चित्रकला हा सगळ्या बाल गोपाळांचा आवडीचा विषय असतो.लहानपणी "छंद" म्हणून जरी हा विषय हाताळत असले तरी फारच कमी लोक व्यवसाय म्हणून या कलेकडे बघत असतात.आणि त्यातल्या त्यात फार कमीच लोक त्यात प्रसिद्धीस पावतात.चित्रकलेतला अर्कचित्र,व्यंगचित्र हा तर सगळ्यांच्याच आवडीचा,निवडीचा आणि आकर्षणाचा विषय.पण केवळ काळ्या रेषेतून पांढऱ्या कागदावर रेघोट्या ओढण्याईतक हे सोप काम नाही.भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि राजकारणाने बरबटलेल्या देशात व्यंग शोधायला पुरेपूर वाव आहे. शोधाल तिथे विषय आणि बघाल तिथे आशय असा हा देश कलाकार मन असलेल्या व्यक्तींना नक्कीच भावला आहे.आपल्या व्यंगचित्रात तोचतोचपणा येऊ नये यासाठी फार कमी लोक मेहेनत घेत असतात ,आणि अशा काही मोजक्या चित्रकारांमध्ये शिरोमणी कोणी असतील तर ते आहेत आर.के.लक्ष्मण.
रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मस। ।
मधुन न पूर्ण नाव.जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदी पर्यंत पंतप्रधानांची राजकीय कारकीर्द बघितलेला हा प्रगल्भ माणूस.राजकीय चित्रकार म्हणून ते संपूर्ण भारतवर्षाला माहित आहेत.भारतामध्ये तरी दीर्घकाळ व्यंगचित्रकार काढणारे एकमेव कलाकार म्हणून त्यांची ओळख नाकारता येणार नाही.लोकशाहीवादी भारतात खर तर व्यंगचित्रकाराला येथील सगळेच पुढारी विषय देत आले आहेत.परंतु हे विषय कळणे,त्यावर समूळ विश्लेषण व्हाव, वाचकांना चुटकीसरशी आकलन होईल अस व्यंगचित्र काढण हे महाकठीण काम पार पाडण्यात आर.के.लक्ष्मण यांचा नेहमीच हातखंडा होता.विषयाची वस्तुनिष्ठता तपासून त्यावर यथायोग्य भाष्य करणे हे येरागबाळ्याचे काम नक्कीच नाही.त्यामुळे तर देशात आणीबाणी लागू असतानाही तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी लक्ष्मण यांना राजकीय व्यंगचित्रे काढण्याची अनुमती दिली, आणि अशी व्यंगचित्रे लोकशाहीला अधिकच परिपक्व करतील असा शेराही दिला.केवळ या प्रसंगावरून लक्ष्मण यांची प्रगल्भता लक्षात यावी.जे.जे.आर्ट्स स्कूल म्हणजे कलाविषयक आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठ.या कॉलेज मध्ये प्रवेश मिळावा आणि आपले चित्रकार होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी लक्ष्मण यांनी देखील अर्ज केला होता आणि सोबत नियमाप्रमाणे आपल्या अर्कचित्रांचे काही नमुने कॉलेजकडे पाठविले होते.काही दिवसांनी कॉलेजकडून उत्तर आले कि,तुमची चित्रकला हि परिपूर्ण नाही आणि तुम्ही आमच्या शिक्षणसंस्थेत कलेचे शिक्षण घेण्यास अपात्र आहात. उपरोक्त सबबीवर जे. जे. स्कूल ऑफ आर्टने लक्ष्मण यांना प्रवेश देण्यास नकार दिला होता.देशातील नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला नाही म्हणून लक्ष्मण निराश झाले नाही.उलट आणखी उत्साहाने आपली "पात्रता" दाखवून देण्यासाठी आपली कलासेवा सुरु ठेवली.पुढे कालांतराने "टाइम्स" मध्ये कार्यरत झाल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळाली .योगायोगाने टाइम्सचे कार्यालय आणि जे.जे. ची इमारत शेजारी शेजारी होती. राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांना एव्हाना प्रसिद्धी मिळाली होती; त्याच बळावर आणि कौतुकामुळे ज्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सने लक्ष्मण यांना प्रवेश नाकारला त्यांनीच लक्ष्मण यांना स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बोलावले.अशा हरहुन्नरी कलाकाराला चार भिंतीत घडविण्यापेक्षा चार लोकांमध्ये घडविण्याचा नियतीचा विचार असावा. अशी फार कमी कर्तुत्ववान माणसे असतात त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मण.
"यु सेड इट" या नावाने टाइम्स मध्ये येणारे व्यंगचित्राचे सदर लक्ष्मण यांच्या विशेष शैलीमुळे अतिशय लोकप्रिय ठरले.विविध भाषा,प्रांत,चालीरीती,वेशभूषा असलेल्या आपल्या देशात प्रत्येक राजकीय निर्णयाचा,घडामोडीचा बाधक हा इथला 'सामान्य' नागरिक असतो.या सगळ्या विविध गोष्टी दाखविण्यापेक्षा संपूर्ण देशाची ओळख असणार एकच पात्र असावं अशी भन्नाट कल्पना लक्ष्मण यांच्या सुपीक डोक्यात आली.आणि यातून साकारला गेला तो डोक्याला टक्कल असलेला,मिशा असलेला,उभ्या आडव्या चौकटीचा कोट घातलेला आणि धोतर नेसलेला,खांद्यावर काठी आणि काठीला अडकवलेल गाठोड घेऊन निघालेला "कॉमन मैन. अल्पावधीतच हा कॉमन मैन देशातील प्रत्येक जनसामान्याचा प्रतिनिधी बनला.हा सामान्य माणूस कधी अर्कचित्रातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावायचा तर कधी पुराची पाहणी करायला निघालेल्या मंत्र्याच्या हैलिकाप्टर पाहणी करायला जायचा.कधी सीमेवर युद्ध बघायला जायचा तर कधी राजनेत्याच्या प्रचारसभेत अगदी स्टेजवर जाऊन बसायचा.काहीही न बोलता प्रतिक्रिया देणारा हा कॉमन म्यान मग अल्पावधीत मूकनायक बनला.त्याची निर्मिती करणारे लक्ष्मण मग भारतीय राजकारणातल डोळस व्यंग शोधून त्यावर भाष्य करू लागले.
सुप्रसिद्ध लेखक पद्मश्री आर.के. नारायण हे लक्ष्मण यांचे ज्येष्ठ बंधू.त्यांनी साकारलेल्या मालगुडी डेज या कथासंग्रहात असलेल्या काल्पनिक 'मालगुडी' या गावाला जिवंतपणा देणारी व्यंगचित्रे लक्ष्मण यांनी काढली.८० च्या दशकात दूरदर्शनवर झळकणारी मालगुडी डेज हि मालिका अजूनही रसिक प्रेक्षकांच्या मनावर गरुड गाजवत आहेत.असे कलाकार पुन्हा होणे नाही.कलेच्या क्षेत्रात आपल जीवन समर्पित करून त्या कलेच व्रत हाती घेणारे लक्ष्मण हे अनन्य साधारण असे व्यक्तिमत्व होते.९३ वर्षे वय असूनही कालाशक्ती जागरूक असलेले लक्ष्मण बुद्धीने तल्लख होते.आपले शरीर थकले असले तरी मेंदू थकलेला नाही असे ते नेहमी म्हणायचे.त्यांच्याच तोडीचे चित्रकार एम.एफ. हुसैन यांना आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जेव्हा देश सोडून जावा लागला तेव्हा हा कलाकार देखील अस्वस्थ झालेला या देशाने पाहिलेला होता.अलीकडेच 'चार्ली हेब्डो' वर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला गेला.कलाकाराला जात धर्म आणि पंथ नसतो.नवरचनावादाचा पुरस्कार करणारे कलाकार विवेकवादी असतात.हाच विवेक लक्ष्मण यांनी आयुष्यभर जपला.लक्ष्मण हे आपल समृध्द जीवन जगले.किती तरी सरकारे लक्ष्मण यांच्या साक्षीने घडली आणि बिघडली.अशा अनेक सूक्ष्म घडामोडींचे साक्षीदार असलेले लक्ष्मण आपल्यात आज नसले तरी त्यांच्या हाताने रेखाटलेल्या रेघोट्या आपल्या भावी पिढीवर संस्कार करणाऱ्या आहेत.लक्ष्मण आपल्यातून गेले असले तरी त्यांचा कॉमन म्यान अजूनही आपल्या आसपास आहे.इथल्या प्रत्येक घडामोडीवर तो लक्ष ठेवून आहे.जिथे आपण चुकणार आहोत तिथे तो त्याच्या हातातील काठी आपल्या माथी मारणार आहे.या कॉमनमॅनचा वचक जो पर्यंत या व्यवस्थेवर आहे तोवर 'सामान्य' माणूस निश्चिंत आहे.

Bhava atishay sundar Lekh Ahe yenarya kalatala sarvsamaveshak vichar karnara lekhak....
ReplyDelete