प्रचलित परंपरेतील धर्म सोडण, प्रांत सोडण अगदी सोप असत पण संस्कृती सोडण हे मात्र अतिअवघड. अशक्यातील अशक्य गोष्ट म्हणजे संस्कृतीला तिलांजली देण. हीच संस्कृती कधी समृध्द अडगळ बनते तर कधी बाजारबसवी झालेली गोलपिठाच्या वस्तीत पाहायला मिळते, कधी लाहोरच्या मुशायरामध्ये तत्वज्ञान सांगताना आढळते तर कधी सिंध प्रांतातील लारकानामध्ये उर्दू गझल ऐकताना सापडते. सहाजिकच.संस्कृती ही अशी हजारो वारसांच्या आणि वर्षांच्या नेणीवेतून आलेली उत्पत्ती असते, ती एका रात्रीतून टाकून देता येत नाही. जाणीव थंडावल्या असल्या तरी ज्यांच्या नेणीवा शाबूत आहेत अशा लोकांना शिवसेना नामक माजकारणी पक्षाने गुलाम अली साहेबांच्या गझल कार्यक्रमाला केलेल्या विरोधाचे आणि तो कार्यक्रम रद्द झाल्याचे ऐकल्यावर नक्कीच असहाय्य वाटले असणार.सहाजिकच. जेव्हा जीवनावश्यक गोष्टी मिळाल्यावर मानवी जीवन स्थिरस्थावर झाले तेव्हा उद्योगी मेंदूला कला आणि सर्जनशीलता सुचली. त्यातून मग संगीत,नाट्य आदी सर्जनशील कलाकृतींची निर्मिती झाली. हे सगळ घडायला लाखो वर्षे लागली, आणि मानवी बुद्धीची वैचारिक जडणघडण त्यायोगे होत गेली. ही झाली सृजनशीलता ज्यातून सुजाण नागरिक घडेल आणि समाजकारणात आपला सहभाग देईल असे अपेक्षित होते.सहाजिकच.
परंतु हाच मानव अतिहुशार झाल्यावर धर्म नामक अफूच्या गोळीचा मुरीद बनला, वेदांआधी माणूस होता हे तो विसरलो आणि हळूहळू धर्म-जात-पंथ याच्या आक्राळविक्राळ भिंती उभ्या राहिल्या.माणूस मग धर्माच्या नावावर विखुरला गेला आणि कधी इस्लामिक राष्ट्र तर कधी हिंदुराष्ट्राची सनातनी मागणी करू लागला ते सुद्धा सहाजिकच. त्यांच्या रडारवर मग कधी आतिफ असलम, कधी आबेदा परवीन तर कधी गुलाम अली साहेब राहिले. राजकीय संघर्षाच्या वांग्यावरच तेल मग सांस्कृतिक संघर्षावर येऊ लागल. नकळत आपण इतके कट्टर बनलो की अनेक विषयांची सरमिसळ करत नवा सांस्कृतिक दहशवाद निर्माण करण्यात यशस्वी ठरलो. गाणे गाणारी मंडळी चालतील पण विचार गाणारे लोक नको म्हणून इथल्या विद्रोही कवींना आणि लेखकांना जीवे मारण्याचे फतवे काढले गेले. या प्रत्येक गोष्टीमागे राजकारण आणि त्यायोगे आलेलं हिंसावादी प्रदर्शन होत हे विसरता येणार नाही, सहाजिकच.
हे कट्टरतावादी लोक जेव्हा गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरीच्या मंदिरावरून अखलाकला मारण्याची आरोळी देत होते तेव्हा गप्प होते, घरात शिरून त्याच्या कुटुंबाला मारहाण केली जात होती आणि एक जीव घेतला जात होता तेव्हा देखील हे चूप होते. त्यांनी ना निदर्शने केली ना संताप व्यक्त केला. सहाजिकच.जेथे माणुसकी गायली जात नाही तेथे कलाकार काय गातील? गुलाम अली साहेब जेव्हा गाण गात असतात तेव्हा ते कुठल्या धर्माचे, देशाचे नसतात त्यांच्या गाण्यातून मिळणारा स्वर्गानंद देखील कुठल्या पंथाचा नसतो, बुरसटलेले लोक त्याला आपल्या अविचारी डोक्याने भगवा किंवा हिरवा रंग देत असतात . कारण रंग देखील तुमच्या आमच्या नेणीवेतून आलेला असतो, तेव्हा त्याच भावनिक भांडवल करण हे त्या माजकारणी लोकांना सहजशक्य असत, कारण आम्ही प्रचंड भावनिक आणि धर्माभिमानी असतो.सहाजिकच. सुरक्षेत्र नामक एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये ज्युरी म्हणून पाकिस्तानी गायक आहेत म्हणून खाज ठाकरे नामक अशाच एका माजकारणी माणसाने या कार्यक्रमाला विरोध केला होता आणि त्यावेळी एक कलाकार म्हणून खाज ठाकरेला उत्तर स्वतः आशा भोसले यांनी दिले होते. तेव्हा असे थिल्लर आंदोलन करून प्रसिद्धीच्या झोकात राहण्याही खानदानी परंपरा शिवसेना जपते आहे.बाकी काही नाही. पाकिस्तानी क्रिकेटर आणि अंडरवर्ड डॉन दाउद याचे व्याही जावेद मियादाद याला मातोश्रीवर बोलावून त्याचा पाहुणचार करणाऱ्या हिंदूहृद्यसम्राट बाळ ठाकरे यांच्या आत्म्याला गुलाम अली साहेबांची बातमी ऐकून प्रचंड वेदना झाल्या असणार.सहाजिकच(प्रचंड प्रश्नचिन्ह).
आदेश बांदेकर नामक भावोजी याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले, हे साहेब देखील एक स्वयंघोषित कलाकार आहेत जे पैठणी साड्या उभ्या महाराष्ट्रातील महिला वर्गाला देत फिरतात. त्यांच्या एकाही कार्यक्रमात अजूनपर्यंत मुस्लिम महिला आपण पहिली नसेल, एवढेच कशाला सिद्धार्थनगर, कांबळेवस्ती किंवा राजवाड्यातील एकही महिला अजून या मंचावर ह्या महाशयांनी आणलेली नाही. ते कलाकार जरी असले तरी त्यांच्या पक्षाची हुजरेगिरी आणि जोहारकी करणारे हे उत्तम कलाकार आहेत. कलाकार या साधनेच्या कुठेही आसपास न फिरणारे हे व्यक्तिमत्व लवकरच आमदारकीसाठी पात्र ठरतील अशी चिन्हे आहेत. सहाजिकच. पण त्याने गुलाम अली साहेबांच्या कलाकारीवर फरक पडत नसतो, भारतीय जाणकार रसिक त्यांना या अगोदरही ऐकत होते आणि यापुढेही ऐकत राहणार.सहाजिकच. बाकी वाघाची डरकाळी आता गाईच्या हंबरण्यात रुपांतरीत झाली आहे याकडे लक्ष असावे.आपले लक्ष असेलच.सहाजिकच.

आम्ही शेणेकरी
ReplyDeleteआम्हाला प्यारी
दौलत सारी
त्यासाठी हुजरेगीरी
हीच. अवस्था मंदसेची