देवीच्या मासिक धर्माचा उत्सव : कामाख्या

     मागच्या महिन्यात आसाम ला जाण्याचा योग आला. या प्रवासात 'कामाख्या' या 51 शक्तिपीठापैकी एक असलेल्या शक्तिपीठ मंदिराला भेट दिली.सहसा मंदिरांना भेटी देत नसतो,परंतु ज्या मंदिराच्या बाबतीत मनोरंजक कथा आहे तिथे प्रकर्षाने जात असतो. कामाख्या हे गुवाहाटी पासून अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल गाव आहे. इथे आदिशक्ति सतीचे मंदिर आहे.हे मंदिर पूर्णपणे सती देवीच्या शरीराचे नसून, देवीच्या योनीचे हे मंदिर आहे.
        एक तर भारतीय संस्कृतीत स्रियांच्या गुप्तांगाबद्दल बोलायची मुभा नाही, तेव्हा सरळ सरळ योनिच् मंदिर? आणि ते सुद्धा एका देवीच्या?  आश्चर्य वाटल. तिथे पुरोहित असलेल्या पांडा या जमातीच्या एका व्यक्तीला पकड़ल आणि माहिती विचारलि, त्यांनी संगीतलेली माहिती मोठी रंजक होती.
          सती ही राजकन्या,दक्ष राजाची ही मुलगी.सती ही स्मशानात राहणाऱ्या शंकर देवाच्या प्रेमात पडली. दक्ष राजाला याचा विरोध होता. सती देवी आणि शंकर देवाच लग्न झाल्यानंतरही दक्ष राजाचा राग काही शमला नव्हता. अशातच दक्ष राजाने एक यज्ञ सोहळा आयोजित केला, परंतु या सोहळ्याला आपला जावई शंकर देव आणि मुलगी सती ह्यांना निमंत्रित करण्याचे टाळले. आपल्या नावरयाचा हां आपमान सहन न झाल्यामुळे, या सोहळ्यात विघ्न आणावे म्हणून सती देवीने यज्ञात उडी घेतली. यात सतीचा देह जळाला. शंकर भगवानांना हे कळाल्यावर ते क्रोधित झाले आणि सतीचा जळलेला देह घेवुन तिन्हीलोकात हैदोस मांडला. भगवान् शंकराला शांत करण्यासाठी भगवान विष्णुने सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे 51 तुकडे केले. सतीच्या देहाचे ते 51 तुकडे पृथ्वीतलावर पडले, आणि त्या त्या ठिकाणी शक्तिपीठाची स्थापना करण्यात आली. कामाख्या येथे सतीची "योनी" पडली. त्यामुळे येथे देवीच्या योनिचि पूजा केली जाते.इथे कुठलीही मूर्ति नाही. स्रीच्या योनिच्या आकाराची येथे शिला आहे,त्याची पूजा केली जाते.
    आता साधारण महिलेला मासिक धर्म येतो म्हटल्यावर जगतजननी असलेल्या सतीलाही यातुन सुटका कशी मिळणार? तेव्हा वर्षातून एकदा इथे रजस्वला येणाऱ्या देवीच्या मासिक धर्माचा विधि अगदी सोंगाढोंगाने साजरा केला जातो. 21 जुन ते 25 जुन साधारण वर्षात आणि 22 जुन ते 26 जुन लिप वर्षात देवीच्या रजस्वाचा उत्सव साजरा होतो. या 4 दिवसांत कोणालाही मंदिराच्या गाभार्यात् प्रवेश नसतो. अगदी पंड़ितवर्गालाही येथे प्रवेश निषिद्ध असतो.या 4 दिवसानंतर मंदिराच्या गाभार्यातून लाल पाणी बाहेर पड़ते, त्यानंतर मंदिराच्या बाहेर उत्सव साजरा केला जातो. आसाम मधील 'खासी' या मातृसत्ताक जमातीची ही कुळदेवता आहे.प्रसाद म्हणून देवीला रक्तवर्णाचे म्हणजे लाल रंगाचे कापड चढविले जाते. देवीला मांसाहार चालतो. नवसाला पावणाऱ्या देवीला मंदिरासमोरच गाय,बैल,कबूतर,बकरी,बदक यांचा बळी दिला जातो. आणि विशेष म्हणजे बळी देण्याचे काम इथला पुरोहित वर्ग करतो.
     सगळ वातावरण बघितल्यावर कुठेतरी वेगळ्याच् विश्वात आलो की काय अस जाणवल, सगळा मंदिराचा परिसर लाल कपड़्यांनी, लाल ओढनी, लाल कुंकु ,लाल पंचा यांनी लालेलाल झालेला दिसतो. महिलावर्गाची येथे भलीमोठी गर्दी असते. देशाच्या ईशान्य-पुर्वेला असलेल्या या मंदिराला आता शिर्डी,तिरूपति सारखी 'संस्थानी' चटक लागलेली दिसते. 500 रुपयांची पावती केली की तुम्हाला सरळ व्हीआयपी एंट्री असते.पुरोहित वर्ग मंदिराच्या समोर असलेल्या चौथरयावर बसलेला असतो, पूजा करुण घ्या म्हणून दुसऱ्या राज्यातून आलेल्या भक्तांच्या मागे फिरताना दिसतो.
         हे सगळ बघुन्  अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली. एकीकडे आपण स्रियांचा मासिक धर्म आला की त्यांना मंदिरात जाणे, देवघरात जाणे नाकरतो आणि दुसरीकडे अशा प्रकारची पूजाहि करतो. एका ओळखीच्या मैत्रिणीच्या घरी तर अशा अवघड दिवसांत मुलीने घरभर फिरुन विटाळ करू नये म्हणून स्वयंपाकघरात एक अयताकृति फरशी बसवलेली आहे, त्या अवघड दिवसांत ह्या चौकटितच बसायच् असा नियम आहे. आपण अजूनही अशा चौकटित अडकून आहोत. केवळ पुराणे सांगतात म्हणुन पूजाअर्चा करण्यापेक्षा स्रीला स्रीत्वाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
      कामाख्याला भेट देवुन महिना होत आला, पण तिथल्या परंपरेच गारुड़ अजूनही कायम आहे,कितीतरी प्रश्नांसह।

इंजी.सागर भालेराव
पत्रकारिता विभाग,
मुंबई विद्यापीठ,
मुंबई
9595842238

5 comments:

  1. आसाम च्या भेटीदरम्यान आलेल्या भौतिक, सामाजिक मानसिकतेच्या अनुभवांपैकीमधील हा अनुभव खुप छान व्यक्त केलायस. Keep it up...!!!

    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम मांडणी केली आहेस सागर.मासिक धर्म हा नैसर्गिक असून तिचा सन्मान करण्या ऐवजी संस्कृति तिला बंधनांच्या चौकटित बंधिस्त ठेवते आहे,तुझ्या ह्या article ने अनेक डोले उघड़तील ही अपेक्षा

      Delete
  2. खूप छान मांडणी केली आहे ... याबद्दल कधी माहिती घेतली नव्हती आज ती तुझ्या पोस्ट मधून माहिती मिळाली...एकीकडे पाळी हा शब्द जरी उचचारला तरी आई म्हणते गप्प बस तुला काय कळतंय ...अशी आजची परिस्थिती बदलासाठी नक्कीच या पोस्टची मदत होईल...

    ReplyDelete