हे मिथक आहे का भिमा??
-"धादांत खैरलांजी" रंगभूमीवर.
सुमारे ७ वर्षापूर्वी म्हणजेच २९ सप्टेबर २००६ रोजी स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात माणुसकीला आणि समग्र परिवर्तनवादी संस्कृतीला काळिमा फासणारा प्रकार घडला.शुल्लक जमिनीच्या वादावरून घडलेल्या "खैरलांजी" हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रासह उभा देश सुन्न झाला.खैरलांजी हत्याकांडात सुरेखा आणि प्रियांका भोतमांगे या दलित कुटुंबातील माय-लेकिंवर तथाकथित सवर्ण समाजातील गावगुंडांनी आळीपाळीने बलात्कार केला. एवढयावरच न थांबता या माय-लेकींच्या योनीत लाकूड टाकून पाशवी वेदना देऊन गावातून नग्न धिंड काढण्याचा संतापजनक प्रकारही करण्यात आला.सदर हत्याकांडाने जातीयतेच वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलं.या घटनेची माध्यमांनी देखील म्हणावी तशी दखल घेतली नव्हती.जनक्षोभ उसळल्यानंतर आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर या गोष्टीचं दाहक स्वरूप जगासमोर आलं होत.या सर्व घटनेचा संदर्भ घेत,अजूनही खेडोपाडी-शहरात शेकडो प्रियांका-सुरेखा नव्याने खैरलांजीला सामोरे जात आहे असं वास्तव सुप्रसिध्द कवयित्री प्रा.प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या पहिल्या वहिल्या नाटकात "धादांत खैरलांजी" मध्ये मांडल आहे. या हत्याकांडाला ७ वर्षे पूर्ण होत असताना हे नाटक रसिकांसमोर आलं आहे.हजारो वर्षांच्या जुलमी व्यवस्थेला नाकारून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्य समाजाने हिंदू धर्माचा त्याग केला.समतावादी युगाचं स्वप्न बघणाऱ्या पुढच्या पिढीला त्यानंतरही वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं.रिडल्स,नामांतर,खैरलांजी इ. प्रकरणात अस्मिता पणाला लावावी लागली.परंतु,ह्या चळवळीला देखील उतरती काळा लागली.स्वहक्कासाठी आणि माणुसकीचा अधिकार मागण्यासाठी लढणारा चित्ता देखील लेचापाचा झालेला दिसला.चळवळीची वाताहत,नव्याने वाढू घातलेला जातीयवाद,त्यातल्या त्यात पंचम वर्ग म्हणून ज्या दलित स्रिया स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करीत आहेत,त्यांच्या समोरच्या समस्या,असं संपूर्ण वास्तववादी चित्र या नाटकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे.आजवर समाजाचा स्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन कायम दुय्यम राहिलेला आहे,आणि त्यातच दलित स्रियांचे प्रश्न चर्चेत आणण्याचं धाडस कुणी केल नव्हत.त्यामुळे " हे सगळ मिथक आहे का भिमा?" असा प्रश्न आंबेडकरी विचारांचे नवयुवक विचारत होती.या प्रश्नाला प्रा.उर्मिला पवार यांच्या "आयदान" मधून त्यांनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.आणि त्याचच पुढच पाऊल हे नाटक आहे असं म्हटलं तरी वावग ठरू नये.
निर्भया प्रकरणानंतर मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढणारा संवेदनशील समुदाय,खैरलांजी हत्याकांडावेळी का पुढे सरसावला नाही? कायद्याने देखील आरोपींना नाममात्र शिक्षा देऊन पिडीतांवर एकप्रकारे अन्यायाच केला.अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा एक उत्कृष्ट प्रयोग रंगभूमीवर होतो आहे.मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाच एक साधन असलेल्या नाटकाद्वारे असे प्रश्न चर्चिले जावेत अन प्रेक्षकांना देखील अशा सामाजिक विषयांवर विचार करायला अंतर्मुख करावे अशी अपेक्षा!
इंजि.सागर भालेराव.
९५९५८४२२३८
१५ सप्टेबरला या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला,या कार्यक्रमासाठी गेलो होतो,त्याबद्दल...

mala suddha he natak patlaa...pan ek aahe ki kuthetari vishyachi dishabhul jhali ase vatle.. aani shehri bhaagt asle anyaay raykaryanchya pathimbyatun sodavle jaavet ashi kahishi kalpana mandli jee manala patat nahi.... So compare to other dalit plays this was ok ...i mean prayatna changla aahe
ReplyDeleteasha ghatna manala sunna karnarya astat! ya ghatnevar aaj ajun ek movie yetey khairlanjalichya mathyawar! prayatna changla aahe!
ReplyDelete