२६ जानेवारीला दिल्लीत झालेला राडा आपण सर्वांनी पाहिला. गेल्या ५०-६० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन केले. निगरगट्ट सरकार मात्र त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. २६ जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर यात्रा काढतील अस जाहीर झाल्यांनतर आशा होती कि सरकार या यात्रेला परवानगी देणार नाही. परंतु घडलं अगदी उलट. सरकारने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर यात्रेला परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांसोबत सामान्य नागरिक देखील आश्चर्यचकित होते. ही खेळी खेळण्यामागे सरकारची मनीषा काय होती हे काल स्पष्ट झालं.
पोलिसांकडून आखून देण्यात आलेल्या रस्त्यावरून शेतकऱ्यांनी त्यांची ट्रॅक्टर यात्रा सुरु केली. यात देशभरातून शेतकरी आपापल्या परीने सामील झाले होते. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे येथून लोकसंघर्ष मोर्चाच्या आंदोलकांच नेतृत्व प्रतिभाताई शिंदे करत होत्या. ट्रॅक्टरवर जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांची वेशभूषा केलेल्या शेतकरी माय-माऊल्या दिसत होत्या. तिकडे दिल्लीत काय घडतंय याचे अपडेट्स प्रतिभाताई शिंदे, योगेंद्र यादव यांच्या मेसेजवरून कळत होते.
एकीकडे सगळ काही सुरळीत असताना अचानकपणे शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, पोलिसांशी झडप अशा बातम्या येऊ लागल्या. गेला महिने-दोन महिने संयम बाळगून असलेले शेतकरी इतकं आततायी कसं वागू शकतात हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. कुणी एक तरुण लाल किल्ल्यावर जातो काय, तिथे झेंडा फडकवतो काय आणि स्वतःच हसं करून घेतो काय, हे सगळ समजण्यापलीकडे होत.
परंतु काही तासांत त्या युवकाची ओळख पटली. लाल किल्ल्याच्या एका पोलवर शिख धर्मियांच निशाण साहिब फडकावणारा व्यक्ती होता दीप सिद्धू. हा एक नवखा अभिनेता असून भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सनी देओल यांच्या प्रचाराची धुरा हाच सांभाळत होता. सुरुवातीला आंदोलनात आल्यानंतर त्याने आंदोलनाचे वातावरण बिघडवण्याचे काम सुरू केल. आंदोलनात तो खलिस्तानवादी भाषणं द्यायला लागला.आंदोलनाच्या संयोजकांनी त्याला वेळीच थांबवलं.
परंतु शेतकऱ्यांच हेआंदोलन बदनाम करण्याचा चंग बांधलेल्या दीपने ट्रॅक्टर यात्रेत घुसखोरी केली आणि जाणीवपूर्वक लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याची छायाचित्रेही प्रकाशित झालेली आहेत. यावरून दीप सिद्धूचा आणि भाजपचा परस्परसंबंध तुमच्या लक्षात आला असेल.
असंवेदनशील राज्यकर्ते जर सत्तेत असतील तर विरोधकांची मते ऐकली जात नाहीच पण सोबतच त्यांना वाट्टेल त्या मार्गाने नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. शाहीन बाग आंदोलनात गुंजा कपूर नावाची एक आरएसएसची कार्यकर्ती बुरखा घालून शामिल झाली होती. या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावताना तिला इतर आंदोलकांनी पकडल होत. तिचं पुढ काय झालं?
शाहीनबागेतच महिला आंदोलाकांवर गोळीबार करू पाहणाऱ्या कपिल गुर्जरची भाजप,आरएसएसशी जवळीक जगजाहीर आहे.
जामिया विद्यापीठातील आंदोलकांवर गोळ्या झाडणारा गोपाल देखील उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा कार्यकर्ता राहिलेला आहे. अराजक तत्वे सामजिक आंदोलनात सोडून आंदोलन हाणून पडण्याचा डाव खुद्द सरकार दरबारी आणि मंत्र्यांच्या सांगण्यावरून होत असल्याचं आता स्पष्ट झालय.
शाहीनबागेत गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश झाला आहे.
सत्तेने मस्तवाल झालेले राज्यकर्ते आता कुठल्याही थराला जाऊ शकतात हे कालच्या घटनेने आपल्याला कळून चुकलंय.




एकदम खर आहे
ReplyDeleteशांततामय चालू असलेल्या आंदोलनात बीजेपी व आरएसएसने जाणूनबुजून आपली माणसे घुसवून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याचा जाहीर निषेध करीत आहे
ReplyDeleteखरं आहे. कधी नव्हे एवढी सरकारची भिती वाटत आहे. कारण सरकार असंवेदनशील आहे.
ReplyDelete