`अखंड भारताची (ब्रिटिश इंडिया) रक्तरंजित फाळणी झाल्यानंतर भारत (15 ऑगस्ट 1947) आणि पाकिस्तान (14 ऑगस्ट 1947) स्वतंत्र झाले. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल मोहम्मद अली जीना यांनी आपापल्या देशाला मार्गदर्शन करणारी भाषणं केली. नेहरूंचे 'नियतीशी करार' आणि जीनांचे 'पहिलं अध्यक्षीय मनोगत' ही भाषणं गाजली. दोन्ही देशांनी कोणत्या दिशेने वाटचाल करावी, हे सुचवणारी ही भाषणं 'जग बदलवणाऱ्या भाषणांच्या' मालिकेत , स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने....
भविष्य आपल्याला न्याहाळत आहे
पं. जवाहरलाल नेहरू
पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार वेत्र्ला होता, आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु बर्याच अंशी प्रत्यक्षात आणण्याचा आज क्षण आला आहे. मध्यरात्रीच्या या प्रहरी, जेव्हा सगळे जग झोपले आहे, तेव्हा भारत जागा होतोय; त्याच्या जीवनाप्रति आणि स्वातंत्र्याप्रति!
इतिहासात क्वचितच येणार्या क्षणी आपण जुन्याकडून नव्याकडे जात आहोत. एका युगाचा अंत होतो आहे. अन् वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी; भारतभूमीप्रति, तिच्या जनतेप्रति आणि त्याहूनही महान अशा मानवतेप्रति आम्ही समर्पित होऊ, अशी प्रतिज्ञा करणे हे अत्यंत औचित्यपूर्ण ठरेल.
इतिहासाच्या उषःकालात भारताने आपला न संपणारा शोध सुरू वेत्र्ला. शतकानुशतके अविरत संघर्ष करून अन् जयापजयाचे डोंगर पार करून! चांगल्या वाईट शक्तींशी भारताने सामना केला परंतु भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही किंवा ज्या आदर्शांनी तिला सामर्थ्य दिले त्यांना भारत विसरला देखील नाही. आपला अंधःकारमय गतकाळ आज संपतो आहे. भारताला पुन्हा एका स्वत्वाची जाणीव होते आहे.
आज आपण साजरी करत असलेली उद्दिष्टपूर्ती ही आपली वाट पाहणार्या विजयश्रीच्या प्रसादाची केवळ एक पायरी आहे. प्रश्न आहे तो, ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य आपल्यात आहे काय?
स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारी देखील येत असते. भारताच्या सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या या घटनासमितीवर ही फार मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी आपण काही प्रसववेदना सहन केल्या आहेत; त्यातील दुःखद आठवणींनी आपले अंतःकरण भरलेले आहे; त्यातील काही वेदनांचा सल अजूनही आपण अनुभवीत आहोत. असो, भूतकाळ संपला आहे अन् भविष्यकाळ आता आपल्यासमोर उभा आहे.
हा भविष्यकाळ सहजसाध्य किंवा आरामायक नक्कीच नाही. अविरत आणि प्रचंड महत्त्वाकांक्षेतून आपण वेळोवेळी एक प्रतिज्ञा केलेली आहे, ती प्रतिज्ञा आज आपण पूर्ण करण्यास जातो आहोत. ती प्रतिज्ञा म्हणजे, भारताची सेवा म्हणजे लाखो पीडितांची सेवा आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई यांचे निर्मूलन करणे आणि संधींच्या विषमतेचे निर्मूलन करणे होय. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे, अशी आपल्या पिढीतील महामानवाची महत्त्वाकांक्षा आहे. हे आपल्या आवाक्यापलीडचे असेल; परंतु जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहे तोपर्यंत आपले कार्य संपणार नाही.
आणि म्हणूनच आपण हे सगळे सोसले पाहिजे, त्याच्या निराकरणासाठी काम केले पाहिजे, असले दुःख नष्ट व्हावे म्हणून कठोर परिश्रम केले पाहिजेत; तरच आपली ही स्वप्ने साकार होऊ शकतील. ही भारताची स्वप्ने आहेत, इतकेच नव्हे तर संपूर्ण जगाची आहेत, जगातील सर्व राष्ट्रांची आहेत, सर्व जनतेची आहेत. आज मानव एकमेकांशी अनेकविध धाग्यांनी इतका जोडला गेला आहे की एकमेकांच्या सहकार्याशिवाय त्याला जगणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे शांतता ही विभागता येत नाही; स्वातंत्र्य विभागता येत नाही, त्याचप्रमाणे आता वैभवसंपन्नाता आणि जगातील सर्वनाशही विभागता येणार नाही. तेव्हा आता फार काळ इतरांपासून वेगळे असे एकट्याचे काही असणार नाही. जे काही असेल ते सर्वांचे असेल.
ज्या भारतीयांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या पाठीशी विश्वासाने आणि निश्चयपूर्वक उभे राहावे. आताची ही वेळ क्षूद्र आणि फुटकळ टीकेची, अनिष्ट चिंतनाची वा दुसऱ्यावर दोषारोप करण्याची नाही. जेथे भावी पिढी सुखाने नांदेल अशा स्वतंत्र भारताच्या प्रसादाची उभारणी आपण केली पाहिजे. मान्यवर, मी असा प्रस्ताव करण्याची विनंती करतो की, असे निर्णय घेतले जावेत
1. मध्यरात्रीचे टोले पडल्यानंतर याप्रसंगी उपस्थित घटना सभेच्या सदस्यांनी अशी शपथ घ्यावी की 'तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, मी भारतीय घटना सभेचा सदस्य, भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वतःस अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एका प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी मी सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्घ आहे.'
2. जे सदस्य यावेळी उपस्थित नाहीत. ते पुढील वेळी या अधिवेशनात उपस्थित असतील; त्यावेळी त्यांनी ही शपथ घ्यावी.
Reference: Constituent Assembly Debates.
अनुवा : सागर भालेराव
पूर्व प्रसिद्धी : लोकमुद्रा मासिक, ऑगस्ट 2016

No comments:
Post a Comment