ञा द्यावी.वामनाने त्याला आज्ञा दिली.त्यानुसार आजच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी महाबली राजा आपल्या प्रजेच्या भेटीला येतो असा मल्याळी लोकांचा समज आहे.आणि हा दिवस ते "ओणम" या नावाने साजरा करतात.
ही कथा ऐकल्यावर जेवण करता करताच डोक्यात विचारचक्र फिरू लागली.भाऊबीजेला बहिण ओवाळायला लागली,कि आई तिला शिकवायची कि ओवाळताना "इडा पिडा जावो बळीच राज्य येवो" अस म्हणावं.तेव्हा आईला याबद्दल विचारलं तेव्हा तिनेसुद्धा रंजक माहिती सांगितली होती.बळी राजा हा आपला बहुजनांचा राजा.त्याच्या राज्यात आपण शेतकरी फार सुखी होतो.सगळ काही व्यवस्थित होत .मात्र त्यादरम्यान परकीयांनी (आर्यांनी) आक्रमण केल. त्यामध्ये "वामन" नावाच्या ब्राम्हणाने कपटाने बळी राजाचा खून केला.आपला भाऊ सुद्धा बळी राजासारखा पराक्रमी होऊ दे,दानशूर होऊ दे अशी मागणी आपण यावेळी करायची असते,म्हणून ओवाळताना ह्या ओळी म्हणाव्यात.
एकीकडे हा राक्षस गणातला राजा,त्यातही दयाळू आणि दानशूर,इतका दानशूर कि भगवंतालाही त्याची परीक्षा घेण्याचा मोह आवरू नये? बर परीक्षा घेतली तरी त्यात सरळ घातपात? हे काही पचनी पडेना....इतका लोकप्रिय राजा कि त्याच्या रयतेने आपल्या भावाला ओवाळतानाही त्या राजाची आठवण काढावी आणि भावाला "बळीच" राज्य येवो अस म्हणावं म्हणजे तो राजा नक्कीच क्रूर नसावा.त्या राजाच्या स्वागतासाठी ओणम १० दिवस साजऱ्या करणाऱ्या केरळी लोकांना तो आपला वाटतो म्हणजे तो तितकाच लोकप्रिय असावा.इतिहासाची मोडतोड करण्याची आपल्या भारतीयांना मोठी घाण सवय.लोकायतवादी चार्वाकांना देखील महाबली/बळी राजाप्रमाणे संपविण्यात आल.बहुसंख्यांचा आणि अल्पसंख्यांकांचा संघर्ष असा शतकानुशतके सुरु आहे.त्याला थांबा कुठे भेटणार कोण जाणे?? या सगळ्या प्रश्नांची आता नव्याने मांडणी होणे गरजेचे आहे.इतिहासातली वांगी इतिहासात बरी, हे देखील तितकाच खर,परंतु राहून राहून ओणम आणि भाऊबीज साजरी करून त्या वांग्याचं भरीत आपणच बनवीत आहोत तेव्हा त्या मागची कारणमीमांसा होणे देखील गरजेचे.
जेवताना इतकं सगळ मनात काहूर चालू असताना,मैत्रिणीच्या आईने ताटात सांबर ओतल,आणि मी भानावर आलो.त्या ताटात ओतू गेलेल्या सांबराला हाताने पुन्हा भातावर घेतलं.आता भाताच गोल आळ करून त्यात सांबर घेतलं.आणि कोपर्याने हलके हलके बाजूला काढत खाऊ लागलो.साला आपल्या संस्कृतीचे हाल सुद्धा त्या आळ घातलेल्या भातासारख झालेत.न त्याला बाहेर पडायची सवलत,आणि पडलाच तर एकदम केळीच्या पानावरून सरळ जमिनीवर नाहीतर कुणाच्या तरी पोटात.....
आता खरकटे हात सुखायला लागले,तेव्हा उठलो आणि हात धवून घेतले.यथेच्च ढेकर दिला,माझ्या अर्थी माझा "ओणम" अजूनही संपला नव्हता.

No comments:
Post a Comment